Can Lemon Salt And Mustard Oil Remove Yellow Teeth : पिवळे दात केवळ तुमच्या सौंदर्यातच अडथळा निर्माण करीत नाहीत, तर ते दात, हिरड्यांशी संबंधित अनेक आरोग्य समस्यांनाही आमंत्रण देऊ शकतात. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे आणि तोंडाची स्वच्छता न ठेवल्यामुळे दातांवर पिवळी घाण साचते. तसेच पिवळे दात व दुर्गंधी यांमुळे तुमचा आत्मविश्वास कमी होतोच; पण इतरांशी संवाद साधताना अस्वस्थता आणि लाजिरवाणे देखील वाटू शकते.

दात दुखणे, हिरड्या सुजणे, तोंडातून दुर्गंधी येणे याचबरोबर दात पिवळे दिसणे या समस्या आपल्यातील अनेकांना उद्भवत असतात. यासंबंधित अनेक उपाय सोशल मीडियावर अनेक जण सांगत असतात. पण, त्यांच्यावर विश्वास ठेवायचा का असा प्रश्न नेहमीच पडतो. आता कंटेंट क्रिएटर मंजू मित्तल यांनी एक हॅक शेअर केला आहे.

तर हॅक असा आहे की, फक्त अर्धा लिंबू, थोडंसं खडा मीठ आणि मोहरीचे तेल घ्या आणि तुमच्या दातांना चोळा. यामुळे तुमचे दात लगेच पांढरे होऊ शकतात. मोहरीचे तेल पिवळे दात पांढरे होण्यासाठी सर्वोत्तम काम करतात. कच्च्या मोहरीच्या तेलाची चव चांगली नसली तरीही तुमचे दात पांढरे होण्यासाठी जादुई काम करू शकते.

तर यावर उपाय म्हणून डेंटल लेझर्सच्या बीडीएस, एमडी डॉक्टर गुणिता सिंग द इंडियन एस्क्प्रेसला म्हणाल्या की, पिवळसर दात कधी कधी लाजीरवाणे वाटू शकतात. पण, त्यावर उपाय करायचा असेल तर सर्वोत्तम मार्ग म्हणजे आपल्या दंतवैद्याकडे जाणे. दंतवैद्य तुमच्या दातांना फक्त ३० मिनिटांत पांढरे आणि स्वच्छ करून देऊ शकतात. हे उपचार दवाखान्यात अगदी सोप्या पद्धतीने केले जातात आणि यामुळे तुमचा चेहरा देखील अधिक आकर्षक दिसतो.

तुम्ही खाऊ शकणारी कोणतीही वस्तू तुमच्या दातांवर तुम्ही लावू शकता. तसेच क्लिनिकमध्ये दात पांढरे करण्यासाठी प्रक्रिया करत असतानाही सर्व गोष्टींचा अतिरेक हानिकारक असतो. त्याचप्रमाणे मोहरीचे तेल, सैंधव मीठ आणि लिंबू, महिन्यातून एकदा वापरणे सुरक्षित आहे. पण, मीठ आणि मोहरी दोन्ही हिरड्यांसाठी त्रासदायक ठरू शकतात. पण, जर तुम्ही हा प्रयोग दररोज सुरु ठेवला तर हिरड्यांच्या आरोग्याला नुकसान पोहचू शकते ; असे डॉक्टर सिंग म्हणाले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लिंबूमध्ये सायट्रिक ॲसिडचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे रोज मोहरीचे तेल, सैंधव मीठ आणि लिंबू यांनी दात घासल्यामुळे दातांची संवेदनशीलता वाढू शकते. डॉक्टर सिंग यांच्या मते, घरगुती उत्पादनांवर कोणतेही नियंत्रण नसते कारण ते सहज उपलब्ध असतात. त्यामुळे दातांसाठी स्ट्रॉबेरी आणि केळीसारखे इतर उपाय देखील आहेत. स्ट्रॉबेरी दातांवर आणि केळीच्या सालीचा आतील भागात दातांवर घासणे अधिक सुरक्षित आहे ; असे डॉक्टर सिंग म्हणाले आहेत.