Mouth Cancer Symptoms: तोंडात येणारे फोडप्रमाणेच, ही एक खूप सामान्य समस्या आहे, जी पोटदुखी किंवा व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे उद्भवते आणि साधारणपणे १-२ आठवड्यांत आपोआप बरी होते. परंतु जर हे फोड महिनोनमहिने बरे होत नसतील, वेदनाहीन असतील किंवा वारंवार येत असतील, तर त्यांच्याकडे दुर्लक्ष न करणे शहाणपणाचे ठरू शकते. वैद्यकीय शास्त्र आणि कर्करोग तज्ज्ञांच्या (ऑन्कोलॉजिस्ट) मते, “असे हट्टी फोड जे बराच काळ टिकून राहतात, ही केवळ एक साधी समस्या नसून, तोंडाच्या कर्करोगाचे प्रारंभिक लक्षण असू शकते. आपल्या सर्वांना माहित आहे की तोंडात येणारे फोड साधारणपणे एक ते दोन आठवड्यांत आपोआप बरे होतात. याच कारणामुळे बहुतेक लोक त्यांना गांभीर्याने घेत नाहीत.”

केआयएमएस हॉस्पिटल, ठाणे येथील इंटर्नल मेडिसिन कन्सल्टंट डॉ. अनिकेत मुळे यांनी क्वोरावरील माझ्या तोंडात आलेले फोड बरेच होत नाही , मी काय करावे?’ या प्रश्नाचे उत्तर दिले. डॉ. अनिकेत मुळे यांनी सांगितले की, तणाव, झोपेचा अभाव, चुकून गालाला जखम होणे, खूप मसालेदार पदार्थ खाणे, शरीरातील पाण्याची कमतरता आणि काही विशिष्ट पोषक तत्वांची कमतरता ही सामान्य आणि तात्पुरत्या तोंडातील अल्सरची कारणे असू शकतात. परंतु जेव्हा हे अल्सर १०-१५ पेक्षा जास्त असतात आणि महिनोनमहिने त्यांचा त्रास होत असेल, तर ताबडतोब डॉक्टरांना दाखवा.

कॅन्सरमुळे तोंडात येणारे फोड आणि सामन्यतः तोंड येणेर यांच्यातील फरक कसा ओळखावा

सामान्यतः तोंड आल्यानंतर (Aphthous Ulcers) ते लाल रंगाचे असतात ज्यामध्ये तीव्र वेदना किंवा आग होते. हे फोड ७-१० दिवसांमध्ये बरे होतात. तर कॅन्सरच्या सुरुवातीच्या टप्यात तोंडात येणारे फोड हे सहसा पांढरे किंवा गडद लाल रंगाचे असतात (Leukoplakia) ज्यामध्ये सुरुवातीला कोणतीही वेदना होत नाही.

तोडांत येणारे फोडबाबत धोका कसा ओळखावा

डॉ. मुळे यांच्या मते, जर तोंडातील फोड सामान्य फोडांपेक्षा वेगळे जाणवत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करू नये. तज्ज्ञांच्या मतानुसार, जर तोंडामध्ये एखादी जखम किंवा फोड दोन ते तीन आठवड्यांपेक्षा जास्त काळ राहत असेल , पुन्हा पुन्हा तोंड येत असेल, आकाराने मोठा होत असेल, त्यातून रक्त येत असेल किंवा सतत वेदना होत असेल, गिळताना त्रास होत असेल, विना कारण वजन कमी होत असेल, ताप किंवा अत्यंत थकवा यांसारखी लक्षणे जाणवत असतील तर लगेच डॉक्टरांशी संपर्क साधा.

तोंडातील ही लक्षणे इतर आजारांचेही संकेत देऊ शकतात का?

डॉ. मुळे यांनी यावर जोर दिला की, लोक अनेकदा तोंडाला शरीराच्या इतर भागांपेक्षा वेगळा अवयव मानतात; पण, तोंडात दिसणारी लक्षणे अनेकदा आरोग्याच्या मूळ समस्यांचे सूचक असू शकतात. त्यांनी स्पष्ट केले की, वारंवार होणारे तोंडातील अल्सर हे व्हिटॅमिन बी१२, लोह किंवा फोलेट यांसारख्या आवश्यक पोषक तत्वांच्या कमतरतेशी संबंधित असू शकतात. याव्यतिरिक्त, काही विशिष्ट संसर्ग, रोगप्रतिकारशक्तीचे विकार, चयापचयातील बिघाड आणि इतर दिर्घकाळ टिकणाऱ्या आजारांची सुरुवातीची लक्षणे देखील तोंडातील फोडांद्वारे दिसून येऊ शकतात.

केवळ घरगुती उपायांवर अवलंबून राहण्याविरुद्ध तज्ञांचा इशारा

तज्ञांनी नमूद केले की, तोंडातील फोडांवर घरगुती उपाय नेहमीच निश्चित समाधान देत नाहीत. डॉ. मुळे यांनी निदर्शनास आणले की, जेव्हा वारंवार तोंड येण्याचा त्रास होतो, तेव्हा अनेक लोक समस्येचे मूळ कारण आधी न ओळखता ओव्हर-द-काउंटर जेल किंवा पारंपरिक घरगुती उपायांचा अवलंब करतात. जरी या उपायांमुळे तात्पुरता आराम मिळत असला तरी, ते अनेकदा समस्येच्या मूळ कारणाकडे दुर्लक्ष करतात.

शरीरातील सूक्ष्म संकेत ओळखण्याचे महत्त्व

आपल्या शरीरात आजार विकसित होऊ लागताच, शरीर सूक्ष्म संकेत पाठवू लागते. डॉ. मुळे यांच्या मते, फक्त तोंडात येणे हे गंभीर आजाराचे लक्षण असेलच असे नाही; पण, तो दीर्घकाळ टिकून राहणे ही चिंतेची बाब आहे. अपेक्षित वेळेत बरे न होणारे कोणतेही लक्षण गांभीर्याने घेतले पाहिजे.

वेळेवर निदान का आवश्यक आहे?

तज्ज्ञांच्या मते, लवकर निदान केल्याने हे ठरवता येते की समस्या केवळ पौष्टिकतेच्या कमतरतेमुळे आहे, संसर्गाचा परिणाम आहे, की अधिक सखोल तपासणीची आवश्यकता असलेल्या स्थितीचे ते सूचक आहे. तज्ज्ञांच्या मते, अशा सूक्ष्म संकेतांकडे लक्ष दिल्याने आजारांचे लवकर निदान होते, ज्यामुळे अधिक प्रभावी उपचार आणि व्यवस्थापनास मदत होते.