scorecardresearch

मूगडाळीचे सेवन ‘या’ ८ आजारांमध्ये ठरू शकतं विषासमान! श्वास घेणं होऊ शकतं कठीण, वाचा तज्ज्ञांचा सल्ला

Moong Dal side effect: नॅचरोपॅथी ,एमपीपीएससी इन नॅचरोपॅथीच्या डॉक्टर शालिनी यांनी दिलेल्या माहितीनुसार काही आजारात मुगडाळ ही ऍलर्जी वाढवण्याचे काम करू शकते,

मूगडाळीचे सेवन ‘या’ ८ आजारांमध्ये ठरू शकतं विषासमान! श्वास घेणं होऊ शकतं कठीण, वाचा तज्ज्ञांचा सल्ला
मुगडाळीचे सेवन 'या' ८ आजारांमध्ये ठरते विषासमान;वाचा तज्ज्ञांचा सल्ला (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Moong Dal side effect: डाळी आपल्या आहाराचा सर्वात महत्त्वाचा घटक असतात. अगदी कितीही कट्टर नॉन व्हेज खाणारा माणूस असला तरी घरच्या वरणभाताची सर कशालाच येऊ शकत नाही. महाराष्ट्रातील घराघरात मुगाच्या डाळीचे वरण अनेकदा केलं जातं. तूरडाळ पचनास काहीशी जड असल्याने अनेकदा तुरीच्या डाळीच्या आमटीत किंचित मूग डाळही शिजवली जाते. यामुळे वरणाला थोडं जाडसर स्वरूप येतं. आहारतज्ज्ञांच्या माहितीनुसार मुगाच्या डाळीमुळे शरीराला अनेक फायदे लाभतात, प्रोटीनची तर ही डाळ अक्षरशः खजिना आहे. जर तुम्ही वजन कमी करण्याच्या मोहिमेवर असाल तरी तुम्हाला मुगाच्या डाळीचा नक्कीच फायदा होऊ शकतो, सांध्यांची लवचिकता वाढवण्याचे कामही ही मूगडाळ करते. पण हे सगळे फायदे असूनही ८ आजारात मात्र मूगडाळीचे सेवन विषासारखे काम करू शकते.

नॅचरोपॅथी ,एमपीपीएससी इन नॅचरोपॅथीच्या डॉक्टर शालिनी यांनी दिलेल्या माहितीनुसार काही आजारात मुगडाळ ही ऍलर्जी वाढवण्याचे काम करू शकते, असे कोणते आजार आहेत हे आज आपण जाणून घेऊयात…

किडनी स्टोन

मुतखड्याचा त्रास असणाऱ्या रुग्णांनी मूग डाळीचे सेवन करणे अपायकारक ठरू शकते. मूगडाळीत ऑक्सलेट व प्रोटीनचे प्रमाण अधिक असते यामुळे मुतखड्याचा त्रास बळावण्याची शक्यता असते.

रक्तातील साखर कमी असल्यास..

रक्तातील साखरेचे प्रमाण कमी असल्यास मूगडाळीचे सेवन करणे टाळायला हवे. आहारतज्ज्ञांच्या माहितीनुसार मूगडाळीच्या सेवनाने रक्तातील साखरेचे प्रमाण आणखी कमी होण्याचा धोका असतो. यामुळे अनेक आजारांना आमंत्रण मिळू शकते. यामुळेच मूगडाळीचे व विशेषतः पॉलिश केलेल्या डाळीचे सेवन करणे टाळायला हवे.

रक्तदाब कमी असल्यास ..

कमी रक्तदाब असल्यास मूगडाळीचे सेवन हानिकारक ठरू शकते. याचे कारण म्हणजे मूगडाळीत अधिकांश प्रमाणात फॉस्फरस, कार्बोहायड्रेट व फायबर असतात यामुळे रक्तदाब कमी होऊ लागतो. जर तुम्ही तणावात असाल तर अशावेळी रक्तदाब कमी नसल्याशी पॉलिश डाळीचे सेवन वर्ज्य करावे.

हे ही वाचा<< ‘या’ ३ आजारात काजू करू शकतो विषासारखं काम; एका दिवसात किती काजू खाणे योग्य? पाहा तज्ज्ञांचा सल्ला

याशिवाय आपल्याला आर्थराइट्स, अस्थमा, ब्रोंकाइटिस,साइनस, स्पोंडलाइटिसचे त्रास जाणवत असतील तरी पॉलिश मुगडाळ आहारात समाविष्ट करणे टाळावे. दरम्यान एक महत्त्वाची बाब म्हणजे मुगडाळ ही थंडीत खाणे सुद्धा अपायकारक ठरू शकते याचे मुख्य कारण मूगडाळीत निसर्गतःच काहीसा चिकटपणा असतो यामुळे कफक वाढू शकतो. या डाळीच्या सेवनाने पोट लगेच भरल्यासारखे वाटते म्हणूनच योग्य प्रमाणात सेवन न केल्यास श्वसनात समस्यां येऊ शकतात.

(टीप: वरील लेख हा माहितीच्या आधारे लिहिण्यात आला आहे)

मराठीतील सर्व हेल्थ ( Health-tips ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-11-2022 at 17:51 IST

संबंधित बातम्या