DIY Makeup Tips : हल्ली सुंदर दिसण्यासाठी अनेक स्त्रिया विविध प्रकारच्या मेकअप प्रोडक्ट्सचा वापर करतात. पण कल्पना करा की, तु्म्ही मेकअप बॅगमधील तुमचा आवडता मस्करा डोळ्यांना लावल्यानंतर डोळे अचानक लाल झाले, खाज सुटू लागली तर… विचार करूनच थोडी भीती वाटली ना? पण, ही परिस्थिती तुमच्या विचारांपेक्षा अधिक सामान्य आहे. कारण चेहऱ्यावर वारंवार एक्सपायर्ड मेकअप प्रोडक्ट्स वापरल्यास याहूनही भयानक परिणाम तुमच्या शरीरावर होत असतात

आजही तुमच्यापैकी अनेक महिला आवडती काजळ पेन्सिल किंवा लिपस्टिक एक्सपायर्ड झाली तरी वारंवार वापरतात. पण, अशा एक्सपायर मेकअप प्रोडक्ट्सचा वापर करणे शरीरासाठी किती घातक असते याविषयी हैदराबादमधील हायटेक सिटी येथील केअर हॉस्पिटल्सच्या ज्येष्ठ त्वचारोगतज्ज्ञ डॉ. स्वप्ना प्रिया यांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सविस्तर माहिती दिली आहे.

Can eggs help diabetic patient to control blood sugar
मधुमेही व्यक्तींनी अंडी खाल्ल्यास रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते का? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात..
forever particles marathi news, forever particles latest marathi news
विश्लेषण : जगभर पिण्याच्या पाण्यात आढळतात घातक `फॉरएव्हर पार्टिकल्सʼ… त्यांचे उच्चाटन अवघड का असते?
Overhydration: This is what happens if you drink too much water What Is Overhydration
सावधान.! जास्त पाणी पिणे आरोग्यासाठी ठरते धोकादायक; वजनानुसार दररोज किती पाणी प्यावे?
Eating walnuts on an empty stomach in the morning
अक्रोड खाताना ‘ही’ योग्य वेळ, पद्धत व प्रमाण पाळल्यास मेंदू होईल तल्लख; तुमच्या शरीरात काय बदलेल?

डॉ. स्वप्ना प्रिया यांनी सांगितले की, एक्सपायर्ड मेकअप प्रोडक्ट्सच्या वापरामुळे तुमच्या शरीरावर गंभीर परिणाम होऊ शकतात. त्यामुळे तुमची मेकअप बॅग ही नियतपणे तपासणे निरोगी त्वचा आणि एकूण आरोग्यासाठी फार महत्त्वाचे आहे.

चेहऱ्यावर एक्सपायर मेकअप प्रोडक्ट्सचा वापर केल्यास काय होते?

१) त्वचेची जळजळ : कोणत्याही मेकअप प्रोडक्टमधील रासायनिक रचना कालांतराने बदलते, त्यामुळे तुम्ही चेहऱ्यावर जेव्हा एक्सपायर मेकअप प्रोडक्ट्स वापरता तेव्हा चिडचिड, लालसरपणा आणि त्वचेचा कोरडेपणा वाढण्याची शक्यता असते. काही मेकअप प्रोडक्ट्समध्ये बॅक्टेरियाची वाढ होऊ शकते.

२) अॅलर्जी : एक्सपायर मेकअप प्रोडक्ट्सच्या वापराने तुम्ही यापूर्वी कधीही सामना न केलेल्या कोणत्याही प्रकाराच्या अॅलर्जीचा सामना करावा लागू शकतो. यात सूज येणे, खाज सुटणे आणि जळजळ होणे ही प्रमुख लक्षणे दिसू शकतात, ज्याकडे दुर्लक्ष करू नये.

३) संक्रमण : मस्करा आणि आयलाइनरसारखी डोळ्यांना वापरण्यात येणारी मेकअप प्रोडक्ट्समध्ये बॅक्टेरिया लगेच तयार होतात. विशेषत: त्यांची एक्सपायरी डेट जवळ आली असेल आणि ते जर तुम्ही वापरले तर डोळ्यांच्या बुबुळामध्ये संसर्ग होण्याचा धोका वाढतो.

