उष्णतेच्या लाटेमुळे सर्व लोक हैराण झाले आहेत. उष्णतेच्या लाट ही फक्त माणसांसाठी त्रासदायक नाही तर पाळीव प्राण्यासाठीही त्रासदायक ठरू शकते. तापमान सरासरीपेक्षा जास्त वाढत असल्याने सुरक्षिततेसाठी पाळीव प्राण्यांना उन्हात चालायला घेऊन जाळणे टाळण्याचा निर्णय अनेक पाळीव प्राण्यांच्या पालकांनी घेतला आहे.

अशा स्थितीमध्ये पाळीव प्राण्यांना तंदुरुस्त आणि सक्रिय कसे ठेवावे असा प्रश्न अनेक पाळीव प्राण्यांच्या पालकांना पडला आहे. याबाबत द इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना प्राणी तज्ज्ञांनी काही उपाय सुचवले आहे ज्यामुळे उष्णतेच्या लाटेपासून पाळीव प्राण्यांचे संरक्षण करता येईल.

Raghuram Rajan reuters
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाला तर…”, भारताच्या अर्थव्यवस्थेबाबत माजी RBI गव्हर्नर रघुराम राजन यांचं मोठं वक्तव्य
Soha Ali Khan eats Soaking dates in coconut oil on empty stomach Is this Beneficial For Your health Read what expert said
अभिनेत्री सोहा अली खान फिटनेससाठी उपाशीपोटी ‘अशाप्रकारे’ खाते खजूर; पण हे खरचं फायदेशीर ठरते का? डॉक्टर म्हणाले…
What Kangana Said?
कंगनाचा धक्कादायक दावा, “कोणतीही नवी हिरोईन आली की तिला दाऊदसमोर..”
Maharashtra Lok Sabha Election Result 2024 Updates in Marathi
Maharashtra Lok Sabha Election Result 2024: महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघात काय आहे स्थिती? कुणाला मिळाला विजय; कोण आघाडीवर? जाणून घ्या…
PM narendra modi and joe biden
Lok Sabha Election Result 2024 Updates : इंडिया आघाडीचं ठरलं; सध्या ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत, पण योग्य वेळी योग्य पाऊल उचलण्याचं सूचक विधान!
yogendra yadav
“लोकसभेच्या निकालानंतर अजित पवार आणि एकनाथ शिंदे…”, योगेंद्र यादव यांचं मोठं विधान!
Manoj Jarange Warning to Devendra Fadnavis
लोकसभेच्या निकालानंतर मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांना इशारा, “..तर विधानसभेला इंगा”
Incense Sticks Causing Cancer
घरी धूप, उदबत्ती लावताना १० वेळा विचार कराल, डॉक्टरांनी सांगितलेले हे परिणाम वाचा, मंदिरात झालेला अभ्यास काय सांगतो?

पाळीव प्राण्यांना रोज चालयला घेऊन जा पण अशी घ्या त्यांची काळजी

MARS पेटकेअरचे वरिष्ठ पशुवैद्यक डॉ उमेश कल्लाहल्ली यांनी द इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना सांगितले की, “पाळीव प्राण्यांना पहाटे किंवा संध्याकाळी चालायला घेऊन जा, जेव्हा तापमानाचा पारा खाली येतो आणि वातावरण थोडे थंड होते. पदपथ हा उन्हामुळे तापलेला असू शकतो त्यामुळे पाळीव प्राण्यांचे पंज्यांना चटके बसू शकतात ज्यामुळे त्यांना गरम होऊ शकते किवा निर्जलीकरणाचा त्रास होऊ शकतो. आपल्या पाळीव प्राण्यांमध्ये अतिउत्साह टाळण्यासाठी सावलीत खेळताना त्यांना थोडावेळ विश्रांती मिळेल याची खात्री करा. पाळीव प्राण्यांसाठी नेहमी पाण्याची बाटली आणि भांडे जवळ ठेवा जेणेकरून त्यांच्या शरीरातील पाण्याची पातळी कमी होणार नाही.”

“उन्हाळ्याच्या महिन्यांत पाण्याचे सेवन शरीराचे तापमान नियंत्रित करण्यात आणि अवयवांचे आरोग्य राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. पुरेशा प्रामाणात पाण्याचे सेवन न केल्यामुळे निर्जलीकरण होतेच त्याशिवाय थकवा, तोंड कोरडे पडणे, डोळे कोरडे पडणे आणि जास्त धाप लागणे यासारखी लक्षणे देखील दिसू शकतात,” असे कल्लाहल्ली यांनी सांगितले.

पाळीव प्राण्यांचे मानसिक आरोग्याची काळजी कशी घ्यावी?

