Alcohol & Mental Health Connection : अभिनेत्री जाह्नवी कपूर हिने अलिकडील एका मुलाखतीत तिच्या दारूशी संबंधित वक्तव्यांवर स्पष्टीकरण देत गैरसमज दूर केले. Figuring Out with Raj Shamani या पॉडकास्टमध्ये बोलताना तिने सांगितले की, “ती स्वतःला कधीच ‘व्यसनी’ म्हणणार नाही, मात्र आयुष्यातील एका कठीण काळानंतर ती वारंवार मद्यपान करत होती.”

आयुष्यातील आघात आणि मद्यपान (Trauma and Drinking Pattern)

जाह्नवीने स्पष्ट केले की, एका वैयक्तिक धक्कादायक अनुभवामुळे तिला वारंवार दारू पिण्याची गरज वाटू लागली. “मी ‘व्यसनी’ नव्हते, पण वारंवार दारू पीत होते. त्या काळात मला वाटायचं की ‘मी सतत दारूच्या नशेत रहावे’,” असे ती म्हणाली.

तिने पुढे सांगितले की, “तिच्या शरीरावर होणारे परिणाम आणि हँगओव्हरची भावना तिला अजिबात आवडत नव्हती. “माझ्या शरीरावर एक ओळखीचा वास जाणवू लागला, जो मला भूतकाळातील एका व्यक्तीच्या व्यसनाची आठवण करून देत होता. तेव्हा मला समजलं, हे योग्य नाही,” असे तिने नमूद केले.

सोशल मीडियावरील वाद आणि स्पष्टीकरण (Controversy and Clarification)

जाह्नवीच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेल्यानंतर, तिच्या ऑफ द रॉक्स या उपक्रमाने स्पष्ट भूमिका मांडली. या निवेदनात म्हटले आहे की, “ही मोहीम व्यसनाबद्दल प्रामाणिक संवादासाठी आहे. क्लिकबेटसाठी याचा विपर्यास करणे चुकीचे आहे. जाह्नवी ही केअरगिव्हर आणि सहयोगी म्हणून सहभागी होती, तिच्या भूमिकेचा गैरसमज होऊ नये.”

दारूचे ‘सोशल’ स्वरूप आणि धोके (Social Drinking Risks)

डॉ. मुरली कृष्णा (अ‍ॅस्टर आरव्ही हॉस्पिटल, बंगळूर)यांनी इंडियन एक्सप्रेसला माहिती देताना सांगितले की, “सोशल ड्रिंकिंग सुरुवातीला नातेसंबध सुधारण्यासाठी साठी असते. पण हळूहळू मेंदू दारूला आत्मविश्वास आणि आरामदायी भावनेशी जोडतो, इथेच धोका सुरू होतो.”

त्यांच्या मते, अवलंबून राहणे नेहमीच एकट्याने पिण्यात दिसत नाही. अनेक वेळा लोकांना वाटते की, “दारू शिवाय सामाजिक कार्यक्रम अपूर्ण आहे, हीच दारूच्या व्यसनाची सुरुवात असू शकते”

दारूवर अवलंबून राहण्याची कारणे (Why Dependence Develops)

डॉ. मुरली कृष्णा पुढे म्हणाले, “लोक आरामदायी भावना, तणावमुक्ती किंवा सामाजात आत्मविश्वासाने वावरण्यासाठीसाठी दारू घेतात. अवलंबित्व हे वातावरणापेक्षा भावनिक परिणामामुळे जास्त वाढते.”

आरोग्यावर परिणाम आणि लक्ष देण्याचे संकेत (Health Impact & Warning Signs)

डॉ शुचिन बजाज (उजाला सिग्नस ग्रुप) यांनी इंडियन एक्सप्रेसला सांगितले की,”जर दारूमुळे शारीरिक, मानसिक आरोग्य, नातेसंबंध किंवा दैनंदिन जीवनावर नकारात्मक परिणाम होत असतील, तर ते थांबवण्याचा किंवा तज्ञांचा सल्ला घेण्याचा विचार करावा.”

दारू सोडल्याचे फायदे (Benefits of Quitting Alcohol)

डॉ श्रेय श्रीवास्तव (शारदा हॉस्पिटल) यांनी इंडियन एक्सप्रेसला माहिती देताना सांगितले की,” दारू REM sleep कमी करते.
(Rapid Eye Movement) sleep म्हणजे झोपेचा असा टप्पा, ज्यामध्ये डोळे बंद असतानाही वेगाने हालचाल करतात आणि मेंदू खूप सक्रिय असतो. दारू सोडल्यानंतर पहिल्या आठवड्यातच झोप सुधारते मानसिक स्पष्टता वाढते.

अस्वस्थता कमी होते
वजन कमी करण्यास मदत होते
मानसिक बदल आणि आत्मनियंत्रण

डॉ. बाजाज यांच्या मते, “दारूपासून दूर राहिल्यास व्यक्तीला आत्मनियंत्रण वाढल्याची जाणीव होते, स्वतःबद्दल समाधान मिळते आणि आयुष्याकडे नवीन दृष्टीकोन तयार होतो.”

निष्कर्ष (Conclusion)

जाह्नवी कपूरचा अनुभव हे दाखवतो की व्यसन नेहमीच स्पष्ट किंवा तीव्र स्वरूपात दिसत नाही. अनेक वेळा ती एक शांत, हळूहळू वाढणारी प्रक्रिया असते. योग्य वेळी स्वतःच्या सवयींचे निरीक्षण करणे आणि आवश्यक असल्यास बदल करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

टीप: ही माहिती सार्वजनिक स्रोतांवर आधारित आहे. कोणताही आरोग्यविषयक निर्णय घेण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्यावा.