Morning Habits to Help You Lose Weight: सध्याचे धावपळीचे जीवन, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि व्यायामाचा अभाव इत्यादी कारणांमुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत. मागील काही वर्षांपासून लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्व जण लठ्ठपणामुळे त्रस्त झाले आहेत. वाढते वजन ही आजच्या युगातील सर्वात मोठी समस्या आहे. वाढत्या वजनामुळे मधुमेह, रक्तदाब यांसारख्या अनेक आरोग्य समस्यांना आपण बळी पडू शकतो. वाढत्या वजनाचा सर्वात मोठा परिणाम पोटावर दिसून येतो. पोटाची चरबी वाढू लागते. हा लठ्ठपणा कमी करण्यासाठी मग विविध गोष्टींची मदत घेतली जाते. फक्त तुम्हाला आहार आणि जीवनशैलीशी संबंधित काही गोष्टींची काळजी घ्यावी लागेल. वजन कमी करण्यासाठी प्रशिक्षक जोशिया यांनी इन्स्टाग्रामवर सकाळी उठल्या उठल्या करायच्या पाच गोष्टी सांगितल्या आहेत, ज्यामुळे तुम्हाला वजन लवकर कमी करता येईल, असा दावा त्यांनी केला आहे. कोणत्या आहेत त्या गोष्टी, याबाबतचे वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे. चला तर मग जाणून घेऊयात.

१. एक ग्लास पाणी प्या

सकाळी उठल्यानंतर रोज १ ग्लास पाणी प्यायल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळतात. उठल्यावर १ ग्लास पाणी प्यायल्यास तुमची पचनक्रिया व्यवस्थित होते आणि वजन कमी करण्यास मदत मिळते. पाणी प्यायल्याने अन्नाचा साठा जास्त राहात नाही आणि वजन कमी होण्यास मदत मिळते.

Health Special Stomach gas causes symptoms and control measures hldc
Health Special: पोटातील गॅस: कारणे, लक्षणे आणि नियंत्रण उपाय  (भाग १)
ankita walawalkar aka kokan hearted girl first told to raj thackeray about her marriage
“लग्नाची बातमी सर्वात आधी राज ठाकरेंना…”, प्रेमाची जाहीर…
video shows sofa Made From Broken Chairs
VIRAL VIDEO : तुटलेल्या गोष्टी जोडण्याची कला, दोन माणसं बसतील असा बनवला सोफा; पाहा तरुणांचा जुगाड
diabetics foot ulcers problem increasing in diabetic patients
डायबेटिक फूटमुळे मोठ्या प्रमाणात रुग्णांना गमवावे लागतात प्राण!
Why Indian doctors prefer to go to the abroad
भारतातील डॉक्टर परदेशाची वाट का धरतात?
Papaya Leaf Water Benefits in Marathi
Papaya Leaf Water Benefits : आठवड्यातून तीनदा प्या पपईच्या पानांचे एक कप पाणी; जाणून घ्या मधुमेहापासून त्वचा-केसांच्या आरोग्यापर्यंतचे असंख्य फायदे
changing health economics and management are overburdening our government health system
आरोग्यव्यवस्थेचे बदलते अर्थकारण रुग्णाला मेटाकुटीला आणणारे
Use of plastic will be dangerous for agriculture
प्लास्टिकचा भस्मासूर शेतांना गिळंकृत करू पाहतोय…

२. उच्च प्रथिनेयुक्त नाश्ता खा

सकाळचा नाश्ता हा सर्वात महत्त्वाचा आहार असल्याचे म्हटले जाते. यामुळे दिवसभर काम करण्याची उर्जा मिळते. नाश्त्यामध्ये प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिजे भरपूर प्रमाणात असणे आवश्यक आहे. अंडी किंवा प्रोटीन शेक यांसारखे प्रथिनेयुक्त पदार्थ घ्या.

३. सकाळी व्यायाम करा

व्यायाम करणं वजन कमी करण्यासाठी गरजेचं आहे. कार्डिओ आणि स्ट्रेंथ ट्रेनिंगसह २०-३० मिनिटांसाठी करा. शारिरीक हालचाली जास्तीतजास्त होतील, याचा प्रयत्न करा.

(हे ही वाचा : रोज रोज केळी खाल्ल्याने वजन झपाट्याने कमी होऊ शकते? जाणून घ्या अन् गोंधळ दूर करा )

४. साखरयुक्त पदार्थ आणि पेये टाळा

साखरयुक्त पेय पिणं टाळा. यामध्ये कॅलरीजचे प्रमाण जास्त असते. आपण वेट लॉसदरम्यान, साखर खाणं किंवा पिणं टाळू शकता.

५. निरोगी आहार घ्या

वजन कमी करण्यासाठी आपल्याला आहाराकडे विशेष लक्ष द्यावे लागते. वजन कमी करण्यासाठी निरोगी आहारामध्ये भाज्या, पातळ प्रथिने, संपूर्ण धान्य, फळे आणि निरोगी चरबीयुक्त पदार्थ असले पाहिजेत. 

या सवयींवर भाष्य करताना, मुंबई येथील डॉ. संतोष पांडे म्हणाले की, “विशेषत: ज्यांना सकाळी उठण्यास त्रास होतो त्यांच्यासाठी, वजन कमी करण्यासाठी जीवनशैलीत बदल करणे आवश्यक आहे. पोटाची चरबी दुबळ्या लोकांमध्येही धोकादायक असते, कारण ती अवयवांवर विपरित परिणाम करते. पोटाची चरबी जाळण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची आणि जीवनशैलीत काही बदलांची गरज आहे. त्याचप्रमाणे झोपेच्या कमतरतेमुळे तुमची चयापचय क्रियादेखील कमी होते, ज्यामुळे अतिरिक्त चरबी कमी करणे कठीण होऊ शकते. त्यामुळे पुरेशी झोप आवश्यक आहे, असेही ते नमूद करतात.