Are Monk Fruit Sweeteners Safe For You : आरोग्य तज्ज्ञ व वेलनेस एन्थुसिअस्ट्स (Health experts and wellness enthusiasts) यांनी साखरेचे सेवन करण्याच्या नकारात्मक बाजूंवर भर दिला आहे. पण, साखरेला पर्याय म्हणून बाजारात उपलब्ध असलेले सर्व पर्याय आपल्यासाठी सुरक्षित आहेत का यावरसुद्धा विचार केला पाहिजे. तर यापैकी एक पर्याय म्हणजे माँक फ्रूट (Monk Fruit) . साखरेला पर्याय म्हणून हे फळ एक आरोग्यदायी पर्याय मानला जातो. पण, या गोड फळाच्या सेवनाने अनेकदा आरोग्याच्या धोक्यांबद्दलचे प्रश्न उद्भवतात. तर याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी दी इंडियन एक्स्प्रेसने आहारतज्ज्ञ प्रीती श्रीवास्तव यांच्याशी संवाद साधला. या संवादादरम्यान माँक फ्रूट मित्र आहे की शत्रू हे त्यांनी समजावून सांगितले.

माँक फ्रूटच्या (Monk Fruit) पावडरचा स्टीव्हियाप्रमाणेच स्वीटनर म्हणूनही वापर करतात. माँक फ्रूट म्हणजे एक लहान, हिरव्या रंगाचा खरबुज; जो मूळात चीनमधून आला आहे. या फळामध्ये असणारा गोडवा म्हणजे मोग्रोसाइड्स, जो साखरेपेक्षा १५०-२५० पेक्षा जास्त गोड असतो. माँक फ्रूटची पावडर म्हणजे फ्रूट स्वीटनर हे आरोग्यासाठी सुरक्षित मानले जाते आणि एफडीएने दिलेल्या GRAS कॅटेगरीमध्ये ते येते. हे स्वीटनर साखरेपेक्षा गोड असल्याने अन्न गोड करण्यासाठी ते कमी प्रमाणात वापरणे योग्य आहे, असे श्रीवास्तव यांनी सांगितले.

shukra guru gochar 2024 in dhanu vrushabha astrology
७ नोव्हेंबरनंतर ‘या’ तीन राशींचे नशीब उजळणार, गुरु शुक्राच्या राशी बदलाने मिळणार भरपूर सुख अन् आर्थिक लाभ
Todays Horoscope 9 November In Marathi
९ नोव्हेंबर पंचांग: कष्टाचे फळ, कुटुंबात गोडवा ते…
Akshay Kumar And Shreyas Talpade
“पहिल्या दिवसापासून त्याने मला…”, श्रेयस तळपदेने सांगितला अक्षय कुमारबरोबर काम करण्याचा किस्सा; म्हणाला…
Meenakshi Seshadri
“चित्रपटाच्या करारावर सही…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या ‘त्या’ गोष्टीमुळे कोसळले होते रडू; मीनाक्षी शेषाद्री आठवण सांगत म्हणाली, “त्यामुळे मी रडत…”
Testy bhindi fry khatti mitthi bhindi lady fingars recipe for lunch or diner
भेंडीची खट्टी -मीठी भाजी; ती पण चिकट न होता! पाहा सोपी मराठी रेसिपी
amol mitkari jitendra awhad
“मुंब्र्यात जाऊन जितेंद्र आव्हाडांना…”, मिटकरींचं आव्हान; अजित पवारांवरील टीकेनंतर संताप व्यक्त करत म्हणाले…
maharashtra assembly election
“लोकसभेला साहेबांना खूश केलं, आता विधानसभेला मला खूश करा”; अजित पवारांचं बारामतीकरांना आवाहन!
tomato rice
रोज रोज भाजी-पोळी खाऊन कंटाळला आहात? मग आज बनवा टोमॅटो पुलाव तेही झटपट

माँक फ्रूटच्या (Monk Fruit) पावडरचे फ्रूट स्वीटनर म्हणून सेवन करणे सुरक्षित असले तरीही माँक फ्रूटच्या पावडरच्या जास्त सेवनाने ॲलर्जी, पाचन अस्वस्थता आदी परिणामदेखील संभवतात, असे आहारतज्ज्ञ प्रीती श्रीवास्तव यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा…High Protein Breakfast : नाश्त्याला फक्त दोन अंडी नाही तर ‘हे’ तीन पर्याय तुम्हाला देतील भरपूर प्रोटीन; वाचा तज्ज्ञांचे मत

तुम्ही काय लक्षात ठेवले पाहिजे?

