Painkilers Side Effects: पेनकिलर्स जगभरात सर्वाधिक वापरली जाणारी औषधे आहेत. यामध्ये ओव्हर-द-काउंटर पर्यायांपासून ते प्रिस्क्रिप्शन औषधांपर्यंतचा समावेश आहे आणि या औषधांनी डोकेदुखी, स्नायू दुखणे आणि दीर्घकाळ चालणाऱ्या वेदनांसारख्या विविध समस्यांवर त्वरित आराम मिळतो. परंतु, पेनकिलर्सच्या अतिवापरामुळे किंवा अयोग्य वापरामुळे आरोग्याच्या महत्त्वपूर्ण समस्या उद्भवू शकतात, विशेषत: पोट आणि किडनीसंबंधित गंभीर आरोग्य समस्या होऊ शकतात.

पेनकिलर्सबद्दल माहिती

डॉ. चॅटर्जी, इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटल्स, नवी दिल्ली येथील अंतर्गत औषध विशेषज्ञ यांच्या मते, पेनकिलर्स औषधांचे मुख्यतः दोन मुख्य वर्गांमध्ये वर्गीकरण केले जाऊ शकते: नॉन-स्टेरॉइडल अँटी-इंफ्लेमेटरी ड्रग्स (NSAIDs) आणि ओपिओइड्स (opioids). NSAIDs दाह कमी करतात आणि शरीरातील वेदना कमी करण्यास मदत करतात. दुसरीकडे, ओपिओइड्स गंभीर वेदना कमी करण्यासाठी मज्जासंस्थेशी संवाद साधतात, परंतु यांच्या वापराने इतर दुष्परिणामांचा धोका वाढतो.

Belly fats how to burn belly fat using 5 20 30 method know from expert
Belly Fats: पोटाची चरबी वाढतेय? तज्ज्ञांनी सांगितलेली ‘ही’ पद्धत एकदा वापरून पाहा
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
What is the right time to have breakfast
सकाळी ८ ते १० नाही, तर नाश्त्याची ही वेळसुद्धा ठरू शकते फायदेशीर? वाचा तज्ज्ञांचे मत…
women are saying no to sex after Trumps win
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर अमेरिकेतील महिलांचा लैंगिक संबंधास नकार; कारण काय? काय आहे 4B चळवळ?
Can drinking water with food cause gas or indigestion
जेवताना पाणी प्यावे का? जेवताना पाणी प्यायल्याने अपचनाचा त्रास होतो का? डॉक्टरांकडून घ्या जाणून…
who are intersex people
इंटरसेक्स लोक कोण असतात? समाजात वावरताना त्यांना कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागतो?
donald trump latest marathi news
विश्लेषण: अमेरिकी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांची अनपेक्षित मुसंडी कशी?

हेही वाचा… अन्नाबरोबर पाणी प्यायल्याने गॅस किंवा अपचन होऊ शकते का? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला

पोटाच्या आरोग्यावर परिणाम

दीर्घकाळ NSAIDs चा वापर केल्याने पचनसंस्थेशी (गॅस्ट्रोइंटेस्टाइनल- GI) संबंधित समस्या उद्भवू शकतात.

गॅस्ट्रायटिस (जठराची सूज) : पोटाच्या अस्तराच्या सूजेमुळे वेदना, मळमळ आणि उलट्या होऊ शकतात.

पेप्टिक अल्सर : पोटावर किंवा लहान आतड्याच्या वरच्या भागावर जखम होते, ज्यामुळे पोटदुखी, सूज येणे आणि अपचन होते.

गॅस्ट्रोइंटेस्टिनल रक्तस्राव : पेनकिलर्स औषधांचा दीर्घकाळ वापर केल्यास पोटात रक्तस्राव होऊ शकतो, जो जीवघेणा ठरू शकतो. याचे संकेत म्हणजे काळ्या किंवा रक्ताने माखलेले मल, रक्ताच्या उलट्या होणे किंवा अशक्तपणा जाणवणे.

