scorecardresearch

Premium

त्वचेला खाज सुटणे, पित्त उमटणे यामागे अस्वच्छताच नाही, ‘हे’ असतं मुख्य कारण; ताणाने येणारं पुरळ कसं दिसतं?

Skin Allergy: स्वच्छतेची काळजी घेऊन त्वचेचे त्रास टाळता येत नसतील तर त्यामागे फक्त अस्वच्छता हेच कारण नाही हे आपण समजून घ्यायला हवे.

Major Itching On Skin Acid Reflux Pitta Dosha On skin Can Be Caused Due To Stress How Stress Rash Looks Remedies For Dry Skin
'हा' पुरळ कसा दिसतो; आपण उपचार काय करू शकता? (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Stress Causing Itchy Skin, Remedies: अचानक अंगाला खाज सुटू लागणे, अगदी वाळवंटासारखी त्वचा कोरडी होणे, टोचणारे पुरळ अंगावर उठणे, त्वचा लाल होऊन जळजळ जाणवणे असा सगळा त्रास होत असेल तर आपला पहिला अंदाज असतो की घाम-धुळीमुळे होत असेल. मग आपण छान थंडगार पाण्याने आंघोळ करून येता पण तरीही हवं तितकं स्वच्छ वाटतच नाही व त्वचेची खाज सुद्धा कमी होत नाही. स्वच्छतेची काळजी घेऊन त्वचेचे त्रास टाळता येत नसतील तर त्यामागे फक्त अस्वच्छता हेच कारण नाही हे आपण समजून घ्यायला हवे.

मंडळी, तणाव हा जीवनाचा एक भाग आहे आणि आपले शरीर त्यावर विविध प्रकारे प्रतिक्रिया देत असते. काही लोकांसाठी, तणावाचा प्रभाव हृदयाची धडधड वाढणे, झोप न लागणे, केसगळती किंवा केस पांढरे होणे अशा रूपात दिसून येतो. तर काहींसाठी हा प्रभाव त्वचेवर सुद्धा दिसून येतो. त्यामुळे अंगावर उठणाऱ्या पित्ताच्या गाठी, खाज सुटणे, अस्वस्थ वाटणे या साऱ्यामागे तुमच्या मेंदू व मनावरील ताण- तणाव हे कारण असू शकते.

Which Medicine Tablets To Take reduce Acidity First Remedies To Detox Body And Remove Pitta Health Expert Advice
पित्त झाल्यास लगेच कोणती गोळी घ्यावी? डॉक्टरांनी सांगितले, सर्वात आधी घरी काय उपचार करता येईल
hives pitta skin problem
Health Special: तुम्हालाही पित्ताचा त्रास सतावतोय? कारण, लक्षणे व उपचार सर्व माहिती एका क्लिकवर मिळवा
अंगाला सतत खाज सुटत असेल तर करा हे घरगुती उपाय
शरीरावर खाज येते? करा ‘हे’ पाच घरगुती उपाय

आपल्याला तणावामुळे पुरळ का येतं?

कामिनेनी हॉस्पिटल्सचे वरिष्ठ त्वचातज्ज्ञ, डॉ. कुणा रामदास यांनी इंडियन एक्सस्प्रेसला सांगितले की, तणावामुळे शरीरातील कॉर्टिसॉल आणि अॅड्रेनालाईनसह विविध रसायने आणि हार्मोन्स सक्रिय होतात व शरीरातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतात. या शारीरिक प्रतिक्रियांमुळे रोगप्रतिकारक शक्ती आणि इतर शारीरिक कार्यांवर परिणाम होऊ शकतो, ज्यामुळे काहीवेळा पुरळ किंवा अंगावर पित्ताच्या गाठी उठणे यासारख्या प्रतिक्रिया होऊ शकतात. वर म्हटल्याप्रमाणे शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम होत असल्याने शरीर आजारी पडू नये म्हणून शरीराच अशा प्रकारे रसायने सक्रिय करत असते. पण हा सुरक्षा उपाय त्वचेवर पुरळ रूपात परिणाम करू शकतो.

मणिपाल हॉस्पिटल्सच्या डर्मेटोलॉजी आणि कॉस्मेटोलॉजी सल्लागार डॉ. रितिका षण्मुगम यांनी नमूद केले की, काही लोकांना अर्टिकेरिया नावाच्या स्वयंप्रतिकार स्थितीमुळे अंगावर पित्ताच्या गाठी येण्याचा त्रास जाणवू शकतो. हा त्रास ६ आठवड्यांपर्यंत टिकतो व काहीवेळा होणारा त्रास वाढूही शकतो.

तणावामुळे येणारा पुरळ कसा दिसतो?

डॉ रामदास यांच्या माहितीनुसार, तणावामुळे येणारा पुरळ व्यक्तीपरत्वे भिन्न दिसू शकतो. परंतु सामान्यत: त्वचा लाल होऊन खाज सुटणे आणि कधीकधी वेदनादायक फोड येणे असेही त्रास जाणवू शकतात. याचे प्रमाण व वेदनांची तीव्रता सुद्धा कमी- जास्त होऊ शकते. काही वेळा अचानक त्रास कमीही होतो तर काही वेळा प्रचंड वाढूही शकतो. पुरळ अनेकदा खाजत असते आणि शरीराच्या वेगवेगळ्या भागात पसरते.

हे ही वाचा<< तुप- गूळ, तीळ, खरबूज दिवसातील अर्धा तास व तुमची चिडचिड कशी कमी करू शकतात? दिवाळीनंतर होईल खास मदत

आपण यावर उपचार काय करू शकता?

डॉ षण्मुगम यांनी स्पष्ट केले की त्वरीत प्रथमोपचार करण्यासाठी त्वचेवर कोल्ड कॉम्प्रेस वापरू शकता. म्हणजे काय तर थंड कापड किंवा बर्फ कापडात धरून त्वचेवर प्रभावित भागात लावू शकता. अँटीहिस्टामाइन्स औषधे सुद्धा कामी येऊ शकतात. या औषधांमुळे तीव्र प्रकरणांमध्ये काही कालावधीसाठी लक्षणे नियंत्रित केली जाऊ शकतात. दीर्घकालीन ताणतणावांवर उपचार करण्यासाठी, तुम्ही दीर्घ श्वास, ध्यान आणि व्यायाम यासारख्या तंत्रांद्वारे तणाव दूर करू शकता. प्राथमिक उपचारांनी फरक जाणवत नसल्यास वेळीच तज्ज्ञांचा सल्ला घ्यायला विसरु नका.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Major itching on skin acid reflux pitta dosha on skin can be caused due to stress how stress rash looks remedies for dry skin svs

First published on: 13-11-2023 at 11:40 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×