If the body lacks iron these symptoms are seen See how much iron you need by age | Loksatta

शरीरात लोह कमी झाल्यास दिसतात ‘ही’ लक्षणं; पाहा वयानुसार तुम्हाला किती लोह गरजेचं आहे

शरीरातील लोहाच्या कमतरतेची लक्षणे कशी ओळखायची त्याबाबतची माहिती तज्ज्ञांकडून जाणून घेऊया

Iron deficiency symptoms
लोह हे शरीरासाठी आवश्यक असे पोषक तत्व आहे, ते शरीरात ऑक्सिजन पोहोचवण्याचे काम करते. (Photo : Freepik)

लोह हे शरीरासाठी आवश्यक असे पोषक तत्व आहे, ते शरीरात ऑक्सिजन पोहोचवण्याचे काम करते. लोह हा हिमोग्लोबिनचा एक महत्वाचा घटक आहे. लोहाच्या मदतीने शरीरात हिमोग्लोबिन तयार होते. जेव्हा शरीरात लोह कमी होते तेव्हा हिमोग्लोबिन पुरेशा प्रमाणात तयार होत नाही. ज्याचा शरीराच्या सर्व अवयवांवर परिणाम दिसून येतो. लोह हे एक प्रकारचे खनिज आहे जे लोकांना जगण्यासाठी खूप गरजेचं आहे.

लोह हे अनेक प्रथिने आणि एन्झाईम्सचा एक भाग असून ते शरीरासाठीचे आवश्यक घटक आहे. लोह आपल्या शरीराला निरोगी ठेवण्यास मदत करते. जे आपले केस गळणे थांबवते, जखमा भरण्यास मदत करते, प्रतिकारशक्ती सुधारते आणि त्वचा निरोगी ठेवते असे अनेक फायदे लोहाचे आपल्याला होतात.

हेही वाचा- नखांमध्ये आणि केसात होणारे ‘हे’ बदल थायरॉईड आजाराचे संकेत असू शकतात; ‘ही’ लक्षणे दिसतात वेळीच सावध व्हा

स्नायू आणि मेंदूच्या विकासासाठी लोह खूप महत्वाचे आहे. शरीरात पुरेशा प्रमाणात लोह असल्यास शरीरातील ऊर्जा टीकून राहते. शरीरासाठी उपयुक्त असणाऱ्या या खनिजामध्ये कमतरता होताच त्याची लक्षणे शरीरात दिसून येतात. या समस्येवर वेळीच उपचार न केल्यास ती वाढू शकते. पण सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे शरीरात लोहाची कमतरता झाल्याची लक्षणे कोणती आणि ती कशी ओळखायची ?

हेही वाचा- दह्यात जिरे पूड मिसळून खाल्ल्यास ‘या’ ४ आजारात मिळतो लगेच आराम? फक्त दही खाण्याची योग्य वेळ जाणून घ्या

कानपूरमधील गॅस्ट्रो लिव्हर हॉस्पिटलचे डॉ. व्हीके मिश्रा यांच्या मते, लोहाच्या कमतरतेमुळे अॅनिमियाची समस्या उद्भवते जी सर्वात सामान्य समस्या आहे. जेव्हा शरीरात लोहाची कमतरता असते तेव्हा त्याची लक्षणे शरीरात दिसू लागतात. शरीरातील लोहाच्या कमतरतेची लक्षणे कशी ओळखायची त्याबाबतची माहिती तज्ज्ञांकडून जाणून घेऊया.

लोहाच्या कमतरतेची लक्षणे –

  • शरीरात सतत थकवा येणे.
  • चालताना दम लागणे.
  • जिभेवर सूज किंवा लालसरपणा येणे आणि वेदना होणे.
  • कमकुवत आणि ठिसूळ नखे.
  • डोकेदुखी, चक्कर येणे.
  • अशक्तपणा येणे, हात आणि पाय थंड पडणे.
  • त्वचा सैल पडणे.
  • छातीत दुखणे हे देखील आयर्नच्या कमतरतेचे लक्षण असू शकते.

वयोमानानुसार रोज शरीरात लोह किती प्रमाणात असावे हे जाणून घेण्यासाठी खालील तक्ता पाहा –

हेही वाचा- फळं खाताना ‘या’ ५ चुका आतड्या खराब करतात! जाणून घ्या सेवनाची योग्य पद्धत व वेळ

वयपुरुषमहिला
जन्मापासून ते 6 महिन्यांपर्यंत0.27 MG 0.27 MG
7 ते 12 महिने11 MG11 MG
1 ते 3 वर्षे7 MG7 MG
4 ते 8 वर्षे10 MG10 MG
9 ते 13 वर्षे8 MG 8 MG
14 ते 18 वर्षे11 MG15 MG
19 ते 50 वर्षे8 MG18 MG
51 वर्षांवरील8 MG8 MG

मराठीतील सर्व हेल्थ ( Health-tips ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-02-2023 at 19:04 IST
Next Story
दह्यात जिरे पूड मिसळून खाल्ल्यास ‘या’ ४ आजारात मिळतो लगेच आराम? फक्त दही खाण्याची योग्य वेळ जाणून घ्या