scorecardresearch

Premium

ऑफिसमध्ये बॉस व घरी काम, सतत वाढतोय रक्तदाब? तुमच्या चिडचिडीमागे ‘हा’ आजार तर नाहीये ना कारण, वाचा

High Blood Pressure: दरवर्षी सप्टेंबर महिन्यात पीसीओएस विषयी जनजागृती करण्यासाठी जागतिक स्तरावर प्रयत्न केले जातात. केवळ मासिक पाळीच नव्हे तर स्त्रियांच्या एकूणच आरोग्यावर गंभीर प्रभाव टाकणारी ही परिस्थिती अद्यापही अनेकांना माहित नाहीये.

Office Boss And Home Duties Make You Angry Causing High Blood Pressure Ladies Check If You Have PCOS Signs Who is at Risk
मैत्रिणींनो, तुमच्या चिडचिडीमागे 'हा' आजार तर नाहीये ना कारण? (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

PCOS & Anger Causing High Blood Pressure: घरी नवऱ्याने, किंवा ऑफिसमध्ये सहकर्मचाऱ्यांकडून चुका होतात तेव्हा तुम्ही चिडचिड होणं साहजिकच आहे. पण काही वेळा गोष्ट लहानशी असली तरी चिडचिडीची तीव्रता फार अधिक असू शकते.यामुळे अचानक रक्तदाब वाढण्याची शक्यता असते. विशेषतः अशा महिलांच्या बाबत ज्यांना पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (PCOS) चा त्रास आहे. दरवर्षी सप्टेंबर महिन्यात पीसीओएस विषयी जनजागृती करण्यासाठी जागतिक स्तरावर प्रयत्न केले जातात. केवळ मासिक पाळीच नव्हे तर स्त्रियांच्या एकूणच आरोग्यावर गंभीर प्रभाव टाकणारी ही परिस्थिती अद्यापही अनेकांना माहित नाहीये. त्यामुळेच त्याविषयी जाणून घेऊन संभाव्य धोके टाळण्यासाठी सप्टेंबर महिना PCOS जागरूकता महिना म्हणून पाळला जातो.

Apple आणि हार्वर्डच्या ‘वुमेन्स हेल्थ स्टडी’ नावाच्या अभ्यासानुसार, पीसीओएस असलेल्या स्त्रियांना टाइप २ मधुमेह होण्याची शक्यता जवळजवळ तीन पटीने जास्त असते हे सर्वज्ञात आहे.पण, PCOS आणि रक्तदाब यांच्यातील संबंध काय आहे हे तुम्हाला माहित आहे का? याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी हा लेख आवर्जून वाचा..

Infosys Narayana Murthy Consumer Brand
Narayan Murthy: ”लोकांना वाटते त्यांच्याकडे विशिष्ट फोन अन् घड्याळ असेल तर…,” नारायण मूर्तींनी यशस्वी ब्रँडसाठी दिल्या महत्त्वाच्या टिप्स
Bank Holiday in February 2024
Bank Holiday in February 2024 : फेब्रुवारीत बँकांना सुट्ट्याच सुट्ट्या, किती दिवस बँका राहणार बंद?
Domestic violence
भारतात मुलींचे हक्क, अधिकारांबाबत उदासीनता! ‘तिचे’ हिंसाचार, कुपोषण, बलात्काराच्या घटनांमधून कसे होईल संरक्षण?
Gyanvapi Case
ज्ञानवापी प्रकरण : प्रार्थनास्थळांवरील कायदा अन् त्याच्या समोरील आव्हाने

इंडियन एक्सप्रेसशी बोलताना, बीएलके-मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या सेंटर फॉर वुमन हेल्थच्या वरिष्ठ सल्लागार डॉ तृप्ती शरण यांनी स्पष्ट केले की बहुतेक प्रकरणांमध्ये इन्सुलिनच्या प्रतिकारामुळे उच्च इन्सुलिन पातळी वाढते, ज्यामुळे वजन वाढणे, मासिक पाळीत अनियमितता आणि एन्ड्रोजनची पातळी वाढते यासगळ्याचा एकूण परिणाम हा अंडाशयाभोवती (युटरस) पॉलीसिस्टिक थर जमा होण्यातून दिसतो. तसेच पुरळ आणि हर्सुटिझम (महिलांना दाढी येणे) यासारखे त्रास सुद्धा यामुळे वाढू शकतात.

