Know the best 4 home remedies to control high uric acid level gps 97 | Loksatta

युरिक ॲसिडची पातळी झपाट्याने कमी होईल; फक्त ‘या’ ४ पदार्थांचा आहारात समावेश करा

युरिक ॲसिडची वाढलेली पातळी कमी करण्यासाठी दिलेल्या उपायांचा अवलंब करा. नक्की फायदा होईल.

युरिक ॲसिडची पातळी झपाट्याने कमी होईल; फक्त ‘या’ ४ पदार्थांचा आहारात समावेश करा
photo(freepik)

युरिक ॲसिड हे तुमच्या रक्तामध्ये आढळणारे एक रसायन आहे जे तुमचे शरीर जेव्हा प्युरीन्स नावाचे पदार्थ तोडते तेव्हा तयार होते. मटार, पालक, मशरूम, सोयाबीन आणि अगदी बिअर यांसारख्या पदार्थांमध्ये प्युरीन्स आढळतात. शरीरात तयार होणारे बहुतेक युरिक ॲसिड रक्तात विरघळते आणि किडनीद्वारे ते फिल्टर करून शरीरातून काढून टाकले जाते.

जर तुमचे शरीर खूप जास्त प्रमाणात यूरिक ॲसिड तयार करत असेल किंवा किडनी ते पुरेसे काढून टाकू शकत नसेल, तर त्यामुळे हायपरयुरिसेमिया होऊ शकतो. रक्त तपासणीद्वारे शरीरात यूरिक ॲसिडचे उच्च प्रमाण शोधले जाऊ शकते.

शरीरात यूरिक ॲसिडचे प्रमाण जास्त असल्याने अनेक समस्या उद्भवू शकतात. ते सांध्यामध्ये क्रिस्टल्स म्हणून जमा होऊ शकते ज्यामुळे गाउट नावाची वेदनादायक स्थिती निर्माण होते. यामुळे किडनी स्टोन देखील होऊ शकतो आणि गंभीर प्रकरणांमध्ये किडनी निकामी होऊ शकते. तुमच्या शरीरातील युरिक ॲसिडचे प्रमाण साध्या रक्त तपासणीने शोधता येते.

सफरचंद व्हिनेगरचे सेवन करा: (Apple Cider Vinegar)

एका ग्लास पाण्यात एक चमचा सेंद्रिय सफरचंद सायडर व्हिनेगर मिसळा आणि दररोज प्या. ॲप्पल सायडर व्हिनेगर शरीरात नैसर्गिक क्लिन्झर आणि डिटॉक्सिफायर म्हणून काम करते. यात मलिक ॲसिड असते जे शरीरातून यूरिक ॲसिड तोडण्यास आणि काढून टाकण्यास मदत करते. सफरचंदात मॅलिक अॅसिडही असते. यूरिक अॅसिडच्या रुग्णांसाठी दिवसातून किमान एक सफरचंद खाणे फायदेशीर ठरू शकते.

( हे ही वाचा: ‘या’ रसांच्या सेवनाने किडनी स्टोन लघवीतून सहज बाहेर पडेल; ऑपरेशनची देखील गरज भासणार नाही)

अँटिऑक्सिडेंट समृद्ध फळे आणि भाज्या खा (Eat antioxidant rich fruits and vegetables)

मेरीलँड विद्यापीठाने केलेल्या अभ्यासानुसार, चेरी, ब्लूबेरी आणि स्ट्रॉबेरी यांसारख्या अँटीऑक्सिडंट-समृद्ध बेरीचे सेवन करणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. गडद रंगाच्या बेरीमध्ये अँथोसायनिन्स नावाचे फ्लेव्होनॉइड्स असतात जे सूज आणि कडकपणा कमी करण्यास मदत करतात. टोमॅटो आणि शिमला मिरची सारखे अल्कधर्मी पदार्थ देखील तुमच्या शरीरातील ॲसिडचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.

अजवाइन बिया (Celery seeds)

सेलेरी बिया ओमेगा -६ फॅटी ॲसिड आणि इतर diuretic तेलाने समृध्द असतात. diuretic तेल किडनीला यूरिक ॲसिड बाहेर काढण्यास मदत करतात. याचे सेवन केल्याने शरीरातील सूज कमी होते. दिवसातून एकदा अर्धा चमचा वाळलेल्या अजवान बियांचे सेवन केल्याने तुम्ही यूरिक ॲसिड नियंत्रित करू शकता.

( हे ही वाचा: तूपाचे सेवन ‘या’ ५ आजारांमध्ये ठरते विषासमान; तज्ज्ञांकडून जाणून घ्या तूप कोणी खावे आणि कोणी नाही)

उच्च फायबरयुक्त पदार्थांचे सेवन करा ( High fibre-foods)

युनिव्हर्सिटी ऑफ मेरीलँडने केलेल्या अभ्यासानुसार, रक्तातील यूरिक ॲसिडची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी उच्च फायबरयुक्त पदार्थांचा आहारात समावेश केला पाहिजे. फायबर तुमच्या रक्तातील अतिरिक्त यूरिक ॲसिड शोषून घेते आणि ते तुमच्या शरीरातून बाहेर काढण्यास मदत करते. ओट्स, केळी आणि ज्वारी आणि बाजरी यांसारखी धान्ये विद्राव्य फायबरचे चांगले स्रोत आहेत.

मराठीतील सर्व हेल्थ ( Health-tips ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-12-2022 at 20:27 IST
Next Story
हिवाळ्यात जास्त गरम पाणी पिणे ठरू शकते नुकसानकारक; जाणून घ्या याचे दुष्परिणाम