Nasal Microbiome: अ‍ॅलर्जिक ऱ्हिनाइटिस आणि दमा हे श्वसनाचे आजार आहेत. या आजारांनी जगभरातील लाखो लोक त्रस्त आहेत. हे आजार जीवनशैलीतल्या चुकीच्या सवयी, वाढते प्रदूषण, धूळ, बुरशी आण अ‍ॅलर्जन्सच्या संपर्कामुळे होतात. अ‍ॅलर्जिक ऱ्हिनाइटिसची लक्षणे म्हणजे वारंवार शिंका येणे, नाकात खाज येणे, नाकातून पाणी येणे आणि नाक चोंदणं. हा आजार कमकुवत प्रतिकारशक्तीचा परिणाम आहे. दुसरीकडे, दम्यामुळे श्वास घेण्यास त्रास होणे, छातीत जडपणा, खोकला आणि घरघर येणे असे प्रकार होतात. हे दोन्ही आजार केवळ शारीरिक अस्वस्थताच निर्माण करत नाही तर झोप, काम आणि दैनंदिन जीवनावरही परिणाम करतात.

पोर्तुगालमध्ये झालेल्या संशोधनानुसार, हे दोन्ही आजार नाकात असलेल्या विविध प्रकारच्या बुरशीशी संबंधित असू शकतात. या संशोधनामुळे या आजारांवर उपचार करण्यासाठी नवीन मार्ग उघडू शकतात.

पोर्तो विद्यापीठाचे डॉ. लुईस डेलगाडो नेतृत्वाखाली हे संशोधन फ्रंटियर्स इन मायक्रोबायोलॉजी या जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहे. हे संशोधन करण्यासाठी २१४ लोकांच्या नाकात असलेल्या बुरशीजन्य घटकांचे विश्लेषण करण्यात आले. त्यामध्ये १५५ जणांना अ‍ॅलर्जिक ऱ्हिनाइटिस आणि दमा दोन्ही होते. ४७ जणांना अ‍ॅलर्जिक ऱ्हिनाइटिस होता, तर १२ जणांना फक्त दमा होता. या संशोधनात १२५ जणांचाही समावेश होता, जे पूर्णपणे निरोगी होते. त्यांनी नियंत्रण गट म्हणून काम केले.

संशोधनात नाकाच्या स्वॅब नमुन्याचा चाचणी अहवाल

नाकाच्या स्वॅब नमुन्यांची तपासणी करून संशोधकांना असे आढळून आले की अ‍ॅलर्जिक ऱ्हिनाइटिस असलेल्या लोकांच्या नाकात निरोगी लोकांच्या तुलनेत बुरशीजन्य प्रजातींची विविधता जास्त होती. संशोधकांना असे आढळून आले की, अ‍ॅलर्जिक ऱ्हिनाइटिस आणि दमा असलेल्या रूग्णांम्ये बुशी अधिक जवळून संबंधित होती. यावरून असे दिसते की, बुरशी नाकाच्या रोगप्रतिकारक वातावरणावर परिणाम करू शकते. संशोधनात असेही आढळून आले की, श्वसनाचे आजार असलेल्या लोकांमध्ये डीएनए आणि आरएनएच्या निर्मितीशी संबंधित तीन चयापचय प्रक्रिया अधिक सक्रिय होत्या. त्यामुळे भविष्यात नवीन उपचारांचे पर्याय खुले उलगडू शकतात.

नाकाचा मायक्रोबायोम म्हणजे काय?

सीके बिर्ला हॉस्पिटलच्या ईएनटी विभागाच्या प्रमुख सल्लागार डॉ. दीप्ती सिन्हा यांनी दि इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितले की, नाक हे आपल्या शरीरात जाणारे पहिले वायुमार्ग आहे. यामध्ये बुरशी, जीवाणू आणि विषाणू यासारख्या सूक्ष्मजीवांची संपूर्ण परिसंस्था असते. नाकातील सूक्ष्मजीव रोग निर्माण करेल की नाही हे व्यक्तीच्या प्रतिकारशक्तीवर, आरोग्यावर आणि जीवाच्या स्वरूपावर अवलंबून असते.

तज्ज्ञांनी स्पष्ट केले की, नाकाचा मायक्रोबायोम स्थान, स्वच्छता आणि अ‍ॅलर्जिनच्या संपर्कावर अवलंबून बदलू शकतो. म्हणून हे पोर्तुगीज संशोधन जागतिक स्तरावर लागू होऊ शकत नाही. जेव्हा नाकाच्या मायक्रोबायोममध्ये असंतुलन निर्माण होते तेव्हा डिस्बायोसिस नावाची स्थिती उद्भवते. त्यामुळे अ‍ॅलर्जी आणि श्वसन संसर्गाचा धोका वाढू शकतो.

हे संशोधन अ‍ॅलर्जिक ऱ्हिनाइटिस आणि दमा समजून घेण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल असते. तरी डॉ. सिन्हा यांनी सांगितले की, हे बुरशीजन्य घटक या आजारांमध्ये थेट योगदान देतात का हे निश्चित करण्यासाठी अधिक संशोधन आवश्यक आहे. नाकातील सूक्ष्मजीवांबद्दलची आपली समज वाढत असताना हे स्पष्ट होत आहे की नाकातील सूक्ष्मजीव संतुलन राखणे अ‍ॅलर्जिक ऱ्हिनाइटिस आणि दमा यासारख्या आजारांवर नियंत्रण आणि प्रतिबंध करण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकते. आपल्या आतड्यातील चांगल्या आणि वाईट बॅक्टेरियांचे संतुलन पचन, रोगप्रतिकारक शक्ती आणि जळजळ नियंत्रित करते, त्याचप्रमाणे नाकातील सूक्ष्मजीव श्वसनमार्गाच्या आरोग्यावर आणि रोगप्रतिकारक प्रतिक्रियेवर प्रभाव पाडते.

संशोधनातून असे दिसून आले आहे की, अ‍ॅलर्जिक ऱ्हिनाइटिस आणि दमा हे नाकातील बुरशीजन्य सूक्ष्मजीवांमधील असंतुलनाशी जोडलेले असू शकात. नाकातील सूक्ष्मजीव संतुलन राखणे या आजारांच्या लक्षणांवर नियंत्रण ठेवण्यात आणि प्रतिबंधित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकते. या क्षेत्रातील भविष्यातील संशोधन नवीन उपचारांसाठी मार्ग खुले करू शकते.