Black Raisin And Chia Seed Water Benefits: भिजवलेले काळे मनुके आणि चिया सीड्सचे मिश्रण हे एक लोकप्रिय आरोग्यदायी पेय आहे, त्याच्या प्रभावी पौष्टिक गुणांमुळे त्याचे कौतुक केले जाते. या पेयाचे आरोद्यायी फायदेही आहेत. कनिक्का मल्होत्रा, सल्लागार आहारतज्ज्ञ आणि मधुमेह शिक्षक यांनी सांगितले की, काळे मनुका आणि चिया सीड्समधील समन्वय पौष्टिक शक्ती निर्माण करते.

  • काळे मनुके

सूर्यप्रकाशात वाळवलेले हे काळे मनुके अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध असतात, जे मुक्त रॅडिकल्सचा सामना करण्यास आणि पेशींना नुकसान होण्यापासून वाचवण्यासाठी मदत करतात. ते आयर्नचा एक चांगले स्त्रोतदेखील आहेत, जे अशक्तपणा टाळण्यासाठी आणि ऊर्जा पातळी वाढवण्यासाठी आवश्यक आहे. काळ्या मनुक्यांमधील फायबर पचनास मदत करते आणि आतड्यांच्या आरोग्यास प्रोत्साहन देते.

Health Benefits of Daily Hugs
तुम्ही दररोज किती वेळा मिठी मारता? जाणून घ्या, मिठी मारणे हे आरोग्यासाठी कसे फायदेशीर?
amazon river drying up
विश्लेषण: जगातील सर्वांत मोठी ॲमेझॉन नदी पडतेय कोरडीठाक……
wastage of food grains
विश्लेषण: शेतमालाची नासाडी केव्हा थांबणार?
reason behind celebration of wildlife week
विश्लेषण : वन्यजीव सप्ताह हा आता इव्हेंट झाला आहे का?
Use of plastic will be dangerous for agriculture
प्लास्टिकचा भस्मासूर शेतांना गिळंकृत करू पाहतोय…
healthy liver: 1-3 of 10 Indians have liver disease, says health ministry; here’s how to ensure you’re safe
Liver health: दहा पैकी तीन लोकांमध्ये यकृताची समस्या; कशी काळजी घ्याल स्वत:ची? जाणून घ्या
Risk of Heart Attack During Angiography
अँजिओग्राफीदरम्यान हृदयविकाराचा झटका येऊ शकतो का? वाचा, तज्ज्ञ काय सांगतात….
gibbon monkey dance marathi news
विश्लेषण: गिबन माकड जोडीदाराला आकर्षित करण्यासाठी चक्क नृत्य करते? काय सांगते नवे संशोधन?
  • चिया सीड्स

चिया सीड्स हे लहान पॉवर हाऊस ओमेगा-३ फॅटी अॅसिडने युक्त आहे आणि ते हृदय निरोगी ठेवण्याच्या गुणधर्मांसाठी प्रसिद्ध आहेत. चिया सीड्स फायबर, प्रथिने आणि कॅल्शियमचा उत्कृष्ट स्त्रोतदेखील आहे, ज्यामुळे स्नायू तयार करणे आणि हाडांची ताकद वाढवण्यास मदत करते.

काळे मनुके आणि चिया सीड्सच्या पाण्याचे फायदे

मल्होत्रा म्हणाले की, काळे मनुके आणि चिया सीड्स एकत्र केल्यावर अनेक प्रकारचे आरोग्य फायदे मिळतात.

  • पचनक्रिया सुधारते

दोन्ही घटकांमधील फायबर सामग्री नियमित आतड्यांसंबंधी हालचालींना प्रोत्साहन देते आणि आतड्यांचे आरोग्य चांगले ठेवते.

  • हृदय सुदृढ राहते

चिया सीड्समध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिडस्, काळ्या मनुक्यांमधील अँटिऑक्सिडंट्ससह जळजळ कमी करून आणि ऑक्सिडेटिव्ह तणावापासून संरक्षण करून हृदयाच्या आरोग्यासाठी प्रोत्साहन देतात.

  • हायड्रेशन

हे पेय शरीराला हायड्रेशन प्रदान करते, शरीराला दिवसभर ताजेतवाने आणि हायड्रेट ठेवते.

हेही वाचा: मोनोट्रॉपिक आहार तुमचे वजन कमी करण्यासाठी खरंच फायदेशीर आहे का?

या पौष्टिक पेयाचा लाभ घेण्यासाठी मूठभर काळे मनुके रात्रभर भिजत ठेवा. सकाळी चिया सीड्स पाण्यासह मिसळा किंवा फक्त पाण्यात घाला आणि चिया सीड्सचे एक जेल बनवा. हे पेय आपल्या दैनंदिन दिनचर्येत १-२ वेळा समाविष्ट करा, यामुळे तुमचे आरोग्य सुधारेल.

परंतु, या गोष्टी लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की, काळ्या मनुका आणि चिया सीड्सचे पाणी अनेक फायदे देतात; परंतु यांना संतुलित आहाराच्या जागी घेऊ नये. मधुमेह किंवा मूत्रपिंडाचा आजार यांसारख्या विशिष्ट आरोग्य स्थिती असलेल्या व्यक्तींनी हे पेय त्यांच्या दिनचर्येत समाविष्ट करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.