डॉक्टर शरण सांगतात की, “ PCOS असताना ट्रायग्लिसराइड्ससारख्या खराब लिपिड्समध्ये वाढ होते. यापैकी बहुतेक घटक रक्तदाब वाढवू शकतात ज्यामुळे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी गुंतागुंत होण्याचा धोका सुद्धा वाढतो”.

दुसरीकडे, डॉ.आस्था दयाल, प्रसूती आणि स्त्रीरोग विभाग, सी के बिर्ला हॉस्पिटल, यांनी इंडियन एक्सप्रेसला सांगितले की, काही अभ्यासातून असे दिसून आले आहे की जरी आपण मधुमेह आणि लठ्ठपणाला जोखीम घटक मानत नसलो तरी, PCOS स्वतंत्रपणे देखील उच्च रक्तदाबासाठी जोखीम घटक आहे. याचे मुख्य कारण स्त्रियांच्या शरीरात एन्ड्रोजनची उच्च पातळी असणेही आहे.

डॉ दयाल यांनी नमूद केले की पीसीओएस असलेल्या महिलांना उच्च रक्तदाब होण्याची शक्यता ४० टक्के जास्त असते. पण म्हणून सरसकट सर्व महिलांना हा त्रास होईलच असे नाही. नेमक्या कोणत्या स्थितीत PCOS मुळे रक्तदाब वाढण्याची शक्यता अधिक असते हे पाहूया..

१) अतिवजन असलेल्या महिला
२) बैठी जीवनशैली असल्यास
३) अत्यंत तणावात प्रत्येक दिवस जगणाऱ्या
४) झोपेशी तडजोड करणाऱ्या
५) धूम्रपान करणाऱ्या
६) फॅट्स, क्षार व साखरेचे अधिक सेवन करणाऱ्या

डॉ. शरण सांगतात की, वरील गटात आपण मोडत असाल तर आपल्याला PCOS व उच्च रक्तदाबाची समस्या उद्भवण्याची शक्यता आहे. शिवाय या रुग्णांना गर्भधारणेच्या वेळी मधुमेह आणि उच्च रक्तदाब होण्याची शक्यता असते.

हे ही वाचा<< स्त्रियांच्या चेहऱ्यावर दाढीसारखे केस वाढणे व कपाळाची हेअर लाईन मागे सरकणे यावर उपाय काय? या स्थितीविषयी वाचा

PCOS असलेल्या महिला त्यांचा रक्तदाब कसा नियंत्रित ठेवू शकतात?

  • निरोगी आहार, कार्ब्स व फॅट्सचे मर्यादित सेवन. सोडियमचे सेवन टाळणेच उत्तम
  • नियमित व्यायामाचे पालन करा, धूम्रपान आणि मद्यपान टाळा, तणाव टाळा आणि योग्य झोपेचे चक्र सेट करा.
  • व्यायाम हे कार्डिओचे मिश्रण असले पाहिजे जसे की धावणे, सायकल चालवणे, पोहणे, एरोबिक्स, स्किपिंग किंवा झुंबा. आठवड्यातून 2-3 वेळा वेट लिफ्टिंग सुद्धा करायला हवे.
  • जर जास्त लिपिड्स असतील तर वरील उपायांसह औषधांचा सल्ला डॉक्टरकडून घ्या
  • नियमित तपासणी करून घ्यावी आणि डॉक्टरांच्या सल्ल्याचे पालन करावे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Office boss and home duties make you angry causing high blood pressure ladies check if you have pcos signs who is at risk svs

First published on: 11-09-2023 at 11:32 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×