Cough and Cold Cure: बदलत्या ऋतूमध्ये कोरडा खोकला खूप त्रासदायक असतो. ब्रॉन्कायटिस, न्यूमोनिया, दमा यांसारखे आजार, ऍलर्जी आणि सर्दी यांसारख्या फुफ्फुसांच्या समस्यांमुळे कोरडा खोकला होऊ शकतो. बदलत्या ऋतूत आहारातील बदलांमुळे काहींना कोरडा खोकलाही होतो. काही लोक थंड हवामानात थंड आणि तळलेल्या गोष्टींचे सेवन करतात किंवा धूम्रपान करतात. अशा व्यक्तींना कोरड्या खोकल्याचा त्रास होऊ शकतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोरडा खोकला मुले आणि प्रौढ दोघांनाही त्रास देऊ शकतो. ही एक अत्यंत अस्वस्थ स्थिती आहे ज्यामध्ये रुग्णाला वारंवार खोकला येतो ज्यामुळे त्याच्या छातीपर्यंत वेदना सुरू होतात. कोरड्या खोकल्यासाठी वैद्यकीय उपचार आहेत, परंतु तुम्ही काही घरगुती उपायांचा अवलंब करूनही कोरडा खोकला बरा करू शकता. भारतीय योगगुरू, लेखिका, संशोधक आणि टीव्ही पर्सनालिटी डॉ. हंसा योगेंद्र यांच्या मते, जेव्हा तुमच्या डोळ्यांत पाणी येऊ लागते, नाक बंद पडू लागते आणि खोकला त्रास देतो तेव्हा लगेच घरगुती उपाय करा. बदलत्या ऋतूत कोरडा खोकला बरा करण्यासाठी कोणते उपाय आहेत ते जाणून घेऊया.

सुंठ, काळी मिरी, पान आणि तुळस यांचा काढा प्या

जर तुम्हाला कोरडा खोकला आणि सर्दी होत असेल तर सुंठ, काळी मिरी, पान आणि तुळशीच्या पानांचा एक घोट प्या. या सर्व उत्तम औषधी वनस्पती प्रत्येक घरात असतात. जर तुम्हाला पान मिळत नसेल तर तुम्ही इतर गोष्टींचा काढा बनवू शकता. या सर्व औषधी वनस्पतींचा काढा बनवण्यासाठी एका भांड्यात दोन ग्लास पाणी घ्या आणि त्यात हे सर्व गोष्टी घाला. त्यांना १० मिनिटे चांगले पाण्यात उकळवा. पाणी अर्धवट राहिल्यावर गॅस बंद करावा आणि कोमट झाल्यावर तो गाळून प्यावा. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही त्यात गूळही वापरू शकता. दिवसातून दोनदा या काढ्याचे सेवन केल्यास कोरडा खोकला आणि सर्दीपासून आराम मिळेल.

( हे ही वाचा: ‘या’ ३ सुक्या मेव्याचे सेवन आयुष्य वाढवेल; फक्त दिवसातून किती खाल्ले पाहिजे ते जाणून घ्या)

काढ्याचे फायदे

काढ्यामध्ये असलेले सुंठ दाहक-विरोधी गुणधर्मांनी समृद्ध आहे जे सूज आणि वेदनापासून आराम देते. सुंठामध्ये असलेले जिंजरोल्स आणि शोगोल नावाचे पदार्थ शरीरातील दाहक उत्पादन कमी करून वेदना आणि सूज यापासून आराम देतात. काळी मिरी जळजळ कमी करते आणि सर्दी आणि फ्लूपासून आराम देते. या काढ्यामध्ये असलेल्या तुळस आणि सुपारीच्या पानांचे सेवन केल्याने तुमच्या शरीरातील अँटीबॉडीजचे उत्पादन वाढते.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Know the ayurvedic home remedies from expert for dry cough cold gps
First published on: 29-11-2022 at 17:42 IST