scorecardresearch

किडनीच्या रूग्णांनी वारंवार रुग्णालयात जाण्याची गरज नाही; फक्त डायलिसिस करताना अशी काळजी घ्या

मूत्रपिंड निकामी झालेल्या रुग्णांसाठी डायलिसिस हा शेवटच्या टप्प्यातील उपाय सांगितला जातो.

tips for dialysis patients
डायलिसिस प्रक्रिया किडनी निकामी झालेल्या लोकांसाठी जीवनरक्षक मानली जाते. (Photo : Freepik)

डायलिसिस किडनी निकामी झालेल्या लोकांसाठी जीवनरक्षक ठरते. परंतु ही एक वेळ घेणारी आणि अनेकांना घाबरवणारी प्रक्रिया आहे. शिवाय डायलिसिसमुळे रुग्णाच्या जीवनात अनेक बदल घडून येतात. तुमच्या कुटुंबातील कोणाची किडनी निकामी झाली असेल आणि त्यांना नियमित डायलिसिस करावे लागत असेल, तर तुमच्यासाठी आज आम्ही काही महत्वाच्या सूचना सांगणार आहोत, ज्यामुळे रुग्णाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्याचे प्रमाण कमी होऊ शकते.

डायलिसिसचा सल्ला कधी दिला जातो –

हेही वाचा- मासिक पाळीदरम्यान तीव्र वेदना होतात का? मग ‘हा’ घरगुती उपाय करून मिळवा तात्काळ आराम

मूत्रपिंडाचा आजार किंवा मूत्रपिंड निकामी झालेल्या रुग्णांसाठी डायलिसिस हा शेवटच्या टप्प्यातील उपाय सांगितला जातो. मूत्रपिंड नीट काम करत नसल्यामुळे डायलिसिसची गरज भासते. कारण डायलिसिस हे मूत्रपिंडासारखे कार्य करते. म्हणजेच ते शरीरातील टाकाऊ पदार्थ बाहेर फेकून देते, रक्तदाब नियंत्रित ठेवते, रक्तातील पोटॅशियम, सोडियम, बायकार्बोनेट, कॅल्शियम आणि फॉस्फरस इत्यादी काही रसायनांची पातळी सुरक्षितपणे ठेवते. डायलिसिस करण्यासाठी वारंवार रुग्णालयात जावे लागते. सतत रुग्णालयात जाण्यामुळे रुग्णाच्या आयुष्यावर त्याचा परिणाम होतो. शिवाय डायलिसिस ही खूप महागडी प्रक्रिया आहे. योग्य डायलिसिस शेड्यूल पाळण्याव्यतिरिक्त, चांगल्या स्वच्छतेच्या सवयी आणि निरोगी आहार घेणे महत्वाचे आहे. अशा आणखी काही उपयुक्त टिप्स जाणून घेऊया.

डायलिसिस शेड्यूल –

डायलिसिसचे शेड्यूल पाळा डॉक्टरांनी दिलेल्या वेळेत रुग्णालयात उपस्थित रहा आणि कोणत्याही कारणास्तव ते चुकवू नका. डायलिसिस चुकवल्यास, शरीरात कचरा आणि विषारी पदार्थांचे प्रमाण वाढते. ज्यामुळे अनेक गंभीर आरोग्यविषयक समस्यांना सामोरं जावं लागते.

हेमोडायलिसिसचे सत्र चुकवू नका –

हेमोडायलिसिसचे सत्र चुकवल्यास तुम्हाला इमर्जन्सीमध्येही दाखल व्हावे लागू शकते. हेमोडायलिसिसचे प्रत्येक सत्र ४ तासांचे असते. त्यामुळे ते कमी करण्याची जबरदस्ती करू नका.

