scorecardresearch

Premium

Mental Health Special: मनावरचा पहारेकरी!

Mental Health Special: किशोरवयातील वाढत असलेल्या आत्महत्या चिंतेचा विषय बनत चालल्या आहेत.

Mind control
मनावरचा पहारेकरी (फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

जागतिकीकरण आणि व्यापारीकरणाचे अनेक क्षेत्रांवर सखोल परिणाम होत असल्याच आपण बघतच आहोत . अशा अनेक क्षेत्रांपैकी एक मानसिक आरोग्य आहे . लोक गावाकडून शहरात मोठ्या संख्येने स्थलांतरित होत आहेत . कामाचा वेग वाढल्याने संवाद कमी होतोय. एकत्र बसून चर्चा तर अशक्यच आहेत. आधीची एकत्र कुटुंब पद्धती जाऊन स्वतंत्र घरं झाली , मग घरांना कुंडी आली , आता तर CCTV cameras आलेत . आपुलकी लोप पावत चालली . एकाकीपण आलं. अशा Talking time च्या अभावामुळे Disconnection syndrome रौद्र रूप धारण करतोय. नैराश्याचं प्रमाण वाढतंय आणि त्यातूनच वाढतेय आत्महत्येची प्रवृत्ती!


राष्ट्रीय अपराध रिकाॅर्ड ब्यूरोच्या अहवालानुसार कोविडनंतर साल २०१९-२० मध्ये आत्महत्येच्या प्रमाणात १० टक्के तर २०२०-२१ मधे ७ टक्के इतकी वाढ झाली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने आत्महत्या १५ ते ३४ वयोगटात तिसरे प्रमुख कारण असल्याचे म्हटले आहे.
किशोरवयातील वाढत असलेल्या आत्महत्या चिंतेचा विषय बनत चालल्या आहेत. परीक्षेत मार्क कमी मिळणे , अपयश येणे, प्रेमभंग होणे अशी बरीच कारणे समोर येतानाच आपण बघतो, पण एकदा कशात फेल होणे म्हणजे आयुष्यात फेल होणे असे नाही हे समजावले तर नैराश्याच्या प्रमाणात कमी होऊन पुढील त्रास टाळता येऊ शकतो.

Gurmeet Choudhary Gives Cpr To man on raod
Video: गुरमीत चौधरीने भर रस्त्यात पडलेल्या व्यक्तीचा वाचवला जीव, अभिनेत्याची कृती पाहून तुम्हीही कराल कौतुक
Ketaki Chitale post on Nanded Govt Hospital death case
“संडास साफ करा हे त्याची जात बघून…”, नांदेडमध्ये रुग्णांच्या मृत्यूनंतर डीनबरोबर घडलेल्या प्रकारावर केतकी चितळेची पोस्ट
Viral Video Of Snake Hiding In House Under Bed In Bedroom Shocking Rescue Video Goes Viral
Viral Video: बेडवर झोपण्यासाठी गेला व्यक्ती; विचित्र आवाज आल्याने गादी उचलताच बसला धक्का
raghav-chadha-and-parineeti-chopra
लीला पॅलेसमध्ये परिणीती-राघवसाठी बुक करण्यात आला आलिशान महाराजा सुट, एका रात्रीचं भाडं तब्बल…

आणखी वाचा: Mental Health Special: मला वेड लागलंय…?


गरिबी , बेरोजगारी , शिक्षणाचा अभाव , अंमली पदार्थाचे सेवन , नात्यामधे तणाव , शारीरिक किंवा मानसिक छळ , घरगुती हिंसा , वैवाहिक समस्या अशा अनेक कारणांनी नैराश्य येऊन आत्महत्येची प्रवृत्ती वाढू शकते. तेव्हा Gatekeeper strategy म्हणजे मनावरचा पहारेकरी म्हणून खरंतर आपण सर्वजण काम करू शकतो. आता तुमच्या मनात प्रश्न असेल की नेमके आपण काय करु शकतो ? तर आपल्याला कोणाचे वर्तन नेहमीपेक्षा वेगळे वाटत असेल तर लगेच त्या व्यक्तीच्या आप्तेष्टांशी चर्चा करावी. झोप न येणे, एकेकटे राहणे , खोलीतून बाहेर न येणे , आळस करणे , शाळेत किंवा कामाला न जाणे , हताशपणाची भावना व्यक्त करणे , मरण्याचे विचार व्यक्त करणे , लहानसहान गोष्टींवर चिडणे किंवा मारणे अशी लक्षणे आढळल्यास त्वरित अशा व्यक्तीला जाऊन मदत करणे आवश्यक आहे. त्यांना जवळच्या मानसोपचार तज्ञांकडून मार्गदर्शन मिळणे महत्वाचे ठरते. यामुळे आत्महत्यांचे प्रमाण कमी होण्यास मदत होऊ शकते.
शालेय किंवा किशोरवयीन मुलांना कौटुंबिक सुसंवाद , शिक्षकांची साथ असणे योग्य आहे. आधीपासून अपयश पचवता आणि व्यक्त करता आले आणि पालकांकडून त्याला unconditional acceptance मिळाला तर मुलांचा आत्मविश्वास वाढून ते आयुष्याची लढाई लढायला खंबीर बनतील.


प्रत्येक राज्यात आत्महत्या प्रतिबंध धोरण असणे काळाची गरज आहे. हितगुज ( +९१ ०२२२४१३१२१२ ) मैत्रा (+९१ ०२२२५३८५४४७) आसरा ( ९८२०४६६७२६ ) टेलेमानस सेल ( १-८०० ८९१४४१६ ) अशा हेल्पलाईन्स अविरत कार्यरत असून त्याची माहिती लोकांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. Psychological autopsyच्या माध्यमातून आत्महत्येचे कारण कळून भविष्यात होणाया अशा घटना टाळता येणे शक्य आहे.
प्रसारमाध्यमांनी अशा घटनांची responsible reporting म्हणजे जबाबदार अहवाल करणे , सनसनाटी न करणे , अशा घटनांना राजकीय वळण न देणे महत्वाचे आहे . हेल्पलाईन्सची माहिती देणे , एखाद्याने नैराश्यावर कशी मात केली असा अहवाल दिल्यास ते खूप उपयुक्त ठरेल. “स्वच्छ भारत “ अभियानाइतकेच “शांत मन “ अभियान महत्वाचे आहे !

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mind control is necessary to avoid suicidal thoughts hldc psp

First published on: 08-09-2023 at 19:16 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×