Mary Kom: अनेक उपाय करूनही विनेश फोगट १०० ग्रॅम वाढलेले वजन कमी करू शकली नाही; ज्यामुळे तिला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अपात्र ठरविण्यात आले. अशीच घटना एकेकाळी स्टार बॉक्सर मेरी कोम यांच्याबरोबरही घडली होती; परंतु त्यावेळी त्या अतिरिक्त वजन कमी करण्यात यशस्वी झाल्या होत्या. २०१८ मध्ये पोलंडमधील सिलेशियन ओपन बॉक्सिंग स्पर्धेदरम्यान नियमित वजन तपासण्याच्या आधी मेरी कोम यांचे वजन ४८ किलोपेक्षा थोडे जास्त होते आणि त्यासाठी त्यांना अपात्र ठरविले जाण्याचा धोका होता. मात्र, मेरी कोम यांनी तत्काळ अतिरिक्त वजन कमी करून सुवर्णपदक जिंकले. मेरी कोम यांनी पीटीआयला सांगितले, "वजन वाढल्याचे कळताच मी एक तासासाठी दोरी उड्या मारल्या आणि माझे वजन आटोक्यात आणले." एखादा व्यायाम काही तासांत वजन कमी करण्याच्या दृष्टीने खरेच मदत करू शकतो का?हे जाणून घेण्यासाठी आम्ही तज्ज्ञांशी संपर्क साधला. श्री बालाजी ॲक्शन मेडिकल इन्स्टिट्यूट, दिल्लीच्या आहारतज्ज्ञ जया ज्योत्स्ना यांनी, पटकन वजन कमी करण्यासाठी प्रभावी फिटनेस दिनचर्येसह संतुलित आहाराची सांगड घालणे महत्त्वाचे आहे, असे सांगितले. वजन लवकर कमी करण्यासाठी फिटनेस रूटीनचे काही महत्त्वाचे घटक उच्च-तीव्रता मध्यांतर प्रशिक्षण (HIIT) तीव्र अॅक्टिव्हिटी आणि विश्रांती किंवा कमी तीव्रतेचा व्यायाम यांच्यातील पर्याय. यामुळे चयापचय वाढते आणि कमी वेळात भरपूर कॅलरी बर्न होते. शक्ती प्रशिक्षण शक्ती प्रशिक्षण मांसपेशी निर्माण करतात; ज्यामुळे विश्रांतीच्या अवस्थेत चयापचय दर वाढतो. त्यामुळे तुम्ही विश्रांती घेत असतानाही अधिक कॅलरी बर्न करू शकता. कार्डिओ वर्कआउट्स धावणे, दोरी उड्या मारणे यांसारख्या अॅक्टिव्हिटी, सायकलिंग किंवा पोहणे कॅलरी बर्न करण्यास आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्य सुधारण्यास मदत मिळू शकते. स्थिरता आणि प्रगती व्यायाम करताना हे समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे की, प्रत्येक व्यक्तीचे शरीर वेगळे आहे त्यामुळे काही व्यायाम काही व्यक्तींसाठी घातकही ठरू शकतात. वोक्हार्ट हॉस्पिटल्स, मिरा रोडचे सल्लागार आणि जनरल लॅप्रोस्कोपिक, मेटाबॉलिक व बॅरिएट्रिक सर्जरीसंबंधित डॉ. राजीव मानेक म्हणाले, “जर हाय-इंटेन्सिटी इंटरव्हल ट्रेनिंग (HIIT) किंवा धावणे एकासाठी फायदेशीर असेल, तर त्याचा फायदा दुसऱ्याला होईलच, असे नाही. काहींना चालणे, जिमिंग, सायकलिंग किंवा योगाचा फायदा होऊ शकतो. तुमच्यासाठी काय चांगले आहे हे तुम्ही समजून घेणे आवश्यक आहे आणि प्रशिक्षक किंवा तज्ज्ञांच्या मदतीने त्यानुसार फिटनेस पथ्ये बदलणे आवश्यक आहे.” हेही वाचा: पावसाळ्यात हिरव्या बदामाचे सेवन करणे खरंच फायदेशीर आहे का? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत… दोरी उड्यांमुळे कशी मदत होऊ शकते? वजन कमी करण्यासाठी दोरी उड्या मारणे हा एक उत्कृष्ट व्यायाम आहे. कारण- तो अल्प कालावधीत लक्षणीय प्रमाणात कॅलरीज बर्न करू शकतो. जया म्हणाल्या, "सरासरी एखादी व्यक्ती दोरी उड्या मारताना प्रतिमिनिट सुमारे १०-१६ कॅलरीज बर्न करू शकते. तसेच दोरीने उडी मारल्याने पाय, हात यांसह अनेक स्नायूंवर प्रभाव पडतो आणि त्यामुळे एकूणच स्नायू मजबूत होतात." जया यांनी सांगितले, "उच्च तीव्रतेच्या व्यायामामुळे हृदय आणि फुप्फुसाची क्षमता वाढते. कमीत कमी उपकरणे आणि कमी जागेत करता येईल अशा या व्यायामाने तग धरण्याची उत्तम क्षमता आणि सहनशक्ती निर्माण होते. कोणत्याही दिनचर्येमध्ये तुम्ही या व्यायामाचा समावेश करू शकता. उच्च तीव्रतेचा हा व्यायाम केल्यामुळे चयापचय वाढण्यास आणि चरबी लवकर कमी करण्यास मदत होते." दिनचर्येतील फिटनेस नमुना वॉर्म-अप ५-१० मिनिटे लाइट कार्डिओ (जॉगिंग, वेगाने चालणे). HIIT सत्र २०-३० मिनिट ते ३० सेकंदांपर्यंत जलद गतीने दोरी उड्या मारणे आणि ३० सेकंद विश्रांती किंवा हलक्या गतीने दोरी उड्या. शक्ती प्रशिक्षण २०-३० मिनिटे प्रमुख स्नायुगटांवर लक्ष केंद्रित करा. मनाला शांत करा ५-१० मिनिट स्ट्रेचिंग किंवा हलकी योगासने करा. आरोग्यदायी, संतुलित आहारासह अशा प्रकारचा व्यायाम केल्याने वजन कमी करण्याची परिणामकारक वाढेल. "कोणतीही फिटनेससंबंधीची नवीन दिनचर्या सुरू करण्यापूर्वी आरोग्य सल्लागारांचा सल्ला घ्या," असेही जया म्हणाल्या.