आजकाल प्लास्टिकच्या बाटल्यांमधील पाणी पिणे ही सामान्य बाब झाली आहे. आपल्यापैकी अनेकजण प्रवासातच घरात आणि ऑफिसमध्येही प्लास्टिकच्या बाटलीतील पाणी पितात. त्यामुळे प्लास्टिकच्या बाटलीमधून पाणी पिणं हे अनेकाच्या सवयीचा भाग झाला आहे. परंतु प्लास्टिकच्या वापराचा आपल्या आरोग्यावर खूप वाईट परिणाम होतो. यामध्ये फ्लोराईड, अॅल्युमिनियम आणि आर्सेनिक अनेक घातक घटक आढळतात. जे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक आहेत.

त्यामुळे प्लास्टिकचा वापर हा मधुमेहाची समस्या वाढवण्यापासून ते पुरुषांची प्रजनन क्षमता कमी करण्यास कारणीभूत ठरु शकतो. शिवाय ते पर्यावरणासाठी अत्यंत हानिकारक आहे. देशात दरवर्षी ३५ लाख टनांहून अधिक कचरा निर्माण होतो, हे लक्षात घेऊन सरकार प्लास्टिक बंद करण्यासाठी सातत्याने मोहीम राबवत असते. त्यामुळे कोणत्या पद्धतीचे पाणी प्यायल्याने आपल्या शरीरावर काय घातक परीणाम होतात ते तज्ञांकडून जाणून घेऊया. डॉ. दिव्या गोपाल, आहारतज्ञ/पोषणतज्ञ, मदरहूड हॉस्पिटल, बनशंकरी, बेंगळुरू, यांनी हेल्थ शॉट्सला दिलेल्या माहितीनुसार प्लास्टिकच्या बाटल्यांमधून पाणी पिणे अनेक आजारांना कारणीभूत ठरु शकते. प्लॅस्टिकच्या बाटल्यांमधून पाणी पिण्याचा तुमच्या आरोग्यावर कसा परिणाम होतो ते जाणून घेऊया.

Clean Intestine In 20 Minutes In Morning With These Simple Five Asanas How Much Luke Warm Water To Drink First After Waking Up
Video: सकाळी उठताच १५ मिनिटांत पोट स्वच्छ होण्यासाठी करा ‘या’ पाच कृती; कोमट पाणी पिण्याचं प्रमाणही पाहा
indias first hydrogen powered ferry
विश्लेषण : पंतप्रधान मोदींकडून हायड्रोजन इंधनावर चालणाऱ्या देशातील पहिल्या बोटीचे उदघाटन, काय आहेत वैशिष्ट्ये? जाणून घ्या…
Why a sunscreen over SPF 50 is still the best bet for the beach
तुम्हीही उन्हात जाताना ‘SPF 50’ सनस्क्रीन वापरताय का? मग त्वचारोग तज्ज्ञ काय सांगतात वाचाच
Experts also demand that the regulatory framework of Finetech needs to be reconsidered to reduce the pressure of regulations eco news
‘फिनेटक’च्या नियामक चौकटीचा पुनर्विचार आवश्यक; नियमावलीची जाचकता कमी करण्याचीही तज्ज्ञांची मागणी

हेही वााचा- अशुद्ध रक्तामुळे निर्माण होऊ शकतात गंभीर समस्या; रक्त शुद्ध करण्याचे ‘हे’ नैसर्गिक उपाय जाणून घ्या

रोगप्रतिकारक शक्ती –

प्लास्टिकच्या बाटल्यांमधून पाणी साठवू नये किंवा साठवलेले पाणी पिऊ नये असा सल्ला नेहमीच दिला जातो. याचे कारण म्हणजे प्लॅस्टिकमधील रसायने आपल्या शरीरात प्रवेश करतात आणि आपली रोगप्रतिकारक शक्ती कमी करतात.

यकृताचा कर्करोग आणि शुक्राणूंची संख्या –

प्लास्टिकमध्ये phthalates नावाचे रसायनामुळे यकृताचा कर्करोग आणि शुक्राणूंची संख्या कमी करण्याच्या समस्या निर्माण करु शकतात. फ्रेडोनिया येथील स्टेट युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्कने नुकत्याच केलेल्या अभ्यासातून असे दिसून आले की, बाटलीबंद पाण्यात, विशेषतः लोकप्रिय ब्रँडमध्ये मायक्रोप्लास्टिक्सचे प्रमाण जास्त आहे.

हेही वाचा- घसा सतत खवखवतोय? तर झटपट आराम मिळवण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय करुन पाहा

BPA निर्मिती –

बायफेनिल ए सारखे रसायन, जे इस्ट्रोजेनची नक्कल करणारे रसायन आहे, ज्यामुळे मधुमेह, लठ्ठपणा, प्रजनन समस्या आणि मुलींमध्ये लवकर यौवन यासारख्या आरोग्यासंबंधीच्या समस्या उद्भवू शकतात.

डायऑक्सिन –

सूर्याच्या थेट संपर्कात आल्याने, प्लास्टिकच्या बाटल्यांमधून रासायनिक लींचिंग होऊ शकते आणि डायऑक्सिनसारखे हानिकारक रसायने बाहेर पडू शकतात. ज्यामुळे स्तनाच्या कर्करोगाचा धोका वाढतो.

हृदयविकाराचा धोका –

प्लास्टिकच्या बाटलीतील पाणी प्यायल्याने असाध्य आजार मधुमेह आणि हृदयविकाराचा धोकाही वाढतो. त्याचा तुमच्या रोगप्रतिकारक शक्तीवरही परिणाम होतो. बाटलीमुळे पाण्यात मिसळलेले रसायन शरीराला आतून कमकुवत बनवतात.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे, अधिकच्या माहितीसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा)