गेल्या काही वर्षांत हृदयविकाराच्या झटक्याने अनेक सेलिब्रिटींना आपला जीव गमवावा लागला आहे. चिंतेची बाब म्हणजे यातील काही लोक ५० वर्षांपेक्षा कमी वयाचे होते. सेलिब्रिटींपासून ते सामान्य लोकांपर्यंत हृदयविकाराच्या झटक्याला लोक बळी पडत आहेत. आजाराचे निदान झाल्यावर सर्वात आधी मनात येणारा विचार म्हणजे, “आता जे कळलं ते आधी कळायला हवं होतं”. हृदयविकाराच्या बाबत अशा काही गोष्टी आहेत ज्या मुळात हृदयविकाराचा झटका येण्याआधीच दिसून येऊ शकतात ज्यामुळे आपण परिस्थिती वेळेत नियंत्रणात आणू शकता. छातीत अस्वस्थता किंवा श्वासोच्छवास तीव्र झाल्यास तातडीनं डॉक्टरांची भेट घेणे आवश्यक आहे, कारण ही हृदयविकाराच्या झटक्याची पहिली लक्षणे असू शकतात. याशिवाय आपण कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यायला हवे हे पाहूया..

आपले हृदय हे चार-कक्षांची रचना आहे. हृदयाच्या कक्षांमध्ये रक्तभिसरण योग्य करण्यासाठी हृदयाचे स्नायू संकुचित होणे आवश्यक आहे. हृदयाच्या प्रणालीमध्ये कोणत्याही समस्या किंवा खराबीमुळे हृदयाचे ठोके कमी होऊ शकतात, ज्याला अनेकदा डिसिरिथमिया किंवा ऍरिथमिया म्हणतात. हृदयाला रक्त पुरवठ्यामध्ये अडथळा आल्यास हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. रक्तवाहिन्यांच्या समस्यांमुळे ह्रदयाचे विकार होतात. यातून जीव वाचवण्यासाठी त्यांचे निदान आणि त्वरित उपचार करणे आवश्यक आहे.

Hyderabad Woman, Daughter Fight Off Armed Robbers Who Entered Their Home
VIDEO: धाडसाला सलाम! माय-लेकी चोरांना भिडल्या; चाकूधारी दरोडेखोराला केलं सळो की पळो
Mahashivratri Panchang Shubh Muhurta Rashi Bhavishya 8th March Marathi Horoscope Mesh To Meen Who Will Live Golden Time
महाशिवरात्री राशिभविष्य व पंचांग: ८ मार्चचा दिवस मेष ते मीनपैकी कुणाला शिवशंकराची कृपा लाभणार? पाहा तुमची रास
How To Stop Constant Burping Acid Reflex Doctor Suggested Remedies for Quick Relief in Acidity That Lead to Intestinal Disease sign
वारंवार ढेकर येत असल्यास डॉक्टरांचे ‘हे’ ७ उपाय देऊ शकतात आराम; आतड्यांच्या विकाराचे लक्षण कसे ओळखाल?
What is a brain tumor its Early symptoms
सतत चक्कर येणे असू शकते Brain Tumor चे लक्षण; आजाराच्या सुरुवातीला शरीर देते ‘हे’ संकेत

हृदयविकाराचा झटका कसा टाळायचा?

जर तुम्हाला हृदयविकाराचा झटका किंवा इतर हृदयविकार टाळायचे असतील तर तुम्हाला तुमचा रक्तदाब, साखरेची पातळी आणि वजन नियंत्रित ठेवावे लागेल. खाण्यापिण्याबाबत काळजी घ्यावी लागेल. रोज व्यायाम करावा लागेल आणि धूम्रपानापासून पूर्णपणे दूर राहावे लागेल. कमी तेलात घरी शिजवलेले अन्न खावे, जेणेकरून कोलेस्ट्रॉल आणि कार्बोहायड्रेट्स कमी करता येतील. निरोगी लोकांनी देखील नियमित तपासणी केली पाहिजे.

हृदयविकाराच्या झटक्यामध्ये पाचपैकी एक स्ट्रोक अॅट्रियल फायब्रिलेशन नावाच्या अनियमिततेमुळे होतो. या अवस्थेत अॅट्रियल फायब्रिलेशन ही एक अनियमितता आहे. अनेकदा यामुळे हृदय गती जलद होते, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका आणि हृदयाशी संबंधित इतर आजार होण्याचा धोका वाढू शकतो. त्यामुळे वेळेवर निदान झाल्यास, रक्त पातळ करणारी औषधे जसे की वॉरफेरिन किंवा इतर नवीन अँटीकोआगुलंट औषधे आणि अँटी-अॅरिथमिक औषधे देऊन वैद्यकीय उपचार सुरू करून हृदयविकार टाळले जाऊ शकतात.