माँक फ्रूट (Monk Fruit) पावडर हे नवीन स्वीटनर आहे आणि दीर्घकालीन वापरासाठी त्यावर अजूनही अभ्यास चालू आहे. माँक फ्रूटच्या सुरक्षित वापराचा जो अभ्यास करण्यात आला आहे, तो प्राण्यांवर करण्यात आला आहे. परंतु, माँक फ्रूटचा लहान मुले, गरोदर महिला यांच्या पचनक्रियेवर होणाऱ्या परिणामांबाबत फारच कमी किंवा कोणताही अभ्यास झालेला नाही. त्यामुळे लहान मुले, गरोदर महिलांनी माँक फ्रूटचे मर्यादित प्रमाणातच सेवन केले पाहिजे, असे आहारतज्ज्ञ प्रीती श्रीवास्तव म्हणाल्या आहेत.

माँक फ्रूट (Monk Fruit) हे फरमेंटेबल करण्यायोग्य नसल्यामुळे एरिथ्रिटॉलसारख्या इतर साखर अल्कोहोलच्या तुलनेत ते गॅस्ट्रोइंटेस्टायनलमध्ये व्यत्यय आणत नाही. माँक फ्रूटमध्ये साखरेसारखी गोडी मिळवण्यासाठी एरिथ्रिटॉल नावाच्या साखरेच्या अल्कोहोलसह जोडले गेले आहे. एरिथ्रिटॉल हे कॉर्न आंबवून व्यावसायिकरीत्या बनवले जाते आणि शरीराद्वारे ते कमी प्रमाणात तयार केले जाते, असे आहारतज्ज्ञांनी सांगितले आहे. अभ्यासानुसार या शुगर अल्कोहोलचे जास्त सेवन हृदयविकाराशी निगडित समस्यांना आमंत्रण देऊ शकते. त्यामुळे माँक फ्रूट स्वीटनर खरेदी करताना एरिथ्रिटॉलचा समावेश नसलेले आणि एक्स्ट्रॅक्ट (अर्क) असलेले स्वीटनर खरेदी करण्याचा पर्याय तज्ज्ञांनी सुचवला आहे.

चाइल्ड हार्ट फाऊंडेशनचे संस्थापक डॉक्टर विकास कोहली यांनी, “माँक फ्रूट स्वीटनरचा समावेश असलेल्या नॉन-शुगर स्वीटनरचा (NSS) दीर्घकालीन वापर करण्यामुळे टाईप २ मधुमेह, हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधीचे रोग अन् मृत्यूचा धोका वाढू शकतो. त्यामुळे साखरेचे प्रमाण कमी करून, फळे, भाज्या यांसारखे नैसर्गिक शर्करा असलेले अधिक अन्नपदार्थ समाविष्ट केल्याने हृदयाचे आरोग्य चांगले राहण्यास हातभार लागतो“, असे आवर्जून सांगितले आहे,

आहारतज्ज्ञ प्रीती श्रीवास्तव यांनी, “फळे, सुका मेवा, संपूर्ण अन्नातून नैसर्गिक गोडवा मिळवणे नेहमीच अधिक आरोग्यदायी ठरू शकते. पण, तुम्हाला काहीतरी गोड खायचं असेल, तर तुम्ही खजुराचे सरबत किंवा पावडर, मनुका सरबत, स्टीव्हिया किंवा माँक फ्रूट एक्स्ट्रॅक्ट हे पर्याय निवडू शकता. दही किंवा भाज्यांचे सॅलड गोड करण्यासाठी साखर घालण्याऐवजी त्यात फळे वापरा“, असे सांगितले.