Is petroleum jelly safe to consume: व्हॅसलिनचे संस्थापक रॉबर्ट ऑगस्ट्स चेसब्रो (Robert Augustus Chesebrough) हे दररोज एक चमचा पेट्रोलियम जेली खात होते हे तुम्हाला माहीत आहे का? त्यांनी असा दावा केला होता की, या ‘वंडर जेली’मध्ये औषधी गुणधर्म आहेत आणि ते विविध आजार बरे करू शकतात, अशी माहिती ‘ब्रिटानिका’मधून मिळाली.

तुम्हाला याचे आश्चर्य वाटेल; परंतु अन्न वितरण प्राधिकरण (FDA) नुसार, पेट्रोलियम जेलीने सगळ्या सुरक्षा तपासण्या पास केल्या आहेत. पण, याचा अर्थ असा आहे का की, तुम्ही थेट टबमधून पेट्रोलियम जेलीचे सेवन करू शकता? कोणत्याही गोष्टीचे सेवन करण्यापूर्वी आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो का किंवा विशेषत: याचे काही फायदे आहेत का ते जाणून घ्या.

PresVu Eye Drop Drug regulator suspends licence
PresVu Eye Drop : चष्म्याचा नंबर घालवण्याचा दावा करणाऱ्या आय ड्रॉपच्या विक्रीचा परवाना दोनच दिवसांत निलंबित; कारण काय
amazon river drying up
विश्लेषण: जगातील सर्वांत मोठी ॲमेझॉन नदी पडतेय कोरडीठाक……
Anushka Sharma shares how her family adopted an early sleep routine; neurologist explains its importance for couples with kids
अनुष्का-विराट लवकर जेवण करतात अन् लवकर झोपतात; जाणून घ्या त्यांचं स्लीप रुटीन अन् त्याचे फायदे
coconut peel benefits 6 benefits of health from coconut
नारळाची साल फेकताय? थांबा! नारळाच्या सालीपासून आरोग्याला होणारे ‘हे’ ६ फायदे एकदा पाहाच
Akshay Shinde Shot Dead Badlapur Sexual Assault Case Amit Thackeray Remark
Akshay Shinde Encounter : अक्षय शिंदेंच्या एन्काउंटरवरून अमित ठाकरेंच्या पोस्टने वेधलं लक्ष; फडणवीसांसह विरोधकांच्या भूमिकेवर प्रश्न
back pain, self-management, treatment,
कंबरदुखी: भीतीतून जागरूकतेकडे (भाग ३)
Low back pain: If you have lower back pain, stay a mile away from this food item
Low back pain : पाठदुखीची समस्या पाठ सोडत नाही? डॉक्टरांचं ऐका आणि ‘हे’ पदार्थ पूर्णत: बंद करा
drinking hot lemon water in a copper pot
तांब्याच्या भांड्यात गरम लिंबू पाणी प्यायल्याने विषबाधा होऊ शकते? तज्ज्ञांनी मांडले मत..

हेही वाचा… झोपेचं रुटीन बिघडलंय! फक्त एक तासाची कमी झोप तुमच्या आरोग्यासाठी ठरेल धोक्याची घंटा? तज्ज्ञांनी केला खुलासा

ग्रेटर नोएडा येथील यथार्थ सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलचे सल्लागार बालरोगतज्ज्ञ डॉ. प्रशांत म्हणाले, “पेट्रोलियम जेली विषारी नसली तरी त्याचे सेवन करणे सुरक्षित नाही.” त्यांनी स्पष्ट केले की, पेट्रोलियम जेली खाल्ल्याने पोटदुखी, मळमळ, अतिसार आणि आतड्यांसंबंधी अडथळा यांसारख्या गंभीर आजारांना सामोरे जावे लागू शकते. कारण- पेट्रोलियम जेली जाड, स्निग्ध व पचण्यास कठीण असते.

डॉ. प्रशांत म्हणाले की, पेट्रोलियम जेली प्रामुख्याने त्वचेची निगा राखण्यासाठी वापरली जाते; तसेच ती त्वचेला मॉइश्चर देते आणि बाहेरील जीवाणूंपासून त्वचेचे संरक्षण करते. लहानशी जखम, टाचांच्या भेगा, कोरडे ओठ व पुरळ बरे करण्यासाठी पेट्रोलियम जेली प्रभावी आहे.

हेही वाचा… Fatty Liver: रोजच्या वापरातील ‘या’ ३ ड्रिंक्स करतील फॅटी लिव्हरचा त्रास कमी, जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला

डॉ. प्रशांत यांच्या मते, चेहऱ्यावरील त्वचेसंबंधित समस्या असल्यास काही लोकांना पेट्रोलियम जेली त्यांच्या संपूर्ण चेहऱ्यावर लावायला आवडते. परंतु, असे केल्यास चेहऱ्यावर आणखी समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील छिद्रे बंद होऊ शकतात आणि त्यामुळे पिंपल्स येण्याचे प्रमाण वाढते. किंवा काही प्रकरणांमध्ये आधीच पिंपल्स असतात आणि पेट्रोलियम जेली त्यावर लावल्यास ती अधिक वाढू शकतात. त्यामुळेच डॉक्टरांनी ही जेली संपूर्ण चेहऱ्यावर लावण्यास मनाई केली आहे. तसेच त्यांनी पेट्रोलियम जेलीचा सेक्शुअल ल्युब्रिकंट म्हणून वापर करणेदेखील टाळण्यास सांगितले आहे, त्याऐवजी विशेषतः त्या त्या गोष्टींसाठी डिझाईन केलेल्या उत्पादनांचा वापर करण्याचा सल्ला दिला आहे.

DISCLAIMER : हा लेख सार्वजनिक डोमेन आणि / किंवा आम्ही संवाद साधलेल्या तज्ज्ञांच्या माहितीवर आधारित आहे. कोणतीही दिनचर्या सुरू करण्यापूर्वी नेहमी तुमच्या आरोग्य चिकित्सकाचा सल्ला घ्या.