Priyanka Chopra Brother in Law Skin Cancer: जोनस ब्रदर्सच्या ग्रुपमधील प्रसिद्ध नाव म्हणजे सिंगर- कम्पोजर (गायक- गीतकार) केविन जोनस याने आपल्या सोशल मीडियावर आपल्याला त्वचेचा कर्करोग झाल्याची माहिती दिली आहे. प्रियांका चोप्राच्या दिराला झालेला हा आजार शस्त्रक्रियेच्या माध्यमातून बारा जरी झाला असला तरी त्याने या निमित्ताने सर्वांनाच आपल्या शरीरावरील तीळ व चामखीळामध्ये होणाऱ्या बदलांकडे लक्ष देण्याची विनंती केली आहे.

प्राप्त माहितीनुसार, केविनला बेसल सेल कार्सिनोमा असल्याचे निदान झाले, जे काढून टाकावे लागले. त्वचेच्या कर्करोगाचा हा सर्वात सामान्य प्रकार आहे आणि रोगग्रस्त जागेच्या पलीकडे वाढण्यास किंवा पसरण्यास वेळ लागतो म्हणून, त्यावर उपचार आणि निदान लवकर होऊ शकते. कर्करोगाचा हा प्रकार कमी आक्रमक आणि उपचार करण्यायोग्य आहे.

डॉ प्रीतम कटारिया, सल्लागार, वैद्यकीय ऑन्कोलॉजी, सर एचएन रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटल, मुंबई यांनी याबाबत इंडियन एक्सस्प्रेसला सांगितले की, “सामान्यपणे, कर्करोगाचा हा प्रकार भारतीयांपेक्षा पाश्चिमात्य देशातील म्हणजेच त्वचेचा रंग हलका असलेल्या लोकसंख्येमध्ये अधिक आढळण्याची शक्यता असते. भारतीयांच्या त्वचेला ब्राऊन रंग देणारे रंगद्रव्य मेलेनिन हे संरक्षणात्मक काम करते ज्यामुळे अतिनील किरणोत्सर्गामुळे डीएनएचे होणारे नुकसान टाळता येते व परिणामी त्वचेच्या कर्करोगापासून संरक्षण मिळते. ज्या भारतीयांना त्वचेचा कर्करोग होतो ते सहसा औद्योगिक रसायने आणि प्रदूषकांच्या संपर्कात आलेले असतात.

बेसल सेल कार्सिनोमा म्हणजे काय?

बेसल पेशी त्वचेच्या वरच्या थरावर असतात, त्यांची सतत निर्मिती व विघटन होत असते. काही वेळा यूव्हीए रेडिएशनच्या दीर्घकाळापर्यंत आल्याने डीएनएमध्ये काही बदल होऊ शकतात ज्यामुळे या पेशींची अनियंत्रित वाढ होऊ लागते. फोड, लाल थापले, गुलाबी रंगाची सूज, टेंगुळ अशा स्वरूपात या पेशी दिसू शकतात. बेसल सेल कार्सिनोमा हा नॉन-मेलेनोमा त्वचेचा कर्करोग आहे ज्यावर सहज उपचार केले जाऊ शकतात. त्यामुळे जेव्हा तुम्ही सूर्यप्रकाशात जास्त वेळ असता तेव्हा योग्य सनस्क्रीन वापरणे गरजेचे असते.

भारतीयांमध्ये त्वचेला रंग देण्याचे काम करणाऱ्या, रंगद्रव्य निर्माण करणाऱ्या पेशी कर्करोगग्रस्त होतात तेव्हा मेलेनोमा अधिक सक्रिय होतो. यानंतर नवीन तीळ किंवा चामखीळ वाढणे किंवा अगोदरच असणाऱ्या तीळ किंवा चामखिळात बदल होणे अशी लक्षणे दिसून येतात. मेलेनोमा शरीरावर कुठेही होऊ शकतो.

माझा तीळ/ चामखीळ कर्करोगाचं लक्षण आहे हे मला कसे कळेल?

सर्वात आधी त्वचेचं नीट निरीक्षण करा. नवीन तीळांची कशी वाढ होतेय हे पहा. तसेच तुमच्या शरीरावर अगोदरच असलेल्या तिळाच्या आकाराचे व रंगाचे निरीक्षण करा. तीळावर केस आहेत का, रक्तस्त्राव होतोय का, पोत कसा आहे या प्रश्नांकडे सुद्धा लक्ष द्या. मेलेनोमाच्या रुग्णांना विशेष मान व चेहऱ्यावर काळे ठिपके किंवा जखमा होऊ शकतात सुरुवातीला हे ठिपके मोत्याच्या रंगाचे असू शकतात. या ठिपक्यांच्या संवेदनांकडे लक्ष द्या.

अमेरिकन कॅन्सर सोसायटीचा मेलेनोमा ओळखण्यासाठी ABCD नियम तयार केला आहे. तो उलगडून पाहूया..

  • A म्हणजे (Asymmetry) अर्थात विषमता, जेव्हा तीळ किंवा चामखीळाचे भाग एकमेकांशी जुळत नाहीत किंवा एकसारखे दिसत नाहीत तेव्हा लक्ष देणे गरजेचे आहे.
  • B म्हणजे बॉर्डरमधील बदलांकडे लक्ष द्यावे,
  • C म्हणजे समान तीळामधील रंग वेगळा असल्यास लक्ष द्यावे.
  • D म्हणजे तीळाचा व्यास मोजावा. स्पॉट 6 मिलीमीटरपेक्षा मोठा असल्यास गांभीर्याने विचार करण्याची गरज असते.

भारतीयांना मेलेनोमा का होतो?

फॅक्टरी युनिट्समधील कामगारांना याचा सर्वाधिक धोका असतो. आर्सेनिक आणि पॉलीसायक्लिक सुगंधी हायड्रोकार्बन्सच्या दीर्घकाळ संपर्कात आल्याने हा धोका वाढतो म्हणूनच आपल्याला संरक्षणात्मक उपाय करणे आवश्यक आहे. याशिवाय काहींच्या बाबत ही अनुवांशिक स्थिती सुद्धा असू शकते ज्यात तुमच्या त्वचेवर जास्त प्रमाणात तीळ असतात. तुमची त्वचा सूर्यप्रकाशात जळजळत असेल तर आपल्याला तज्ज्ञांचा सल्ला घेण्याची गरज आहे.

हे ही वाचा<< रोज सेक्स केल्याने शरीर, मन व नात्यात काय बदल होतात? थट्टा, मस्करी न करता डॉक्टरांनी दिलेली ही माहिती वाचा

त्वचेच्या कर्करोगावर उपचार काय?

लक्षणे फार लवकर दिसून येत असल्याने, नॉन-मेलेनोमा कर्करोग बरा होऊ शकतो. रेडिएशनसह किंवा त्याशिवाय शस्त्रक्रिया करता येऊ शकते. मेलेनोमामध्ये इम्युनोथेरपीसह किंवा त्याशिवाय शस्त्रक्रिया सुद्धा करण्याचा पर्याय असतो. भारतीयांना कमी धोका असला तरी, आपण तापमान आणि प्रदूषकांची जाणीव ठेवली पाहिजे.