Natural home remedies Marathi methods present trusted Ayurveda treatment without medicine secrets for a healthier lifestyle: औषधाविना उपचार: निरोगी आणि दीर्घायुषी राहण्यासाठी नेहमीच महागड्या औषधांची गरज नसते. आपल्या निसर्गात आणि जुन्या परंपरेत अशा अनेक गोष्टी दडलेल्या आहेत, ज्यांच्या योग्य वापराने आपण शरीराचे अनेक विकार घरच्या घरी बरे करू शकतो. सुप्रसिद्ध वैद्य प. य. खडीवाले यांनी शरीराला अत्यंत हितकारक अशा ७ सोप्या नैसर्गिक उपायांबद्दल सविस्तर माहिती दिली आहे.

जलपान

‘उदकं आश्वाासकराणां श्रेष्ठम्’ सर्व प्रकारच्या उपलब्ध पाण्याच्या प्रकारांचा विचार आरोग्याच्या दृष्टिकोनातून केला तर ‘उकळलेले पाणी’ पहिल्या क्रमांकाचे पाणी. त्यानंतर अत्यंत सुरक्षित पाणी म्हणजे सुंठ चूर्णयुक्त पाणी, नंबर तीन नागरमोथा चूर्ण, सिद्धजल आणि त्यानंतर चुन्याची निवळी किंवा सुधाजल.

जलपानावर एखादा दिवस जरूर काढावा

नुसत्या अन्नग्रहणाने शरीर सुधारणार नाही, त्याकरिता त्यानंतर नुसते गरम पाणी प्यावे. त्यामुळे शरीरातील जलतत्त्व कमी होत नाही. रसक्षय किंवा डीहायड्रेशनचा धोका रहात नाही. गरजेप्रमाणे या पाण्यात कणभर मीठ आणि चिमूटभर साखर किंवा चमचाभर मध घालावा. अशा जलपानावर एखादा दिवस जरूर काढावा. त्यामुळे सतत लघवी होत राहते आणि शरीराचे क्लिन्झिंग होते आणि बरे वाटते.

Natural home remedies Marathi for joint pain relief | Ayurveda treatment without medicine home tips | घरगुती उपाय औषधाविना उपचार आयुर्वेद | घरगुती आयुर्वेदिक सोपे उपाय आणि जलपान
औषधाविना उपचारासाठी सर्वोत्तम नैसर्गिक घरगुती उपाय (Image- Gemini)

मौन

‘मौनं सर्वार्थ साधनम्’ हे वचन सर्वांनाच माहीत आहे. मौन हा असाच मोठा उपाय अनेक विकारात आहे. रक्तदाबवृद्धी, खोकला, दमा, स्वरभंग, क्षय, ताप या विकारांत तर माणसाची बोलती आपोआपच बंद होत असतेच, पण त्यापेक्षा अनेक पित्त व वायूच्या विकारांत विशेषत: दुर्बलता, पांडू, अम्लपित्त, अल्सर, हर्निया, प्रोस्टेट ग्लँड, पोटदुखी, छातीत दुखणे या विकारांत मौनाचा आश्रय करावा. माणसाची ताकद दोन प्रकारे खर्च होत असते. सतत बोलणे, सतत वाचन किंवा डोळ्याचा वापर. याकरिता तोंडाला कुलूप जरूर लावावे.

अंजन – सुरमा

फार प्राचीन काळापासून आपल्या देशात डोळ्यांत काजळ, सुरमा, नेत्रांजन करण्याची पद्धत आहे. त्याकरिता अ‍ॅण्टिमनी या धातूपासून बनविलेले सुरमा, मोत्याचा सुरमा, कापराचे अंजन, मधाचे अंजन, तूप, एरंडेल तेल असे नाना प्रकार वापरले जातात. आधुनिक विज्ञानाप्रमाणे अ‍ॅण्टिमनी किंवा सुरमा या धातूंचे अंजन कितीही सूक्ष्म, घोटलेले असले तरी वापरू नये असे आहे. मला वाटते हे मत मानावे. धातूचा कण केव्हा तरी डोळ्याला त्रास देणारच.

सर्वात सुरक्षित अंजन

मध व एरंडेल हे सर्वात सुरक्षित अंजन आहे. खुपऱ्या टोचणी, खाज याकरिता त्याचा चांगलाच उपयोग होतो. लासरू, डोळ्यातून पू येणे, कंड याकरिता मधाचेच अंजन उपयुक्त आहे. मध मात्र खात्रीचा हवा. एरंडेल तेलाचे अंजन उष्णतेशी संबंधित डोळ्याचे विकारांना लागू आहे. डोळ्याची लाली, तळावणे, भगभग, फार वाचताना त्रास, रूक्षता याकरिता एरंडेल अंजन चांगले. असेच तूप, लोणीही वापरता येईल. सदासर्वदा वापरता येईल असे एरंडेल व मध एकत्र अंजन चांगले, पण दोन्ही एकत्र करून ठेवले तर काही काळाने दोन्ही गोष्टी त्याच्या कमीअधिक वजनाने वेगळ्या होतात. लहानांपासून थोरांपर्यंत अंजन वापरायचे असल्यास कापूर जाळून तूप लावलेल्या तांब्याच्या ताम्हणावर धरलेले काजळ तयार करावे.

