scorecardresearch

जेवताना पाणी प्यावे की नाही? तज्ज्ञांकडून जाणून घ्या काय आहे योग्य पद्धत

Drinking Water During Meal: न्यूट्रिशनिस्ट रमिता कौर (Nutritionist Ramita Kaur) सांगतात की जेवताना पाणी पिऊ शकता पण त्याचे एक योग्य पद्धत आहे.

Is Drinking Water During Meal Is Good How It Helps constipation Acidity Digestion Health Know From Nutrition expert
जेवताना पाणी प्यावे की नाही? तज्ज्ञांकडून जाणून घ्या काय आहे योग्य पद्धत (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Drinking Water While Eating: आपल्याला नेहमी सल्ला दिला जातो की, जेवताना कधीही पाणी पिऊ नये कारण त्यामुळे अन्न व्यवस्थित पचत नाही आणि पोटाचे विकार होऊ शकतात. पण तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की, काही लोक जेवताना पाणी पिऊ शकतात आणि आजारांपासून दूर राहू शकतात. न्यूट्रिशनिस्ट रमिता कौर (Nutritionist Ramita Kaur) सांगतात की जेवताना पाणी पिऊ शकता पण त्याचे एक योग्य पद्धत आहे. पाणी पिण्याच्या या आयुर्वेदिक पध्दतीमुळे तुम्ही बद्धकोष्टता, अपचन, गॅस, मुळव्याध अशा आजारांपासून सुटका मिळवू शकता.

जर तुम्हाला पचनक्रियेसंबधीत अनेक समस्या असल्यास जेवताना थोडे पाणी पिणे योग्य आहे. पण लक्षात ठेवा, जास्त प्रमाणात पाणी पिऊ नका. एक घोट पाणी प्या. जेवताना जर पाणी प्यायचे असेल तर योग्य पद्धत जाणून घ्या. जेवताना पाणी पित असल्यास एका वेळी एक घोट पाणी प्यावे. संपूर्ण जेवणादरम्यान एक -एक घोट प्यायल्याने त्याचे विभाजन लहान भागात होते ज्यामुळे अन्न पचण्यास फायदा होतो.

आयुर्वेदानुसार, जेवल्यानंतर लगेच पाणी पिणे टाळावे कारण जेवणानंतर अन्न पचण्यासाठी उपयूक्त ठरणारे आम्लामध्ये पाणी मिसळ्यास त्याचा प्रभाव कमी होतो आणि पचनक्रिया मंदावते. परिणामी पाचनक्रिये संबधीत आजारांचा सामना करावा लागतो.

योग्य पद्धतीने पाणी पिण्याचे फायदे (Benefits Of Drinking Water Correctly)

शरीरातून विषारी पदार्थ पडतात बाहेर

अन्न पचण्याच्या प्रक्रियेदरम्यान अनेक विषारी पदार्थ निर्माण होतात. हे विषारी पदार्थ शरीरास हानी पोहचवू शकतात. जर जेवताना योग्य पद्धतीने पाणी प्यायले तर शरीरातून हे विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी मदत होते.

हे ही वाचा<< झोपण्याआधी तीन तास घरात किती उजेड आहे यावर ठरतो डायबिटीजचा धोका, काय सांगतो नवा अभ्यास?

पाणी पिताना या गोष्टी ठेवा लक्षात

१. पाणी पिताना नेहमी बसून पाणी प्यावे. उभे राहून पाणी पिऊ नये.
२. एकाच वेळी जास्त प्रमाणात पाणी पिणे टाळा.
३. साधारण किंवा कोमट पाणी पिणे आरोग्यासाठी लाभदायक आहे, गार पाणी प्यायचे असेल तर माठातील पाणी प्यावे.
४. सकाळी उठल्यानंतर सर्व प्रथम पाणी प्यावे.
५. तुम्ही जेवणाअगोदर १ तास आधी पाणी पिऊ शकता.

टीप :हा लेख फक्त माहितीसाठी आहे. हा कोणत्याही प्रकारचा उपचार किंवा औषधासाठी पर्याय नाही. अधिक माहितीसाठी नेहमी आपल्या फॅमिली डॉक्टराला संपर्क साधा

मराठीतील सर्व हेल्थ ( Health-tips ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 14-03-2023 at 10:13 IST
ताज्या बातम्या