scorecardresearch

नाश्ता टाळल्यास काय होते? जाणून घ्या याचे आरोग्यावर होणारे परिणाम

नाश्ता टाळणे आरोग्यासाठी कसे नुकसानकारक ठरते जाणून घ्या

breakfast
(Photo: Freepik)

बदललेल्या जीवनशैलीचा सर्वात जास्त परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. तरीही आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. व्यस्त शेड्युलमुळे अनेकांना शांतपणे जेवायलाही वेळ मिळत नाही. अशात सकाळी कामाची गडबड, ऑफिसला पोहोचण्याची घाई यामध्ये अनेकजण नाश्ता करणे टाळतात, पण या सवयीमुळे आरोग्याशी निगडित अनेक समस्या उद्भवतात. नाश्ता टाळल्याने काय होते जाणून घ्या.

नाश्ता टाळल्याने आरोग्यावर काय परिणाम होतो जाणून घ्या

आणखी वाचा: हिवाळ्यात गूळ खाणे ठरेल आरोग्यासाठी वरदान! जाणून घ्या फायदे

वजन वाढणे
नाश्ता टाळल्याने वजन वाढू शकते. दिवसभरातील कामं करण्यासाठी शरीराला ऊर्जेची गरज असते. त्यामुळे सकाळी प्रोटीनयुक्त पदार्थांचा नाश्ता करावा. ज्यामुळे शरीराला आवश्यक ऊर्जा मिळेल. पण कामाच्या गडबडीमध्ये किंवा वजन कमी करण्याच्या हेतूने नाश्ता टाळला जातो, याउलट नाश्ता टाळल्याने वजन वाढू शकते. कारण नाश्ता केला नाही तर सतत भूक लागते, त्यामुळे काही तरी खात राहिल्याने वजन वाढू शकते.

ऊर्जेची कमतरता जाणवते
सकाळी नाश्ता न केल्यास शरीरात ऊर्जेची कमतरता जाणवते. नाश्ता न केल्यास दिवसभर थकवा जाणवू शकतो तसेच ऊर्जेची कमतरता जाणवल्याने कोणत्याही कामात लक्ष केंद्रित करणे कठीण होते.

केसगळती होऊ शकते
नाश्ता न केल्यास शरीरात प्रोटीनची कमतरता निर्माण होऊन केराटीनची पातळी अनियंत्रित होते, ज्यामुळे केसांची वाढ थांबून केसगळती होऊ शकते.

आणखी वाचा: उच्च रक्तदाबाचा त्रास असणाऱ्यांसाठी धोकादायक ठरू शकतात ‘हे’ पदार्थ; लगेच जाणून घ्या

डोकेदुखी, मायग्रेन
नाश्ता टाळल्यास डोकेदुखी, मायग्रेनचा त्रास होऊ शकतो. नाश्ता टाळल्यास रक्तातील साखरेचे प्रमाण अनियंतत्रित होते, यावर नियंत्रण मिळवण्यासाठी काही हॉर्मोन रिलीज केले जातात. ज्यामुळे मायग्रेन, डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो.

मराठीतील सर्व हेल्थ ( Health-tips ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 15-12-2022 at 20:16 IST
ताज्या बातम्या