Kidney Stone Symptoms: बदलत्या जीवनशैलीत आपले शरीर चांगले ठेवण्याची गरज आहे. अशावेळी जर तुम्ही अनहेल्दी जीवनशैलीचे पालन केले तर तुम्हाला यामुळे गंभीर आजार होऊ शकतात. यापैकी एक आजार म्हणजे किडनी स्टोन. किडनी स्टोनमुळे सांध्यांमध्ये वेदना आणि सूज येते. त्यामुळे जर याचे रुग्ण थोडे जरी निष्काळजी राहिल्यास हा आजार गंभीर स्वरूप धारण करू शकतो. अशा परिस्थितीत, आपण आपल्या जीवनशैलीची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

किडनी स्टोनची लक्षणे कोणती?

  • पोटदुखी
  • भूक न लागणे
  • मळमळ
  • ताप
  • शौच करताना तीव्र वेदना
  • वारंवार शौच करण्याची इच्छा होणे

‘या’ पदार्थांसोबत चुकूनही मीठ खाऊ नका

मिठाचे अतिसेवन टाळावे

हार्वर्ड हेल्थच्या अहवालानुसार, जेवणात जास्त मीठ वापरणे खूप धोकादायक ठरू शकते. यामुळे किडनी स्टोनची समस्या उद्भवू शकते. जेवणात जास्त मीठ खाल्ल्याने लघवीत कॅल्शियमचे प्रमाण वाढते, त्यामुळे स्टोन बनण्याचा धोका वाढतो.

थंड पेय पिणे धोकादायक ठरू शकते

किडनी स्टोनच्या रुग्णांनी थंड पेय आणि चहा-कॉफीपासून दूर राहावे. स्टोनच्या रुग्णांना डिहायड्रेशनची समस्या असते. कोल्ड्रिंक्समध्ये असलेल्या अॅसिडमुळे स्टोन बनण्याचा धोका वाढतो.

( हे ही वाचा: डायबिटीज रुग्णांनी नाश्त्यात चुकूनही करू नका ‘या’ ३ गोष्टींचे सेवन; Blood Sugar झपाट्याने वाढू शकते)

मांस खाणे सोडून द्या

मांसामध्ये भरपूर प्रथिने असतात, म्हणून ते टाळले पाहिजे. जेव्हा स्टोन होतात तेव्हा जेवणात मीठ आणि प्रथिने कमी करावीत.

टोमॅटो

टोमॅटोचा वापर प्रामुख्याने जेवणात केला जातो. टोमॅटोमध्ये ऑक्सलेटचे प्रमाण जास्त असते. जे स्टोनच्या रुग्णांसाठी धोकादायक ठरू शकते. जर तुम्हाला टोमॅटो जास्त आवडत असतील तर भाज्यांमध्ये घालण्यापूर्वी त्यांच्या बिया काढून टाका.

किडनी स्टोनवर घरगुती उपाय काय आहेत?

  • टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन ए आणि सी जास्त असते जे किडनी स्टोन विरघळण्यास मदत करतात.रोज सकाळी टोमॅटो खाल्ल्याने शरीरातील अॅसिडचे प्रमाण कमी होते.
  • दिवसातून किमान आठ ते दहा ग्लास पाणी प्या.
  • दिवसातून दोनदा ताज्या शतावरी रसाचे सेवन केल्याने किडनी स्टोन विरघळण्यास मदत होते.
  • कॅक्टसची पाने दुधासोबत प्यायल्याने मूत्रमार्गाची समस्या दूर होते. कॅक्टसच्या पानांच्या रसात बेकिंग सोडा मिसळून प्यायल्याने स्टोन सहज निघून जातात.
  • गोखरुचे चूर्ण पाण्यात उकळून दिवसातून दोनदा सेवन केल्याने लघवी साफ होते.
मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kideny stone calcium in urine do not eat salt with these foods gps
First published on: 28-01-2023 at 11:06 IST