डेहराडूनमधील पाळीव प्राण्यांच्या पालक मेहर कौर यांनी सांगितले की, “घराबाहेर खेळण्याचा वेळ कमी झाल्यामुळे पाळीव प्राण्यांना अस्वस्थता, चिंता किंवा कंटाळा येऊ शकतो. म्हणून, त्यांना कंटाळा येऊ नये किंवा अस्वस्थता जाणवू नये यासाठी त्यांचा आहार, खेळण्याचा वेळ आणि प्रशिक्षण सत्रांसाठी एक सातत्यपूर्ण दिनचर्या राखणे महत्वाचे आहे.

“पाळीव प्राण्यांना कोडे सोडवणारे खेळणी आणि प्रशिक्षण सत्रांमध्ये व्यस्त ठेवून त्यांचे मानसिक उत्तेजन वाढवण्याची गरज आहे. पाळीव प्राण्यांबरोबर चांगला वेळ घालवा, त्यांची चिंता किंवा अस्वस्थता दूर करण्यात मदत करण्यासाठी त्यांना खूप प्रेम द्या. त्यांच्यासह घरात लपा-छपी खेळा, रस्सी-खेच, बॉल फेकून त्यांना आणयला सांगणे असे खेळ खेळू शकता, तसेच जिन्यावर चढ-उतर करणे यासारखे कार्डिओ व्यायाम देखील करू शकता यामुळे त्यांची शारीरिक हालचाल होत राहील. असे कौर यांनी सांगितले.

उन्हाळ्याचा आहार कसा असावा?

“तुमच्या पाळीव प्राण्यांसाठी टरबूज आणि दही यांसारखे ताजेतवाने पदार्थ फायदेशीर आहेत. लाल मांसापेक्षा पांढरे मांस निवडणे चांगले आहे. या उबदार महिन्यांत हवामानातील उच्च आर्द्रतेमुळे पेडिग्री ग्रेव्हीसारखे ओले अन्न पर्याय हे विशेषतः योग्य आहेत. हे कुत्र्यांना हायड्रेटेड ठेवण्यास आणि उष्णतेपासून संरक्षण करण्यास मदत करते,” असे कल्लाहल्ली यांनी सांगितले.

“ पाळीव प्राण्यांना ताजे, थंड पाणी सतत उपलब्ध होईल याची खात्री करणे आवश्यक आहे. नारळपाणी आणि ताक (मठ्ठा) यांसारख्या थंड खाद्य पदार्थांचा आहारात समावेश केल्याने इलेक्ट्रोलाइट्स संतुलित होण्यास मदत होते आणि त्यांच्या शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्याबरोबरच त्यांची पचनसंस्था थंड होते,” असे मेहर यांना सांगितले.

हेही वाचा – “…म्हणून मी पत्नी आणि मुलांच्या ‘अडीच तास’ आधी उठतो”, अक्षय कुमारने सांगितले त्याच्या या खास सवयी मागचे कारण, पाहा

पाळीव प्राण्यांना सुरक्षित ठेवताना काय काळजी घ्यावी

“उन्हाळ्यात पाळीव प्राण्यांची अतिरिक्त काळजी घ्यावी लागते. खिडक्या उघड्या असतील किंवा तलावाजवळ वावरताना त्यांच्यावर बारीक लक्ष ठेवा आणि त्यांना कधीही कारमध्ये एकटे सोडू नका, कारण उष्माघाताचा त्यांना त्रास लवकर होऊ शकतो. तरुण, वृद्ध किंवा विशिष्ट जाती किंवाआरोग्य समस्या असलेल्या असुरक्षित पाळीव प्राण्याच्या संपर्कात येणार नाही याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे,” अशी चेतावणी कल्लाहल्लीनी दिली.

पाळीव प्राण्यांमध्ये दिसणाऱ्या उष्माघाताची लक्षणांकडे लक्ष द्या, जसे की, जोडजोरात धडधडणे किंवा खूप आळस येणे. अशी लक्षणे आढळल्यास आपल्या पाळीव प्राण्यांचे तापमान कमी करण्यासाठी प्रयत्न करा आणि उलट्या किंवा अतिसाराचा त्रास होत असेल तर पशुवैद्यकीयांची मदत घ्या असेही त्यांनी सुचवले.

हेही वाचा – सोयाबीन खाण्यामुळे पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉनची पातळी खरोखर कमी होऊ शकते का?

मेहर यांनी पाळीव प्राण्यांना झोपण्यासाठी थंड चटई किंवा ओलसर टॉवेल देण्याची सूचना केली. “पाळीव प्राण्यांची काळजी घेण्याचा आणि अतिरिक्त फर काढून टाका कारण ते त्यांना थंड राहण्यास मदत करते. आठवड्यातून एकदा किंवा दोनदा अंघोळीची दिनचर्या कायम ठेवल्याने त्यांना स्वच्छ ठेवण्यास मदत होते. त्यांना ताजी हवा मिळावी म्हणून त्यांना बाहेर उष्णतेमध्ये घेऊन जाणे टाळा, त्यांना सकाळी लवकर आणि संध्याकाळी उशिरा बाहेर घेऊन जा,” असा सल्ला कौर यांनी दिला.