हेही वाचा- हृदय बंद पडल्यास, श्वास थांबल्यास CPR कसा द्यायचा? ‘या’ सोप्या स्टेप्स शिकून तुम्हीही वाचवू शकता जीव

स्वच्छता ठेवा –

हात स्वच्छ धुवा चांगल्या स्वच्छतेच्या सवयींचे पालन करुन तुम्ही संक्रमणांपासून स्वतःचे संरक्षण करू शकता, जे डायलिसिस रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याचे एक सामान्य कारण आहे. रुग्णांनी न धुतलेल्या हातांनी डायलिसिस करताना एक्‍सेस साइटला स्पर्श करणं टाळावे.

जास्त प्रमाणात शीतपेय पिणं टाळा –

डायलिसिसच्या आधी आणि नंतर रुग्णांचे वजन केलं जातं आणि त्यांना घरी दररोज वजन करण्याचा सल्ला दिला जातो. जेणेकरुन शरीरात जास्त प्रमाणात द्रव साचल्यामुळे कोणतीही समस्या निर्माण होणार नाही.

वेळेत औषधं घ्या –

रुग्णांनी डॉक्टरांनी सांगितलेली औषधे वेळेवर घ्यावीत. जेणेकरून रक्तदाब, अॅनिमिया आणि इतर संसर्ग टाळता येतील.

हेही वाचा- दारुसह Viagra खाणं जीवावर बेतलं! मेंदू व किडनीवर काही सेकंदातच असा झाला प्रभाव

डॉक्टरांनी सांगितलेला आहार घ्या –

उच्च प्रथिने, कमी मीठ, कमी पोटॅशियम आहार घेण्याचा सल्ला दिला जातो. रुग्ण दररोज किती लघवी करतो यावर द्रव पदार्थांबाबतचे निर्बंध ठरवले जातात.

एक्‍सेस साइट –

कोणत्याही प्रकारच्या संसर्गासाठी दररोज एक्‍सेस साइट तपासा. तसेच त्या ठिकाणी लालसरपणा आला आहे का हे पहा. शिवाय दररोज एक्‍सेस साइटवर रक्त प्रवाह असावा आणि फिस्टुला साइटवर कंपन जाणवावे.

लॅब पॅरामीटर्स –

डायलिसिस रूग्णांनी हिमोग्लोबिन (Hb) आणि रक्तदाब (BP) इत्यादी सारख्या त्यांच्या सर्व महत्वाच्या लॅब पॅरामीटर्सचा लक्ष ठेवणे खूप महत्वाचे आहे. जेणेकरुन त्यांचे आरोग्य निरोगी रहावे.

व्यायाम –

नियमित व्यायाम केल्याने तुमचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत होते. तुमच्यासाठी कोणते व्यायाम योग्य असतील याबद्दल तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

चांगला संवाद –

या सर्व गोष्टींव्यतिरिक्त, डायलिसिस रुग्णांनी त्यांच्या रुग्णालये आणि डायलिसिस सेवा देणाऱ्यांशी चांगला संवाद राखायला हवा.

महत्त्वाच्या सूचना –

डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे नियमित घ्या. धूम्रपान आणि अल्कोहोलचे सेवन टाळा, ज्यामुळे तुमच्या किडनीवर परिणाम होऊ शकतो. जर तुम्हाला उच्च रक्तदाब आणि मधुमेह असेल तर तुमच्या रक्तातील साखरेची नियमित तपासणी करा आणि ती नियंत्रणात ठेवा. तुमच्या नेफ्रोलॉजिस्टने शिफारस केलेल्या लसीकरण वेळापत्रकाचे पालन करा, नियमित हिपॅटायटीस बी टायटर्स घ्या आणि दरवर्षी अँटी-फ्लू शॉट घ्या. या उपयुक्त टिप्स पाळल्यास रुग्णांना पुन्हा पुन्हा हॉस्पिटलमध्ये जाण्याचे प्रमाण कमी होऊ शकते.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे, अधिकच्या माहितीसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा)

मराठीतील सर्व हेल्थ ( Health-tips ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 11-03-2023 at 13:36 IST