Full Fat Milk Is Good Or Bad: जवळपास सर्वच घरांमध्ये दूध आणि दुग्धजन्य पदार्थ दररोज खाल्ले जातात. फार पूर्वीपासून हृदयाच्या आरोग्याबद्दलच्या चर्चेत फुल फॅट दूध हे हानिकारक मानले जाते. कोलेस्ट्रॉल वाढवण्यासाठी आणि रक्तवाहिन्या ब्लॉक होण्यास फुल क्रीम दूध जबाबदार असते असे मानले जाते. आरोग्य मार्गदर्शक तत्त्वांमध्ये दीर्घकाळापासून कमी फॅट असलेल्या दुग्धजन्य पदार्थांचं सेवन करण्याचा सल्ला मात्र दिला जातो. जेणेकरून संतृप्त चरबी कमी होईल आणि हृदयावरील ताण कमी होईल. असं असताना एका नवीन अभ्यासात या मान्यतेला आव्हान देण्यात आलं आहे.
नवीन संशोधन काय सांगते?
अलिकडच्या एका नवीन संशोधनानुसार, तरूण वयात फुल फॅट डेअरी पदार्थांचे सेवन केल्याने हृदयरोगाचे एक मजबूत सूचक असलेल्या कोरोनरी आर्टरी कॅल्सीफिकेशनचा धोका कमी होऊ शकतो. या अभ्यासातून असे दिसून आले की, तरूणांमध्ये दुग्धजन्य पदार्थांचे सेवन कोरोनरी आर्टरी कॅल्सीफिकेशनशी संबंधित आहे. ते धमन्यांमध्ये कॅल्शियमचा संचय करते आणि हृदयरोगाचा धोका वाढवते.
अभ्यासादरम्यान अनेकांना कोरोनरी आर्टरी कॅल्सीफिकेशन विकसित झाले. महत्त्वाचं म्हणजे ज्यांनी त्यांच्या सुरूवातीच्या काळात जास्त दुग्धजन्य पदार्थांचे सेवन केले त्यांना कोरोनरी आर्टरी कॅल्सीफिकेशन विकसित होण्याचा धोका २४ टक्के कमी होता. असं असताना जेव्हा बीएमआय म्हणजेच वजन आणि उंचीवर आधारित शरीराचा आकार याचा समावेश आहे. जे नियमितपणे फुल फॅट दूध पितात किंवा फुल फॅट दही आणि चीज खातात त्यांना नुकसान होण्याची शक्यता कमी होती.
दुधातील चरबी शत्रू का नाही?
दुधातील चरबी म्हणजे कोलेस्ट्रॉल म्हणजेच हृदयरोग. पण मानवी शरीर इतके सोपे नाही. सर्व दुग्धजन्य पदार्थांमध्ये फॅटी अॅसिडचे मिश्रण असते. त्यापैकी काही प्रत्यक्षात चांगले कोलेस्ट्रॉल राखण्यास आणि जळजळ कमी करण्यास मदत करू शकतात. हे दोन घटक हृदयासाठी संरक्षणात्मक मानले जातात.
कमी फॅट किंवा पूर्ण फॅट यातला फरक काय?
जे लोक दुग्धजन्य पदार्थ जास्त खातात, त्यांचा बॉडी मास इंडेक्स थोडा कमी असतो. त्यामुळे असे दिसते की दुग्धजन्य पदार्थ समाधान देऊ शकतात आणि आहारात इतरत्र जास्त खाणे टाळू शकतात. अभ्यासात असे दिसून येते की, केवळ दूध आणि दह्यातील फॅटचे प्रमाण महत्त्वाचे नाही तर संपूर्ण दुग्धजन्य पदार्थ ज्यामध्ये फॅट, प्रथिने, खनिजे आणि इतर पोषक घटक असतात, ते शरीरावर वेगवेगळे परिणाम निर्माण करण्यासाठी एकत्र काम करू शकतात.
तज्ज्ञ का सांगतात?
हृदयरोग तज्ज्ञ किंवा पोषण तज्ज्ञ सांगतात की, केवळ फॅटच्या टक्केवारीवर आधारित दुग्धजन्य पदार्थांना चांगले किंवा वाईट म्हणणे चुकीचे ठरू शकते. त्यामुळे तुम्हाला जर आधीपासूनच हृदयरोगाचा धोका असेल तर तुमच्यासाठी फुल फॅट असलेले दुग्धजन्य पदार्थ हानिकारक ठरू शकतात. मात्र त्याचे प्रमाणही किती असावे हेदेखील विचारात घेणे गरजेचे आहे.