एक्सपायर मेकअप वापरण्याचे दीर्घकालीन परिणाम आणखी हानिकारक असू शकतात.

४) त्वचेच्या गंभीर समस्या : एक्सपायर मेकअपचा वारंवार वापर केल्यास त्वचारोग आणि अकाली वृद्धत्व यांसारख्या त्वचेच्या गंभीर समस्या उद्भवू शकतात.

५) त्वचेचा आजार असणाऱ्यांना अधिक धोका : जर तुमची त्वचा संवेदनशील असेल किंवा एक्जिमासारखा आजार असेल, तर एक्सपायर मेकअपमुळे परिस्थिती आणखी खराब होऊ शकते.

६) गंभीर आरोग्य समस्यांचा धोका : काहीवेळा मेकअप प्रोडक्ट्सच्या सततच्या वापरामुळे त्यात हानिकारक बॅक्टेरिया तयार होतात. अशावेळी ते मेकअप प्रोडक्ट्स वापरल्यास गंभीर आरोग्य समस्या उद्भवू शकतात. विशेषत: डोळ्यांसारख्या संवेदनशील भागात तुम्ही एखादे एक्सपायर प्रोडक्ट वापरल्यास धोका अधिक वाढतो.

‘या’ समस्यांपासून दूर राहण्याचे उपाय

१) लेबल चेक करा : कोणतेही मेकअप प्रोडक्ट वापरत असाल तर आधी त्यावरील लेबल चेक करा. जर प्रोडक्ट एक्सपायर झाले असेल तर लगेच फेकून द्या, कारण एक्सपायर प्रोडक्ट त्वचेसाठी धोकादायक ठरू शकतात.

२) योग्य पद्धतीने स्टोअर करा : मेकअप प्रोड्क्टससाठी उष्णता आणि दमट वातावरण योग्य मानले जात नाही. अशावेळी तुम्ही मेकअप प्रोडक्ट्स थेट सूर्यप्रकाशापासून दूर थंड, कोरड्या जागी ठेवले पाहिजेत.

३) सर्व प्रोडक्ट्स स्वच्छ सुरक्षित ठेवा : मेकअप प्रोडक्ट्समध्ये बॅक्टेरिया, फंगस निर्माण होऊ नयेत यासाठी ब्रश आणि अॅप्लिकेटर नियमितपणे स्वच्छ करा.

४) कोणालाही तुमचे मेकअप प्रोडक्ट्स वापरण्यास देऊ नका : तुम्ही तुमचे मेकअप प्रोडक्ट्स दुसऱ्यांना वापरण्यासाठी देऊ नका, यामुळे बॅक्टेरिया आणि संक्रमणाचा धोका वाढतो.

५) लिमिट सेट करा : प्रत्येक मेकअप प्रोडक्ट्सची लाइफस्पेस वेगवेगळी असते. यात मस्कारा आणि आयलाइनर सामान्यत: पावडरपेक्षा लवकर संपते. त्यामुळे कोणतेही प्रोडक्ट्स किती दिवसापर्यंत वापरू शकतो याची तुम्ही तुमची लिमिट सेट करा.

‘ही’ गोष्ट कायम लक्षात ठेवा

१) तुमची त्वचा हा तुमच्या शरीरातील सर्वात महत्त्वाचा अवयव आहे, त्यामुळे त्याची काळजी घेणे फार महत्त्वाचे आहे. त्यामुळे कोणतेही मेकअप प्रोडक्ट वापरताना थोडी काळजी घ्या. प्रोडक्टची एक्सपायरी डेट लक्षात ठेवून योग्य प्रकारे स्वच्छ करून स्टोर करा. तुम्ही सुंदर दिसण्याच्या नादात तुमच्या आरोग्याशी तडजोड करू नका.

२) जर तुम्हाला तुमच्या मेकअप प्रोडक्ट्स वापराने चेहऱ्यावर काही वेगळे परिणाम दिसून आले किंवा अॅलर्जी झाली तर त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घ्या.