हेही वाचा… करवा चौथचा उपवास करताय? काय खावं काय खाऊ नये हे कळत नाहीय? तज्ज्ञांकडून जाणून घ्या

या परिस्थितीचा धोका जास्त डोस, दीर्घकाळापर्यंतचा वापर आणि अनेक औषधांच्या वापरामुळे वाढतो. याशिवाय, गॅस्ट्रोइंटेस्टिन असलेल्या व्यक्ती, वृद्ध प्रौढ आणि जे मद्यपान करतात, त्यांना या साइड इफेक्ट्सची अधिक शक्यता असते.

किडनी आरोग्यावर परिणाम

रक्तातील टाकाऊ पदार्थ (कचरा) फिल्टर करण्यात आणि द्रव संतुलन राखण्यास किडनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. दीर्घकाळासाठी पेनकिलर्सचा वापर विशेषत: NSAIDs आणि काही प्रिस्क्रिप्शन औषधांचा वापर केल्याने किडनीवर ताण आणू शकतात, ज्यामुळे विविध आरोग्य समस्या उद्भवू शकतात.

किडनीची इजा (Acute Kidney Injury): पेनकिलर्सच्या औषधांचा अतिवापर किडनींना अचानक नुकसान करू शकतो, ज्यामुळे त्यांची फिल्टरिंग क्षमता कमी होते. यामुळे रक्तामध्ये टाकाऊ पदार्थ जमा होऊ शकतात, जे धोकादायक असू शकतात.

क्रॉनिक किडनी आजार (Chronic Kidney Disease): पेनकिलर्स औषधांचा दीर्घकाळ वापर केल्याने किडनींची कार्यक्षमता हळूहळू कमी होऊ शकते, ज्यामुळे किडनी फेल होण्याचा धोका वाढतो. हे विशेषतः त्यांच्यासाठी चिंतेचे आहे, ज्यांना आधीच किडनीच्या समस्या आहेत किंवा मधुमेह, उच्च रक्तदाब आहे.

द्रव जमा होणे (Fluid Retention) : पेनकिलर्ससारखी औषधे शरीरात द्रव टिकवून ठेवण्यास मदत करू शकतात, ज्यामुळे रक्तदाब वाढतो तर किडनीवर अतिरिक्त ताण येतो.

हेही वाचा… “गेले सहा दिवस मी बेडवर…”, रकुल प्रीत सिंगला झाली गंभीर दुखापत, इन्स्टाग्रामवर VIDEO शेअर करत दिली माहिती, वाचा तज्ज्ञांचा सल्ला

पेनकिलर्सची औषधे घेतल्यानंतर सतत पोटदुखी, शौचाच्या सवयींमध्ये बदल, पाय किंवा घोट्यामध्ये सूज, थकवा आणि मूळव्याध झाल्यास डॉक्टरांशी संपर्क करा.

पेनकिलर सुरक्षित पद्धतीने वापरासाठी सर्वोत्तम पद्धती

पेनकिलरच्या वापरामुळे होणारी जोखीम कमी करण्यासाठी खालील सल्ले विचारात घ्या:

डोसच्या सूचनांचे पालन करा : नेहमी दिलेल्या किंवा शिफारस केलेल्या डोसचे पालन करा. स्वतःच औषध घेऊ नका आणि जर तुम्हाला सतत वेदना असतील तर डॉक्टरांशी संपर्क करा.

वेगवेगळे पर्याय ट्राय करा : वेदनेच्या प्रकारावर अवलंबून, शारीरिक उपचार, ॲक्युपंक्चर किंवा ध्यान यांसारख्या पद्धती आराम देऊ शकतात.

नियमित तपासणी : जर तुम्ही नियमित पेनकिलर्स वापरत असाल तर पोट आणि किडनीच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्यासाठी नियमित वैद्यकीय तपासणीचा विचार करा.

मद्यपान टाळा : अल्कोहोलबरोबर पेनकिलर घेतल्याने पोटात जळजळ आणि किडनी खराब होण्याचा धोका वाढू शकतो.