गुळण्या (गंडूष, कवल)

गुळण्या दोन प्रकारच्या करता येतात. एका प्रकारांत तोंड खुळखुळून चुळा भराव्या, त्यास कवल म्हणतात. चष्म्याचा नंबर जाण्याकरिता साध्या पाण्याच्या गुळण्या उपयुक्त आहेत. सर्दी, पडसे, खोकल्याकरिता मीठ, हळद, गरम पाण्याच्या गुळण्या उपयुक्त आहेत. तोंड आले असले तर तूप पाण्याच्या गुळण्या कराव्या. तोंडात व्रण असले तर व्रणशुद्धीकरता मधपाण्याच्या गुळण्या कराव्यात. तोंड वाकडे होणे या विकारात तेल व कोमट पाणी अशा गुळण्या कराव्या. याच प्रकारे ही पातळ द्रव्ये तोंड भरून ठेवली, तोंड खुळखुळ हलवले नाही, तर वरील विकारांत गंभीर अवस्थेत जास्त फायदा होतो. या प्रकारास गंडूष असे म्हणतात.

गोमय, गोमूत्र

गोमय व गोमूत्र हे दोन पदार्थ आपण कमी लेखू नयेत. या दोघांच्या मिश्रणाने शरीरास अभ्यंग केला तर त्वचा स्वच्छ व हलकी होते. गोमयाचे पाणी व गोमूत्र घेऊन यकृत, प्लीहा या अवयवांच्या सूज, मंद भूक, कावीळ, जलोदर या विकारांत उपयोग होतो. महारोगी, ओले- कोरडे इसब, सोरायसिस या विकारांनी ग्रस्त रुग्णांनी गोमय पाणी व गोमूत्र संबधित भागाला लावून पाहावे. हेच पाणी प्यायल्याने कफ व मलावरोध ही प्रमुख लक्षणे असलेल्या दमेकऱ्यांना आराम पडतो.

स्वमूत्रोपचार

स्वमूत्रोपचार किंवा शिवाम्बूचे एक फॅड होऊन राहिले आहे. माझ्याकडे एकदा पन्नाशीचे एक गृहस्थ विलक्षण थकवा येतो म्हणून आले. तपासणीत काही दोष नव्हता. अधिक माहिती घेता ते नित्य शिवाम्बु प्रयोग करीत हे कळले. ते थांबविल्याबरोबर त्यांचा थकवा गेला. त्यांना त्या प्रयोगात केव्हा थांबावे हेच कळले नव्हते. निसर्गोपचारतज्ज्ञांच्या मते शिवाम्बू शरीरात उपयुक्त असते. तुमच्या आमच्यापेक्षा ब्रह्मदेवाला जास्त अक्कल आहे. त्याने अशुद्ध रक्त शुद्ध होण्याकरिता शरीरात एक विलक्षण यंत्रणा निर्माण केली आहे. तेथे अशुद्ध रक्त शुद्ध होण्याकरिता परत येते. याप्रमाणे आपले मूत्र आपण पेय म्हणून उपयोग होणार असते तर ब्रह्मदेवानेच तशी योजना आपल्या शरीरात केली नसती का? स्वमूत्र हे शरीराच्या बाहेरच गेले पाहिजे एवढा तरी विवेक या उपचारांचे अवडंबर माजविणाऱ्यांनी ठेवावा.

पर्णस्वेद

‘अनंत हस्ते कमलावराने, देता किती घेशील दो कराने’ या सुभाषितात किती मोठा अर्थ आहे हे आम्ही आमच्या आसपासच्या परिसरात नैसर्गिक साधनांचा सुयोग्य वापर योग्य प्रकारे केला की लक्षात येते. वृद्ध माणसांच्या सांधेदुखी, गुडघेदुखी या विकारांत वडाची पाने थोडे तेल लावून गरम करून बांधली की काय विलक्षण गुण देतात ते प्रत्यक्ष वापर करूनच पहायला हवे. याच प्रकारे शेवगा, निरगुडी, एरंड पाने यांचा पाण्यात उकळून केलेला शेक उपयुक्त आहे. रुईच्या पानांचा वापर दाहक आहे. पण अति कफप्रधान सूज विकारांत, कफ प्रवृत्तीच्या, बळकट माणसावर प्रयोग करायला हरकत नाही. रुईच्या पानाने व्रण होत नाही ना याची काळजी मात्र घ्यावी. त्याकरिता तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच रुई पानांचा प्रयोग करावा.

मातीचा लेप

पोटावर मातीचा लेप हा जैन समाजातील वृद्धांकरिता खास उपचार आहे. पोटाच्या सूज, फुगणे, आग होणे याकरिता गार, गरम वा जाड, पातळी मातीचा लेप अवस्थेप्रमाणे लावावा. मातीच्या लेपाचा फायदा वार्धक्यात लघवी कोंडली असता लगेच होतो. मातीच्या लेप लावल्याबरोबर तास-दोन तासांत लघवी मोकळेपणाने होते. एखाद्याा अति वृद्ध व्यक्तीला विनाक्लेश मरण पाहिजे असेल, शेवटी लघवी अडखळून त्रास होऊ नये अशी अपेक्षा असली तर जैन ज्ञानी लोक हा उपाय करतात.