हृदयविकाराच्या रुग्णांवर उपचार हे लक्षणांवर अवलंबून असतात जसे की, अॅट्रियल फायब्रिलेशनच्या इतर उपचारांमध्ये हृदयाला एक सौम्य शॉक देऊन , कार्डिओव्हर्शन नावाची थेरपी केली जाते किंवा हृदयाच्या डाव्या बाजूच्या पेशी नष्ट केल्या जातात.

हृदयाची गती योग्य आहे का हे कसे ओळखावे ?

हार्ट रेट म्हणजेच हृदयाची गती हा आपल्या शरीराचा एक महत्त्वाचा भाग आहे. अनेकवेळा हृदयाचे ठोके कमी किंवा वाढू लागतात.

  • हृदय धडधडणे – तुमचे हृदय खूप जोरात धडधडत किंवा खूप हळू धडधडणे
  • छातीत अस्वस्थता – तुम्हाला छातीच्या भागात अस्वस्थता, वेदना किंवा दाब जाणवू शकतो
  • श्वासोच्छवासाचा त्रास – तुम्हाला श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो किंवा श्वास सोडल्याचा अनुभव येऊ शकतो.
  • चक्कर येणे किंवा डोके जड होणे – काही लोकांना चक्कर येते, जास्त थकवा किंवा उर्जेची कमतरता जाणवणे.
  • घाम येणे- अस्पष्ट घाम येणे, विशेषत: विश्रांतीच्या कालावधीत किंवा कमीतकमी श्रम करताना.

उच्च रक्तदाब, मधुमेह, धूम्रपान, उच्च कोलेस्टेरॉलची पातळी, हृदयविकाराचा कौटुंबिक इतिहास किंवा तुमचे वय जास्त असल्यास नियमीत तपासणी करणे आवश्यक आहे. तुम्हाला वरीलपैकी कोणतीही लक्षणे आढळल्यास तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधावा.

तुम्हाला ऍरिथमिया आहे हे कसे ओळखाल?

हार्ट ऍरिथमिया हा एक हृदय विकार आहे. ज्यामध्ये हृदयाचे ठोके आणि लय विस्कळीत होतात. दरम्यान तुम्हाला तुम्हाला ऍरिथमिया आहे हे कसे ओळखाल ? तर ऍरिथमिया असलेल्या व्यक्तींच्या हृदयाचे ठोके जोरात होतात. हृदय जोरजोरात धडधडणे, धाप लागणे, चक्कर येणे, अशक्तपणा येणे, बेशुद्ध होणे, छातीत तीव्र वेदना होणे अशी लक्षणं यामध्ये आहेत.

ऍरिथमियावर उपचार काय?

  • रक्त तपासणी – इलेक्ट्रोलाइट्स, लिपिड्स, हार्मोन्सच्या स्तरांचे मूल्यांकन करण्यासाठी.
  • इलेक्ट्रोकर्डियोग्राम (इसीजी) – हृदयाचा ठोका, त्याचा रेट, लय इत्यादींचे मूल्यांकन करण्यासाठी.
  • इकोकार्डियोग्राफी (हृदयाचा अल्ट्रासाऊंड स्कॅन).
  • शरीराच्या विविध भागांचे अल्ट्रासाऊंड – इतर रोग वगळण्यासाठी.

हेही वाचा – हार्ट अटॅकचा धोका टाळण्यासाठी वेळीच करा कॅल्शियम स्कोअर टेस्ट, जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात… 

हृदयाचे ठोके व्यवस्थित नसल्यास उपचारांमध्ये परिस्थिती चांगल्या प्रकारे हाताळण्यासाठी जीवनशैलीत बदल करणे आवश्यक आहे. डॉक्टर हार्ट रेट स्थिर करण्यासाठी ब्लड थिनर्स, बिटा ब्लॉकर्स किंवा एडेनोसाइन्स सारखे औषध देऊ शकतात.काही गंभीर प्रकरणांमध्ये, हृदयाचा ठोका नियंत्रित करण्यासाठी पेसमेकर आणि इम्प्लांटेबल कार्डियोव्हर्टर डिफायब्रिलेटर सारख्या प्रत्यारोपित उपकरणांचा उपयोग केला जातो. ऍरिथमिया जीवघेणा नसला तरी हृदयविकाराचा धोका यामध्ये असतो, त्यामुळे यामकडे दुर्लक्ष न करता वेळीच डॉक्टरांकडन तपासणी करणे गरजेचे आहे.