International Music Day : आपल्या देशात अनेक लोक मानसिक आजाराने ग्रस्त आहेत. हा आजार संथ गतीने वाढत असल्यामुळे त्याची लक्षणे हळूहळू दिसून येतात. मानसिक आजार असलेल्या व्यक्तीने त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधणे गरजेचे आहे.
मानसिक रुग्णांच्या उपचारासाठी ओळखल्या जाणाऱ्या बेंगळुरूच्या कॅडाबाम्स हॉस्पिटलनुसार (Cadabams Hospital) “संगीत हे मानसिक आजार दूर करण्यास फायदेशीर आहे. या हॉस्पिटलच्या मते ‘म्युझिक थेरपी’ ही रुग्णांच्या मूड आणि भावनांवर सकारात्मक परिणाम करू शकते.”

म्युझिक थेरपी म्हणजे काय?

म्युझिक थेरपी ही एक उपचाराची पद्धत आहे. या थेरपीमध्ये संगीताच्या मदतीने आपण रुग्णांच्या मनातील नकारात्मक विचार बाहेर काढू शकतो. मानसिक आजारांवर उपचार करण्यासाठी अनेक वर्षांपासून या म्युझिक थेरपीवर कॅडाबाम्स हॉस्पिटल संशोधन करीत आहे.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…

हेही वाचा : Binge Drinking : महिन्यातून एकदा दारूचे अतिसेवन केल्यामुळे स्नायूंच्या आरोग्यावर परिणाम होतो का? वाचा, तज्ज्ञ काय सांगतात…

द इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या माहितीनुसार, कॅडाबाम्स हॉस्पिटलच्या कार्यकारी संचालक नेहा कॅडाबाम सांगतात, “या संशोधनाची सुरुवात २०१९ मध्ये एका कार्यक्रमाद्वारे झाली आणि त्यानंतर २०२० च्या शेवटी आम्ही म्युझिक थेरपीची सत्रे हॉस्पिटलमध्ये मानसिक रुग्णांच्या उपचाराचा एक भाग म्हणून लागू केली.”

त्या पुढे सांगतात, “म्युझिक थेरपी ही एक उपचाराची पद्धत आहे. या उपचाराच्या मदतीने संगीताचा वापर करून व्यक्तींच्या शारीरिक, भावनिक गरजा पूर्ण करता येऊ शकतात. हा उपचार काही खास म्युझिक थेरपिस्ट करतात. हे म्युझिक थेरपिस्ट वाद्य वाजवणे, गाणी म्हणणे, संगीत ऐकणे व गीतलेखन यांच्या माध्यमातून रुग्णांवर उपचार करतात.”

नेहा कॅडाबाम पुढे सांगतात, “आमचे संशोधन म्युझिक थेरपीमुळे रुग्णांवर होणाऱ्या परिणामांवर निरीक्षण करीत आहे. म्युझिक थेरपी मानसिक आजार असलेल्या रुग्णांचे मन नकारात्मक गोष्टींपासून विचलित करण्यास मदत करते”

त्या सांगतात, “मानसिक आजार असलेल्या रुग्णावर म्युझिक थेरपी फायदेशीर ठरली आहे. सुरुवातीला संशोधनाद्वारे म्युझिक थेरपीचा प्रभाव आणि त्यामुळे रुग्णांवर होणाऱ्या परिणामांचे निरिक्षण केले. आता या थेरपीमुळे होणारा सकारात्मक परिणाम पाहिल्यानंतर आम्ही मानसिक रुग्णांच्या उपचारांमध्ये या थेरपीचा समावेश केला आहे.”

या हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे, संगीत थेरपी ही रुग्णांचे वय, संगीताविषयीचे ज्ञान किंवा मानसिक आरोग्य स्थितीवर अवलंबून नसते; तर या थेरपीमुळे लोकांचा तणाव दूर होतो आणि नैराश्य कमी करण्यास मदत होते.

हेही वाचा : नाशपती खा, वजन कमी करण्यापासून रक्तदाब नियंत्रित ठेवण्यापर्यंत मिळतील हे फायदे; वाचा, तज्ज्ञ काय सांगतात…

कॅडाबाम्स हॉस्पिटलचे संचालक डॉ. सुनील एम. आर. सांगतात, “मानसिक आरोग्याच्या समस्या दूर करण्यासाठी म्युझिक थेरपी अत्यंत आवश्यक आहे.”
डॉ. सुनील एम. आर. पुढे सांगतात, “म्युझिक थेरपीसाठी कोणतीही अट नाही. मानसिक आजार असलेल्या व्यक्तीसाठी संगीत हे खूप चांगले औषध आहे. या थेरपीमुळे त्यांचा आजार बरा होण्यास मदत होऊ शकतो. पण, सामान्य विकार, नैराश्य किंवा किरकोळ मानसिक समस्या असलेल्या लोकांनी म्युझिक थेरपीचे उपचार घेतले आहेत. त्याशिवाय लहान मुलांची वर्तणूक चांगली नसेल, त्यांच्यामध्ये एकाग्रता खूप कमी असेल, तर अशा मुलांनासुद्धा म्युझिक थेरपीचा फायदा झाला आहे.”

एका घटनेची आठवण करून देताना नेहा कॅडाबाम सांगतात, “स्मृतिभ्रंश असलेल्या रुग्णामध्येही संगीत थेरपीचा सकारात्मक परिणाम दिसून आला होता. आम्हाला सुरुवातीला जाणवले की, रुग्ण कोणत्याही गोष्टीला प्रतिसाद देत नाही किंवा संवाद साधत नाही; पण म्युझिक थेरपीच्या एका सत्रादरम्यान या रुग्णाने उत्स्फूर्तपणे एका गाण्याची ओळ पूर्ण केली. त्यानंतरच्या प्रत्येक सत्रात तिने सहभाग घेतला आणि आम्हाला तिच्यामध्ये सकारात्मक परिणाम दिसून आला.

त्या पुढे सांगतात, “म्युझिक थेरपी ही केवळ भावनांशी संबंधित नाही; तर संवादालाही तितकेच महत्त्व देते. भाषेचा अडथळा न ठेवता, आम्ही तेलुगू, कन्नड व इंग्रजीमध्ये म्युझिक थेरपी घेतली. स्मृतिभ्रंश असलेल्या रुग्णांच्या भावनांचा विचार करून त्यांचा संवाद सुधारण्याची क्षमता या म्युझिक थेरपीमध्ये आहे.”

Story img Loader