Premium

मधुमेहाचा तुमच्या किडनीवर परिणाम होत आहे की नाही, हे कसं ओळखाल? कोणते पदार्थ खाणे टाळावेत? डाॅक्टर सांगतात…

तुमचे आरोग्य चांगले राहण्यासाठी किडनीची काळजी घेणे खूप गरजेचे आहे.

Diabetic Kidney
डायबेटिसमुळे किडनी निकामी होऊ शकते काय? (फोटो : लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

किडनी आपल्या शरीराचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. खराब आहार आणि अस्वस्थ जीवनशैली यासारख्या अनेक घटकांचा तुमच्या किडनीच्या आरोग्यावर परिणाम होतो. बदलती जीवनशैली, खाण्यापिण्याच्या वाईट सवयी यामुळे आरोग्यावरही दुष्परिणाम होत असतात. याचा परिणामी सर्वाधिक किडनी होत असतो. किडनीचे आरोग्य धोक्यात येणार नाही, यासाठी आपण योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे. शरीरातील विषारी घटक शरीराबाहेर फेकण्याचं महत्त्वपूर्ण काम किडनी करते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आपले आरोग्य नेहमी चांगले राहावे, यासाठी काळजी घेण्याची गरज आहे. यात किडनीची भूमिका महत्वाची आहे. किडनीच्या आरोग्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे, त्यात काही समस्या असल्यास शरीरातून विषारी पदार्थ बाहेर पडू शकत नाहीत आणि आरोग्याला धोका पोहोचू शकतो. किडनी रक्त स्वच्छ करण्याचे आणि शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्याचे काम करते. पण कधी कधी हे विष किडनीला इजा करतात आणि किडनी निकामी होते. 

तर दुसरीकडे सध्याच्या धावपळीच्या जीवनात मधुमेहाचा आजार झपाट्याने वाढत आहे. गेल्या काही वर्षांत मधुमेहाच्या रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. मधुमेहाच्या रुग्णांसाठी शरीरातील रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. मधुमेह नियंत्रणात आणला नाही तर त्याचा परिणाम डोळे, किडनी इत्यादी अवयवांवर होऊ शकतो का? विशेषत: किडनीवर मधुमेहाचा जास्त परिणाम होऊ शकतो का…? मग कोणते पदार्थ टाळावेत? मॅक्स हेल्थकेअरच्या एंडोक्राइनोलॉजी आणि डायबिटीजचे अध्यक्ष डॉ. अंबरिश मिथल यांनी याबाबत इंडियन एक्सप्रेसला काय माहिती दिली आहे. जाणून घेऊया…

(हे ही वाचा : सकाळी तोंड न धुता, दात न घासता पाणी प्यावे का? तज्ज्ञ सांगतात करु नका ‘ही’ चूक शरीराचे होऊ शकते मोठे नुकसान )

डॉ. अंबरिश मिथल सांगतात, डायबिटीसमुळे किडनीची समस्या होऊ शकते. ज्याला डायबिटीक किडनी डिजीज म्हणतात. मधुमेह आणि किडनी रोग यांच्यात एक दुवा आहे जो तुम्हाला लक्षात घेणे आवश्यक आहे. मधुमेहामुळे हळूहळू किडनीचा आजार होऊ शकतो, रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्याने मूत्रमार्गात बॅक्टेरियाची वाढ वेगाने होते. हे बॅक्टेरिया लघवीमध्ये रेंगाळत असताना मूत्रमार्गात संक्रमण आणि मूत्राशयात संक्रमण होऊ शकते, जे नंतर मूत्रपिंडात पसरू शकते. डॉक्टरांच्या मते. ज्या लोकांची साखरेची पातळी नियंत्रणात नसते. त्यांना किडनीशी संबंधित आजारांचा धोका अधिक असतो.

लक्षणं कोणती?

डायबिटीक किडनी डिजीजची लक्षणं डोळ्यांच्या आजूबाजूला दिसू शकतात. जर कुणात डायबिटीसचा आजार वाढला तर डोळ्यांच्या आजूबाजूला सूज दिसू लागते. याचा थेट अर्थ असा होतो की, डायबिटीसमुळे किडनीवरही प्रभाव होत आहे आणि डायबिटीक किडनीचा आजार सुरू होत आहे. जर कुणाला वर दिलेली लक्षणं दिसली तर व्यक्तीने लगेच डॉक्टरांशी संपर्क साधला पाहिजे, असेही ते सांगतात.

‘या’ लोकांना जास्त धोका

टाईप वन डायबेटिसच्या रुग्णांना टाईप टू डायबेटिसच्या रुग्णांपेक्षा किडनीशी संबंधित आजार होण्याचा जास्त धोका असतो. टाईप वन डायबेटिस रुग्णांमध्ये किडनीचे आजार अगदी सर्वसामान्य आहेत. पण टाईप टू डायबेटिसच्या रुग्णांमध्ये ही समस्या आता जास्त प्रमाणात दिसते.

काय खाणे टाळावे?

डाॅक्टरांच्या मते, किडनी निरोगी ठेवण्यासाठी लोकांनी जेवणात मीठ आणि तेल जास्त वापरणे टाळले पाहिजे. पोटॅशियमयुक्त पदार्थ जसे की फळांचे रस, नारळ पाणी, बटाटे आणि टोमॅटो खाणे टाळले पाहिजे, असेही ते सांगतात.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Kidney failure symptoms how do you know if diabetes is affecting your kidney which foods to avoid pdb

First published on: 24-09-2023 at 13:04 IST
Next Story
Health Special: डोळे येण्याची लक्षणं काय आणि उपचार काय करावेत?