Oral Sex Causes Oral Cancer: सध्या आपण पाहतोय कर्करोगाचं प्रमाण वाढतच चाललं आहे. घशाचा कर्करोग होण्यासाठी धूम्रपान किंवा मद्यपान कारणीभूत असतं, असं आजपर्यंत आपल्याला कानावर ऐकू आलंय. पण, तोंडावाटे केलेला सेक्स (ओरल सेक्स) आणि घशाचा कर्करोग होण्याचा स्पष्ट असा संबंध असल्याचं एका संशोधनातून समोर आलंय. जागतिक अभ्यासकांनी हे उघड केलं आहे. ओरल सेक्स आजकाल तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रचलित आहे. ओरल सेक्स करताना लैंगिक संक्रमित संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो.

अभ्यासात असुरक्षित ओरल सेक्स हा घशाच्या कर्करोगासाठी धोकादायक ठरत असल्याचा दावा करण्यात आलाय. मुंबईतील मदरहूड हॉस्पिटलच्या स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. प्रतिमा ठमके यांनी ओरल सेक्समुळे घशाच्या कर्करोगाचा धोका वाढू शकतो का, यावर इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना आपले मत मांडले आहे.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Raj Thackeray on Maharashtra Election 2024
Raj Thackeray : निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरेंनी पहिल्यांदाच…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

संशोधनानुसार ओरल सेक्समुळे थेट घशाचा कॅन्सर होत नाही, पण तो Human Papillomavirus (HPV) पसरवू शकतो. एचपीव्हीमुळे पेशींमध्ये कॅन्सर रोगापूर्वीचे बदल होऊ शकतात, ज्यामुळे नंतर घशाचा कॅन्सर होऊ शकतो. अलीकडच्या वर्षांत HPV विषाणूंमुळे घशाच्या कर्करोगाच्या संख्येत वाढ झाली आहे. घशाचा कर्करोग तोंडावाटे संभोगातून प्रसारित होतो. कित्येक लैंगिक आजारांचा प्रादूर्भाव होण्यामागे बहुतांश वेळा ह्युमन पॅपिलोमा व्हायरस (HPV) कारणीभूत असल्याचे समोर आले आहे. या व्हायरसमुळे घशाचा कॅन्सर होण्याची अधिक भीती असते, असे त्या सांगतात.

(हे ही वाचा: कोणती आसन स्नायू बळकट अन् झपाट्याने वजन कमी करण्यास मदत करू शकतात? योग तज्ज्ञांनी दिलं उत्तर… )

जे एकापेक्षा अधिक लोकांसोबत लैंगिक संबंध प्रस्थापित करतात, त्यांना घशाचा कॅन्सर होण्याची भीती अधिक असते. त्यामुळे एकापेक्षा अधिक लोकांसोबत शारीरिक संबंध ठेवू नये. घशाच्या कर्करोगाचे मुख्य कारण मानवी पॅपिलोमाव्हायरस किंवा एचपीव्ही आहे. या कॅन्सरची लक्षणे सहसा समजून येत नाहीत. जेव्हा हा कॅन्सर पुढच्या टप्प्यावर जातो, तेव्हाच त्याचं निदान होतं. पण, काहीवेळेस स्पष्ट अशी लक्षणं आढळून येतात. यात सातत्याने घसा खवखवणे, खोकताना तोंडावाटे रक्त येणे, आवाज कर्कश होणे, घास गिळताना त्रास होणे अशी काही लक्षणं आढळतात, असे त्या सांगतात.

घशाचा कर्करोग तोंडावाटे संभोग केल्यावर संक्रमित होतो. बहुतेक प्रकरणांमध्ये HPV ची कोणतीच लक्षणं नसतात आणि बरेचदा तुमची रोगप्रतिकारक क्षमताच हा संसर्ग दूर करते. घशाचा कर्करोग हा घशात आणि त्याच्या सभोवतालच्या भागात जसं की तोंडात, नाकात असणाऱ्या पोकळी मागे, टॉन्सिलमध्ये किंवा जीभेच्या खालीसुद्धा होऊ शकतो.

स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणतात की, HPV लसीकरणाला प्राधान्य देण्याव्यतिरिक्त एखाद्याने सुरक्षित लैंगिक पद्धतींना प्रोत्साहन दिले पाहिजे आणि तोंडावाटे लिंग-संबंधित संक्रमणाशी संबंधित जोखीम कमी करण्यासाठी नियमित तपासणीस प्रोत्साहनही दिले पाहिजे. यामुळे अनेक संसर्गांमुळे होणाऱ्या मृत्यूंच्या प्रमाणात लक्षणीय घट होऊ शकते. घशाच्या कर्करोगाशी संबंधित एचपीव्हीच्या विशिष्ट प्रकारांसह नियमित तपासणी, लसीकरण आणि सुरक्षित लैंगिक पद्धतींच्या महत्त्वावर जोर देणे महत्त्वाचे आहे, असेही त्या सांगतात.

Story img Loader