Health Special News: भारतात ज्वारी, बाजरी, नाचणी, भगर ही तृणधान्ये मुख्यत्वे उपलब्ध आहेत. कुपोषण व आजारावर मात करायची असल्यास तृणधान्यांचा आहारातील वापर वाढविणे आणि ती योग्य प्रकारे नियमित आहारात समाविष्ट करणे हेही म्हणून तितकेच महत्त्वाचे आहे. अनेकदा आपल्यासारख्या सीझनल हेल्दी खाऊ इच्छिणाऱ्यांचा गोंधळ असा होतो की, अमुक एखाद्या दिवसापासून आपण हेल्दीच खायचं असं ठरवतो. मग मस्त बाजरात जाऊन भरपूर हेल्दी धान्य, भाज्या घेऊनयेतो . एकाचवेळी बहु फायदे मिळावेत म्हणून सगळं मिक्स करून खाऊ लागतो. तुम्हीही अशा प्रयत्नातून कधी ना कधी ज्वारी- बाजरी- नाचणी- तांदूळ अशी पिठं एकत्र करून जाडजूड भाकरी खाल्ली असेलच, किंवा निदान कोणाकडून असे सल्ले तर ऐकले असतीलच. हो ना? पण हा सल्ला कसा आपल्याच आरोग्याला घातक ठरू शकतो हे आज आपण पाहूया…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नाचणी- बाजरी एकत्र का खाऊ नये?

आहारतज्ज्ञ पल्लवी सावंत पटवर्धन यांनी लोकसत्ताला दिलेल्या माहितीनुसार, ज्वारी किंवा बाजरीच्या पिठाची भाकरी किंवा पातळसर पोळी ही निश्चितच पोषक असते. पण जेव्हा आपण एका वेळी अनेक तृणधान्ये एकत्र करतो त्या वेळी त्यातील जीवनसत्त्वांचा आणि त्यांच्या एकत्रीकरणामुळे त्यातील लोह, कॅल्शिअम, झिंक यांच्या पोषणमूल्यांवर परिणाम होऊ शकतो. एका वेळी एक किंवा दोन पूरक तृणधान्ये एकत्र करावीत म्हणजे त्यातील जीवनसत्त्वे पूर्णपणे मिळू शकतील. किंबहुना गव्हाच्या पिठासह तृणधान्ये जरूर एकत्र करावीत, पण हेल्दी म्हणून नाचणी आणि बाजरी किंवा ज्वारी यांचे मिश्रण सर्रास करू नये.

हे ही वाचा<< स्विमिंगआधी किती तास काही खाऊ नये? पूलमध्ये जाण्यापूर्वी काय खायला-प्यायला हवे? तुमचे प्रश्न ‘इथे’ सोडवून घ्या

तृणधान्ये खाण्याची फायदेशीर पद्धत कोणती?

तृणधान्ये कितीही वाफवली किंवा त्यांच्यावर प्रक्रिया केली तरी त्यांतील जैवघटक आणि खनिजांचे प्रमाण हे केवळ ३ ते ५ टक्क्यांनीच कमी होते. शिवाय, तृणधान्ये आंबवून खाल्ल्यास त्यातील जीवनसत्त्वांचे प्रमाण वाढते आणि ती पचायलादेखील हलकी होतात. तृणधान्यांतील प्रथिनांचे योग्य प्रमाण मिळावे म्हणून त्यांना शक्यतो भाजून किंवा शिजवून खाणेदेखील उत्तम!

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Never mistake to mix jwari bajari ragi to make bhakari or vada perfect way to eat cereals to get maximum benefits health news svs
First published on: 04-06-2023 at 16:41 IST