scorecardresearch

Premium

Monoclonal Antibodies : मोनोक्लोनल ॲंटीबॉडीज ठरणार का निपा विषाणूवरील ब्रह्मास्त्र? सरकारने का दिली वापरास परवानगी? जाणून घ्या….

सरकारने ऑस्ट्रेलियातून आयात केलेल्या अनधिकृत औषध (compassionate drug use) मोनोक्लोनल अँटीबॉडीचा वापर करण्यास परवानगी दिली आहे.

Nipah virus deaths Why Govt allows use of monoclonal antibody
Nipah virus : सरकारने का दिली मोनोक्लोनल अँटीबॉडीच्या वापरास परवानगी? (फोटो सौजन्य – पीटीआय फोटो, लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Kerala Nipah virus deaths : केरळच्या कोझिकोड जिल्ह्यात निपा विषाणूच्या प्रादुर्भावामुळे पाच संसर्ग आणि दोन मृत्यूंची नोंद झाल्याने, सरकारने ऑस्ट्रेलियातून आयात केलेल्या अनधिकृत औषध (compassionate drug use) मोनोक्लोनल अँटीबॉडीजचा वापर करण्यास परवानगी दिली आहे. दरम्यान, या विषाणूच्या प्रादुर्भावाच्या लहान टप्प्याच्या पहिल्या चाचणीमध्ये अँटीबॉडीज सुरक्षित असल्याचे सिद्ध झाले असले तरी जास्त संख्या असलेल्या मानवी चाचणीमध्ये ते निपा विषाणूविरुद्ध प्रभावी असल्याचे अद्याप सिद्ध झालेले नाही. तरीही सरकारने या औषधाच्या वापरास अखेर परवानगी का दिली, असा प्रश्न उपस्थित होतो.

सरकारने का दिली मोनोक्लोनल अँटीबॉडीच्या वापरास परवानगी?

प्रथम कारण म्हणजे लक्षणे दूर करण्याव्यतिरिक्त निपा विषाणूच्या संसर्गावर कोणताही प्रभावी उपचार नाही. एकदा संसर्ग झाल्यानंतर मृत्यूचे प्रमाण ४० ते ७५ टक्के इतके जास्त असू शकते. तुलना करायची तर कोविड-१९ साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव शिखरावर पोहोचला असतानाही केस फॅटॅलिटी रेशो (CFR) म्हणजेच पॉझिटिव्ह चाचणी घेणाऱ्यांमध्ये मरण पावलेल्या लोकांचे प्रमाण हे जवळपास तीन टक्के होते.

elders saved the child slife Varanasi Viral Video
VIDEO: पावसाच्या पाण्यात विजेचा धक्का बसल्याने तडफडत होता चिमुकला, देवदूत बनून आलेल्या वृद्धांनी वाचवले प्राण
Pankaja Munde
“माझ्यावर निर्णय घ्यायची वेळ…”, पंकजा मुंडेंच्या वक्तव्यावर भाजपाची प्रतिक्रिया; म्हणाले…
Anil Parab Supreme Court Rahul Narwekar
“सर्वोच्च न्यायालयाच्या खालचं विधानसभा अध्यक्षांचं न्यायालय प्रत्येक आमदाराची…”, अनिल परबांचं मोठं विधान
Marathi Woman Trupti Devrukhkar Shared video
धक्कादायक! मराठी महिलेला मुंबईत घर नाकारलं, मनसेने इंगा दाखवल्यानंतर माफी, व्हायरल व्हिडीओवर संताप व्यक्त

हेही वाचा – केरळमध्ये पुन्हा निपा विषाणूचा उद्रेक! हा विषाणू कसा पसरतोय? जाणून घ्या लक्षणे आणि प्रतिबंधात्मक उपाय…

दुसरे कारण म्हणजे मोनोक्लोनल अँटीबॉडीजचा वापर आतापर्यंत जागतिक स्तरावर १४ व्यक्तींमध्ये झाला आहे आणि त्यापैकी एकाचाही मृत्यू झालेला नाही.

“मोनोक्लोनल अँटीबॉडीजचा वापर भारतात कधीही झाला नाही. त्याच्या कोणत्याही चाचण्या झालेल्या नाहीत. कारण- असे करण्यासाठी संसर्गाची अनेक प्रकरणे आवश्यक आहेत आणि सुदैवाने तसे झाले नाही. सर्वांना माहीत असलेली गोष्ट म्हणजे आतापर्यंत १४ लोकांना अँटीबॉडीज दिल्या गेल्या आहेत आणि त्यापैकी एकाचाही मृत्यू झालेला नाही. निपाचा मृत्यू दर ४० ते ७५ टक्के आहे,” असे ‘इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च’चे महासंचालक डॉ. राजीव बहल यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 17-09-2023 at 17:38 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×