दररोजच्या धावपळीच्या आयुष्यात अनेकांना आपल्या आरोग्याकडे लक्ष देता येत नाही. अशा वेळी वेळ मिळेल तसे अनेक जण चांगले आरोग्य ठेवण्यासाठी प्रयत्न करत असतात. हल्ली वीकेंडला मॅरेथॉनमध्ये धावण्याची क्रेझ खूप वाढली आहे. यात तरुणांची संख्याही अधिक आहे, मात्र तुम्ही निरीक्षण केले असेल तर तुम्हाला जाणवेल की मॅरेथॉनमध्ये धावल्याने आपले पाय खूप जास्त दुखतात, ज्यामुळे फिजिक्स स्ट्रेस वाढतो.

मॅरेथॉनमध्ये धावल्यानंतर आपल्या स्नायूंवर कसा परिणाम होतो आणि त्यातून कसं स्वत:ला बाहेर काढायचं, याबाबत असे अनेक समज-गैरसमज आहेत. गुरुग्राम येथील मॅरेंगो आशिया हॉस्पिटलचे डायरेक्टर आणि एचओडी डॉ. हेमंत शर्मा यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला याविषयी सविस्तर माहिती दिली. चला तर मग जाणून घेऊ या.

How To Take A Deep Sleep with an eye mask To improve memory and concentration Important Sleeping Guide During 10th 12th Exams
झोपण्याआधी डोळ्यावर ‘ही’ वस्तू लावल्याने स्मरणशक्ती व एकाग्रता सुधारते? परीक्षांच्या काळात तज्ज्ञांची महत्त्वाची माहिती
मुंबई : रस्ते फर्निचर कामासाठी नव्याने निविदा प्रक्रिया?लोकायुक्तांकडे सुनावणी सुरू असताना २११ कोटींचा नवा प्रस्ताव
women murdered in Kenya
विश्लेषण : केनियात महिलांच्या इतक्या प्रमाणात हत्या का होताहेत? काय आहे ‘डार्क व्हॅलेंटाइन’ चळवळ?
OBC
ओबीसींचा खरा शत्रू कोण?

हेही वाचा : Health special: तुम्हाला होणाऱ्या वेदनेची तीव्रता कशावर ठरते?

मॅरेथॉन धावणं आपल्या पायाच्या स्नायूंसाठी फायदेशीर असते ?

मॅरेथॉनमध्ये धावताना आपल्या पायांच्या स्नायूंचा चांगला वापर होतो पण खूप लांब अंतर धावल्यामुळे कधी कधी स्नायूंवर ताणही पडण्याची शक्यता असते. अशा वेळी पायांच्या आतील स्नायूंना स्थिरता हवी असते ज्यामुळे अँकल स्नायूंवर ताण येतो.

जर आपण अनवाणी पायाने किंवा मिनिमॅलिस्ट शूज घालून धावले तर स्नायूंच्या दुखण्यावर आराम मिळतो का?

जेव्हा आपण अनवाणी पायांनी किंवा मिनिमॅलिस्ट शूज घालून मॅरेथॉनमध्ये धावतो तेव्हा स्नायूंवर पडणारा स्ट्रेस आपण टाळू शकतो.
कारण यामुळे पायांच्या स्नायूंवर जास्त ओझं पडत नाही. पण अनवाणी पायाने धावल्याने काही इजा होण्याचीही शक्यता असते. अशा वेळी खालीलप्रमाणे आजार होण्याची शक्यता असते

हेही वाचा : कार्ब्सचे अतिसेवन आरोग्यासाठी हानिकारक आहे ? डायबिटीजचा वाढू शकतो धोका; वाचा सविस्तर…

१. प्लान्टर फेसियायटिस (Plantar Fasciitis)

टाचांचे हाड आणि पायांची बोटे यांना जोडणाऱ्या (Plantar fascia) टिश्यूमध्ये अनेकदा सूज येते पण आपण याकडे दुर्लक्ष करतो पण हे खूप चुकीचे आहे. सपाट पाय किंवा खूप उंच कमान असलेल्या लोकांना प्लांटर फेसियायटिस होण्याची अधिक शक्यता असते.

२. ॲकिलिस टेंडनिटिस (Achilles Tendonitis)

ॲकिलिस टेंडन हा पायांच्या स्नायूंच्या संबंधित आजार आहे. या आजारामुळे आपल्या पायाच्या पोटऱ्या दुखतात. वार्मअप न करता धावल्याने ॲकिलिस टेंडनचा त्रास जाणवतो.

स्नायूंचा व्यायाम

वेगवेगळ्या स्नायूंसाठी तुम्ही वेगवेगळे व्यायामाचे प्रकार ट्राय करू शकता, ज्यामुळे तुमचे पाय आणखी मजबूत होऊ शकतात आणि तुम्ही मॅरेथॉनमध्ये धावण्यास अधिक सक्षम होऊ शकता.

हेही वाचा : Health special: ऊन वाढले की, शरीरात नेमके कोणते व कसे बदल होतात?

डॉ. हेमंत शर्मा सांगतात की, प्रत्येकाचे शरीर हे मॅरथॉनमध्ये धावल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारे रिॲक्ट करते. अशा वेळी आपले शरीर काय संकेत देत आहे हे समजून घेणे कठीण जाते. अशा वेळी जास्त स्ट्रेस घेऊ नये आणि डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. आराम करावा आणि त्यातून बरे होऊन पुन्हा हळुवार ट्रेनिंग सुरू करावे, जे तुमच्या स्नायूंना हेल्दी ठेवण्यास मदत करू शकते.