MS Dhoni Fitness Secret : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी ‘कॅप्टन कूल’ म्हणून ओळखला जाते. आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून धोनीने जरी सन्यास घेतला असला तरी चाहत्यांना त्याच्याबाबतीत नवनवीन गोष्टी जाणून घ्यायला आवडते. तुम्हाला महेंद्रसिंग धोनीचे फिटनेस रहस्य माहितीये का? महेंद्रसिंग धोनीला त्याच्या दिनचर्येबद्दल विचारले असता, तो म्हणाला. “वयानुसार तंदुरुस्त राहण्यासाठी मी खूप खेळ खेळतो.”

युरोग्रिप टायर्स या युट्युब चॅनेलवर संवाद साधताना धोनी म्हणाला, “मी पूर्वीसारखा तंदुरुस्त नाही. आपण काय आहार घेतो, यावर खूप मेहनत घ्यावी लागते. मला तंदुरुस्त राहण्यासाठी विशिष्ट गोष्टी कराव्या लागतात. मी वेगवान गोलंदाज नाही त्यामुळे आम्हाला तितकं फिट राहण्याची आवश्यकता भासत नाही पण योग्य आहार घेणे आणि जिममध्ये वर्कआउट करणे याशिवाय विविध खेळ खेळणे, मला आरोग्यदायी फायदा मिळवण्यास मदत करतात.

dilip kumar
दिलीप कुमार झोपलेले असताना धर्मेंद्र त्यांच्या घरात घुसले होते; अभिनेते म्हणालेले, “मी घाबरत जिना उतरला अन्…”
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Khushi Kapoor : No-Dairy Diet
Khushi Kapoor : खुशी कपूर दुग्धजन्य पदार्थ खात नाही, तिने सांगितले यामागील कारण; वाचा, तज्ज्ञ काय म्हणाले…
विराटच्या अनुपलब्धतेमुळे संधी!श्रेयस अय्यरची प्रतिक्रिया; पहिल्या सामन्यातील निर्णायक खेळीबाबत समाधानी
MS Dhoni Gives Jersey Number 7 to His House Helicopter Shot Printed on Wall
MS Dhoni House: धोनीचं घर बनलं सेल्फी पॉईंट! जर्सी नंबर ७, विकेटकिपिंग आणि हेलिकॉप्टर शॉटने सजल्या घराच्या भिंती; पाहा VIDEO
NCP women district president resignations news in marathi
बुलढाणा : अजित पवार गटात वादळ! ; महिला जिल्हाध्यक्षांचा राजीनामा की निष्काशन…
nana patole criticized bjp and the prime minister excel at staying in limelight through events
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले, ” मोदींना ‘इव्हेंट’ करण्याची सवय जडली”
Khushi Kapoor
“माझा आत्मविश्वास…”, खुशी कपूरची तिच्या सौंदर्यावरून उडवली जात होती खिल्ली; किस्सा सांगत म्हणाली…

हेही वाचा : चहा ठरेल पिंपल्स, केसगळती आणि काळे डाग घालवण्यासाठी सर्वोत्तम उपाय! कॉन्टेन्ट क्रिएटरच्या ‘या’ रेसिपीवर तज्ज्ञ म्हणाले…

पाहा व्हिडीओ

धोनी पुढे सांगतो, “जेव्हा तुमची शारीरिक स्थिती चांगली असते, तेव्हा तुम्ही टेनिस, बॅडमिंटन किंवा फुटबॉलसारखे वेगवेगळे खेळ खेळू शकता. हे खेळ मला मग्न ठेवतात. तंदुरुस्त राहण्यासाठी हा एक सर्वोत्तम मार्ग आहे. कारण हे खेळ खेळताना कंटाळा येत नाही. तुम्ही ज्या व्यक्तीबरोबर खेळ खेळत असाल त्या व्यक्तीबरोबर तुम्ही धमाल करू शकता. त्यामुळे तुम्हाला प्रेरणा मिळते. तुम्हाला तंदुरुस्त राहायचे असेल किंवा तुम्हाला खेळ जिंकायचा असेल तर विविध खेळ खेळा”

विविध खेळ खेळण्याचे फायदे जाणून घ्या

फिटनेस ट्रेनर वरुण रतन यांच्या मते, वेगवेगळे खेळ खेळल्याने शरीरातील विविध स्नायूंवर आणि सांध्यांवर ताण येतो ज्यामुळे वारंवार होणाऱ्या दुखापतीची शक्यता कमी होते.

हेही वाचा : Seema Sajdeh : सीमा सजदेहने सांगितली स्किनकेअरमधली खास गोष्ट; त्वचेला चमकदार बनवणारा हा ट्रेंड तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल का? तज्ज्ञ म्हणतात…

ते पुढे सांगतात, “अमेरिकन जर्नल ऑफ स्पोर्ट्स मेडिसिनमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार, दरवर्षी आठ महिन्यांपेक्षा जास्त काळ एका खेळात घालवल्याने नितंब किंवा गुडघ्याच्या दुखापतीचा धोका जवळपास तिप्पट होतो.”
“कारण एकच खेळ वारंवार खेळल्यामुळे अनेकदा शरीराच्या विशिष्ट भागांवर जास्त झीज दिसून येते पण ऋतूनुसार वेगवेगळे खेळ खेळल्याने शरीराच्या विशिष्ट अवयवांना विश्रांतीसाठी वेळ मिळतो आणि मानसिक तणावाचा देखील धोका कमी होतो.” डॉ. रतन पुढे सांगतात.

Story img Loader