scorecardresearch

Premium

नाशपती खा, वजन कमी करण्यापासून रक्तदाब नियंत्रित ठेवण्यापर्यंत मिळतील हे फायदे; वाचा, तज्ज्ञ काय सांगतात…

हे फळ फायबर, व्हिटामिन्स आणि खनिजांचा प्रमुख स्रोत आहे. नाशपतीमध्ये कोणते पोषक घटक आढळतात, या संदर्भात ‘द इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना पोषणतज्ज्ञ डॉ. प्रियंका रोहतगी यांनी सविस्तर माहिती दिली आहे.

Pears help to control blood sugar and aid weight loss
नाशपती खा, वजन कमी करण्यापासून रक्तदाब नियंत्रित ठेवण्यापर्यंत मिळतील हे फायदे (Photo : loksatta)

नाशपती हे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. पण, अनेकदा आपण नाशपती या फळाकडे दुर्लक्ष करतो. पण, हे फळ मधुमेह, वजन नियंत्रित ठेवणे, आतड्याच्या व हृदयाच्या चांगल्या आरोग्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. विशेष म्हणजे या फळात फॅट आणि कोलेस्ट्रॉल नसते.
हे फळ फायबर, व्हिटामिन्स आणि खनिजांचा प्रमुख स्रोत आहे. नाशपतीमध्ये कोणते पोषक घटक आढळतात, या संदर्भात ‘द इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना पोषणतज्ज्ञ डॉ. प्रियंका रोहतगी यांनी सविस्तर माहिती दिली आहे.

फायबर

चुकीच्या जीवनशैलीमुळे भारतात अनेक लोकांना पचनाशी संबंधित समस्या दिसून येतात. अशा लोकांनी आवर्जून नाशपतीचे सेवन करावे. हे फळ फायबरयुक्त आहे. एका मध्यम आकाराच्या नाशपतीमध्ये जवळपास सहा ग्रॅम फायबर असते, जे बद्धकोष्ठता आणि आतड्यांसंबंधित आजार दूर करण्यास मदत करतात.

Cozy Cardio
‘रोज गाणी ऐकत ४५ मिनिटे घरातच चाला’ असे सांगणारा Cozy Cardio व्यायाम नक्की आहे तरी काय? जाणून घ्या सर्वकाही
wedding dresses
लग्नांच्या पोशाखात ‘पेस्टल’ रंगच ‘हिट’!
car testing dummy lady
मोटार अपघाताबाबतच्या सुरक्षा टेस्टिंगमध्ये स्त्री डमी वापरूनही अभ्यास!
flipkart give 35,501 rs discount on iphone 14
iPhone 14 स्वस्तात खरेदी करण्याची संधी; ‘या’ ठिकाणी मिळतोय ३५ हजारांचा डिस्काउंट

व्हिटामिन्स

नाशपतीमध्ये व्हिटॅमिन सी आढळते. भारतातील उष्ण हवामानात हे फळ अधिक फायदेशीर ठरते. याशिवाय रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासही मदत करते.

खनिजे

नाशपतीमध्ये पोटॅशियमची मात्रा अधिक असते. पोटॅशियम हृदयाच्या आरोग्यासाठी अधिक फायदेशीर आहे. हृदय आणि रक्तवाहिन्यांसंबंधित आजार दूर करण्यासाठी नाशपतीचा आहारात समावेश करणे गरजेचे आहे.

अँटिऑक्सिडंट्स

नाशपतीमध्ये फ्लेव्होनॉइड्स आणि कॅरोटीनॉइड्स (flavonoids and carotenoids) सारखे अँटिऑक्सिडंट्स असतात. शरीरातील पेशींचे ऑक्सिडेटिव्ह नुकसान होऊ नये म्हणून हे अँटिऑक्सिडंट्स संरक्षण करण्यास मदत करतात.

हेही वाचा : वजन कमी करण्यासाठी कार्ब्स आणि फॅट्सचे सेवन कमी करताय? तुमचे आयुष्य होऊ शकते कमी, संशोधनाचा दावा

मधुमेही रुग्णांसाठी फायदेशीर

मधुमेह असलेल्या लोकांनी रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी दुपारच्या जेवणादरम्यान नाशपतीचे सेवन करावे.
एका मध्यम आकाराच्या नाशपतीमध्ये सुमारे २२ ग्रॅम कार्बोहायड्रेट्स असतात, जे मधुमेह नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. जास्तीत जास्त फायबरचे सेवन करण्यासाठी नाशपती खा. यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहण्यास मदत होते.

नाशपती हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर

हृदयाशीसंबंधित आजार दिवसेंदिवस वाढत आहे. हृदयाचे आरोग्य जपताना सकाळी किंवा दुपारच्या स्नॅकमध्ये नाशपतीचे सेवन करावे. यातील पोटॅशियममुळे दिवसभर रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते.
२०१९ च्या एका अभ्यासात असे समोर आले आहे की उच्च रक्तदाब, अतिरिक्त चरबी, ग्लुकोज पातळीत वाढ इत्यादी मेटाबॉलिक सिंड्रोम असलेल्या लोकांनी १२ आठवड्यांपर्यंत दररोज दोन नाशपती खाल्ल्यास त्यांचा रक्तदाब नियंत्रित होताना दिसून आला. उच्च रक्तदाब हा हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधीच्या आजारांसाठी धोकादायक आहे.

हेही वाचा : वजन कमी करण्यासाठी केल्या जाणाऱ्या केटो डाएटमुळे किडनी स्टोन होऊ शकतो? वाचा काय सांगतात तज्ज्ञ…

आतड्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर

चुकीच्या जीवनशैलीमुळे भारतात पचनाशी संबंधित समस्या प्रामुख्याने दिसून येतात. अनेकदा चुकीच्या आहाराच्या सवयी यासाठी कारणीभूत ठरतात. पण, यावर नाशपती एक नैसर्गिक उपाय ठरू शकतो. जर या फळाचा तुम्ही सकाळच्या नाश्त्यात समावेश केला तर दिवसभर पचनक्रिया सुरळीत राहण्यास मदत होऊ शकते.
एका मध्यम आकाराच्या नाशपतीमध्ये जवळपास सहा ग्रॅम फायबर असतात, ज्यामुळे आतड्यांशी संबंधित समस्या दूर होऊ शकतात.

वजन कमी करण्यास मदत करते

वजनवाढीची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. वजन नियंत्रित आणि कमी करण्यासाठी लोक वाट्टेल ते प्रयत्न करतात. पण, तुम्हाला माहिती आहे का नाशपती हे जेवणाआधी खाल्ल्याने वजन कमी करण्यास फायदेशीर ठरते; कारण यामुळे भूक नियंत्रित राहण्यास मदत होते.

नाशपतीचे कमी प्रमाणात सेवन करणे गरजेचे असते, कारण त्यात फ्रक्टोज किंवा नैसर्गिक साखर असते. नाशपतीला आपल्या दैनंदिन आहाराचा भाग बनवा आणि त्यापासून मिळणाऱ्या असंख्य फायद्यांचा लाभ घ्या.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Pears help to control blood sugar and aid weight loss read how pears work as nutrition powerhouse ndj

First published on: 25-09-2023 at 16:06 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×