Side effects of vitamin B3: आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत, असंतुलित आहारामुळे आणि शारीरिकदृष्ट्या कमी सक्रिय असल्यामुळे शरीरात पोषक घटकांची कमतरता राहते. यामुळे अनेक जण थकवा, अशक्तपणा आणि सुस्तीविषयी तक्रार करतात. अशा परिस्थितीत स्वतःला ॲक्टिव ठेवण्यासाठी बरेच जण काहीही विचार न करता बाजारात उपलब्ध असलेल्या जीवनसत्त्वांच्या गोळ्या घेतात. पण, तुम्हाला माहीत आहे का की, मल्टीविटामिन गोळ्या किंवा सप्लिमेंट्स औषधे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेणं तुमच्या शरीरासाठी हानिकारक ठरू शकतं. इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्ट, डॉ. राजीव भागवत यांनी द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना याबाबत सविस्तर माहिती दिली आहे.

आता नवीन संशोधनातून असे समोर आले आहे की, व्हिटॅमिन बी३ किंवा नियासिनच्या अतिरिक्त सेवनामुळे रक्तवाहिन्यांमध्ये जळजळ होऊन रक्तवाहिन्यांना हानी पोहोचवून हृदयरोगाचा धोका वाढवू शकते. याचा अर्थ असा नाही की मांस, मासे, तृणधान्ये आणि ब्रेडमध्ये असलेल्या व्हिटॅमिन बी ३ च्या आहारातील सेवनानं धोका वाढू शकतो; तर व्हिटॅमिन बी३ सप्लिमेंटच्या अतिरिक्त सेवनानं त्रास होऊ शकतो. त्यामुळे एक हजार मिलीग्रॅमचे व्हिटॅमिन बी ३ सप्लिमेंट्स घेत असाल तर ते आत्ताच थांबवलं पाहिजे.

How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या
why Sleeping Pills Rising Among Young Adults
झोपेच्या गोळ्या निद्रानाशावरचा अंतिम उपाय आहेत का? झोपेच्या गोळ्या शक्यतो घेऊ नका असं डॉक्टर का सांगतात?
World idli day 2024 how to make healthy oats idli
World idli day : पौष्टिक अन् झटपट नाश्त्यासाठी बनवा ‘ओट्स’ इडली; पाहा रेसिपी, प्रमाण
5 Indian fruits that keep you hydrated during summer
शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी होईल मदत; उन्हाळ्यात करा ‘या’ ५ फळांचं सेवन

किती प्रमाणात व्हिटॅमिन बी३ गरजेचं?

आरोग्यतज्ज्ञ म्हणतात की, १८ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या पुरुषांना दररोज १६ मिलीग्राम व्हिटॅमिन बी३ आणि महिलांना १४ मिलीग्राम व्हिटॅमिन बी३ ची आवश्यकता असते, तर गर्भवती महिलांसाठी त्याचे प्रमाण १८ मिग्रॅ. असणं गरजेचं आहे. जर तुम्ही व्हिटॅमिन बी ३ सप्लिमेंट्स घेत असाल तर नक्कीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.

आपल्याला व्हिटॅमिन बी ३ सप्लिमेंटची गरज का आहे?

हे जीवनसत्व चयापचय प्रक्रियेसाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचं आरोग्यतज्ज्ञ सांगतात. व्हिटॅमिन बी ३ अन्नाचे ऊर्जेमध्ये रूपांतर करण्याचे काम करते. हे पोट आणि पाचक प्रणाली दोन्हीसाठी आवश्यक आहे. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या आहारात व्हिटॅमिन बी ३ असलेल्या पदार्थांचाही समावेश करावा.

जाणून घ्या व्हिटॅमिन बी ३ चे महत्त्व

पोटाच्या चांगल्या आरोग्यासाठी व्हिटॅमिन बी ३ खूप महत्त्वाचे मानले जाते. व्हिटॅमिन बी ३ निकोटीनिक ॲसिड म्हणूनदेखील ओळखले जाते. मात्र, ते योग्य प्रमाणात नाही घेतले तर हृदयविकाराचा धोका वाढू शकतो. हृदयविकाराची समस्या कुटुंबांमध्ये अनुवंशिकरित्या असेल तर याचा धोका अधिक असतो. अशा लोकांनी आपले वजन नियंत्रणात ठेवले पाहिजे. धूम्रपान करू नये आणि नियमित शारीरिक हालचाली कराव्यात, असा सल्ला दिला जातो.

व्हिटॅमिन बी ३ हृदयविकाराचा धोका कसा वाढवते?

अभ्यासातून असे दिसून आले आहे की, नियासिनमुळे जळजळ होते. यामुळे धमन्या अरुंद होतात आणि प्लेक्सच्या वाढीला वेग येतो आणि ब्लॉकेजेस होतात, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका येतो.

हेही वाचा >> झोपण्याआधी डोळ्यावर ‘ही’ वस्तू लावल्याने स्मरणशक्ती व एकाग्रता सुधारते? परीक्षांच्या काळात तज्ज्ञांची महत्त्वाची माहिती

कोलेस्ट्रॉल असलेल्यांनी काय करावे?

कोलेस्ट्रॉल वाढल्याने हृदयविकाराचा त्रास होऊ शकतो. जास्त कोलेस्ट्रॉलमुळे नसा ब्लॉक होतात, ज्यामुळे हृदयाला रक्तपुरवठा होत नाही. अशा वेळी हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते. त्यामुळे कोलेस्ट्रॉल वाढू नये म्हणून वेळीच काळजी घेतली पाहिजे. अशा लोकांनी आहार आणि व्यायामावर भर देऊन ते नियमितपणे करावे.