मांसामध्ये मुबलक प्रमाणात प्रथिने आढळतात. त्यामुळे अनेकजण मांसाचा आहारात समावेश करतात. शिवाय जितके जास्त मांस खाऊ तितके जास्त प्रथिने मिळतात असा काही लोकांच समज आहे. मात्र, प्रथिनांसाठी केवळ मांसावर अवलंबून राहणं आरोग्यासाठी हानिकारक ठरु शकतं. कारण मांसापासून मिळणारी प्रथिने तुमची हाडे कमकुवत करू शकतात. अनेक अभ्यासातून समोरं आलं आले आहे की, मांसाहारापासून मिळणारी प्रथिने ही वनस्पतींपासून मिळणाऱ्या प्रथिनांच्या तुलनेत हाडे अधिक कमकुवत करतात.

मांसाहारामुळे खरंच हाडे कमकुवत होतात का?

bottle gourd halwa for diabetics and heart patients
मधुमेही अन् हृदयरोग्यांसाठी ‘दुधी हलवा’ ठरतो फायदेशीर? डॉक्टर्स नेमके काय सांगतात जाणून घ्या…
Overhydration: This is what happens if you drink too much water What Is Overhydration
सावधान.! जास्त पाणी पिणे आरोग्यासाठी ठरते धोकादायक; वजनानुसार दररोज किती पाणी प्यावे?
Can adding salt to drinking water help prevent dehydration this summer
उन्हाळ्यात पाण्यात चिमूटभर मीठ टाकून प्यावे का? डॉक्टर काय सांगतात वाचा….
5 Indian fruits that keep you hydrated during summer
शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी होईल मदत; उन्हाळ्यात करा ‘या’ ५ फळांचं सेवन

पोषणतज्ञ अंजली मुखर्जी यांनी त्यांच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये मांस किंवा वनस्पती आधारित प्रथिनांच्या सेवनाचा हाडांवर कसा परिणाम होतो हे सांगितलं आहे. “उच्च प्रथिनेयुक्त आहार आपल्या हाडांच्या आरोग्यावर परिणाम करु शकतात शिवाय अशा आहारामुळे कॅल्शियम कमी होण्याचीही शक्यता असते. हाडांच्या आरोग्यासाठी प्रथिने महत्त्वपूर्ण असतात. मात्र, जास्त प्रमाणात मांसाहारातून मिळणारी प्रथिने तुमच्या हाडांना हानी पोहोचवू शकतात.

हेही वाचा- तुम्हीही सतत जंक फूड खाता? यामुळे होणाऱ्या ‘या’ गंभीर समस्या एकदा जाणून घ्याच

मुखर्जी पुढे सांगतात की, मांसाहारामुळे मिळणाऱ्या प्रथिनांचा विचार केला तर ते हाडांच्या संरचनेसाठी महत्त्वाचे आहेत. हाडांच्या आरोग्यासाठी प्रथिने आवश्यक असतात. मात्र, ते खाण्याचे प्रमाण लक्षात न घेतल्यास त्याचे शरीरावर चुकीचे परिणाम होऊ शकतात. शिवाय प्रथिनांसाठी केवळ मांसावर अवलंबून न राहता दुग्धजन्य पदार्थ, मासे, चिकन आणि वनस्पती यांचाही आहारात समावेश करायला हवा.

प्रथिनांसाठी मांसावर अवलंबून राहणे अयोग्य ?

हेही वाचा- लिव्हर खराब झाल्यास पायात दिसतात ‘ही’ ५ लक्षणे; वेळीच धोका ओळखा

प्रथिनांसाठी तुम्ही भरपूर फळे, भाज्या आणि संपूर्ण धान्याचा आहारात समावेश करु शकता. पोषणतज्ञांच्या मते, मांसामध्ये फॉस्फरस-टू-कॅल्शियमचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे कॅल्शियमचे उत्सर्जन वाढते आणि हाडांसाठी महत्वाचे असणारे पोषणतत्वे कमी होऊ शकतात. तर नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनमध्ये प्रकाशित झालेल्या २०१४ च्या अभ्यासात असे सुचवण्यात आले आहे की, जेव्हा तुम्ही योग्य प्रमाणात कॅल्शियमचे सेवन करतो तेव्हा प्रथिनांचा तुमच्या हाडांवर सकारात्मक परिणाम होतो. शिवाय आणखी एका संशोधनात असं आढळून आलं आहे की, वनस्पती आधारित खाद्यपदार्थांमध्ये वाढ आणि प्राणी आधारित खाद्यपदार्थांचे सेवन कमी केल्याने हृदयरोग, टाइप-२ मधुमेह आणि अनेक प्रकारचे कर्करोग यांसारख्या रोगांचा धोका कमी होऊ शकतो.

आहारात समतोल गरजेचा –

वनस्पती आधारित आणि प्राणी आधारित दोन्ही प्रथिनांमध्ये अमीनो ऍसिडची रचना वेगवेगळी असते. त्यामुळे ते एकमेकांना रिप्लेस करता येऊ शकत नाहीत. परंतु त्यांच्यामध्ये संतुलन राखले जाऊ शकते. जास्त प्रमाणात लाल मांस खाल्ल्याने मधुमेह, हृदयविकार आणि कर्करोगाचा धोका वाढतो. अशा परिस्थितीत तुम्हाला जर तुमच्या आहारात काही मोठा बदल करयाचा असेल तर त्याच्या आधी तुम्ही आरोग्य तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.