Mango In Diabetes : आपल्याला उन्हाळा तसा कुणालाच आवडत नाही पण आंब्यासाठी आपण उन्हाळ्याची वर्षभर वाट बघत असतो. त्याच आंब्याचा हंगाम आता येणार आहे. आंबा हा जवळ-जवळ सगळ्याच लोकांचा प्रिय फळ आहे. आंबा हे अतिशय चवदार आणि आरोग्यदायी फळ आहे. रसाळ आणि गोड आंबे पाहून स्वतःवर नियंत्रण ठेवणे कठीण होते. त्यामुळे आपलं पोट भरलं असलं तरी देखील लोक, आंबा खायला कधीही नाही म्हणत नाहीत. गोडपणा आणि चवीसाठी लोकप्रिय असलेल्या आंब्याचे विविध प्रकार आहेत जे खायला चविष्ट असतात. हापूस, अल्फोन्सो, पायरी, लंगडा इत्यादी या फळाच्या १५०० हून अधिक जाती आहेत. या प्रत्येक आंब्याची त्याची अशी वेगळी चव आहे. परंतु आंबा हा गोड असल्यामुळे तो मधुमेहाच्या रुग्णांनी खावा की नाही असा प्रश्न अनेकांना पडतो, कारण तो गोड असल्यामुळे त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी आणखी वाढू शकते. परंतु आंबा खाण्यापासून लोक स्वत:ला थांबवू शकत नसल्यामुळे ते एक तरी आंबा खातातच. चला जाणून घेऊया मधुमेहाच्या रुग्णांनी आंब्याला घाबरण्याची खरंच गरज आहे की नाही?

मधुमेहामध्ये आंबा खाऊ शकतो का ? –

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, जर तुमच्या रक्तातील साखरेची पातळी स्थिर असेल तर तुम्ही आंबा खाऊ शकता.मात्र त्यावर नियंत्रण ठेवले पाहिजे. कारण एका आंब्यामध्ये सुमारे 15 ग्रॅम कर्बोदके असतात.प्रत्येक आंब्यात कमी-जास्त प्रमाणात गोडवा असतो. प्रमाणाबाहेर ब्लड शुगर किंवा वजन असणाऱ्यांनी आपल्या डाएटीशियनच्या सल्ल्याने आंब्याचं प्रमाण ठरवावं.

forever particles marathi news, forever particles latest marathi news
विश्लेषण : जगभर पिण्याच्या पाण्यात आढळतात घातक `फॉरएव्हर पार्टिकल्सʼ… त्यांचे उच्चाटन अवघड का असते?
Why are naphthalene balls kept with clothes to be put away How do you use naphthalene balls in a wardrobe
कपड्यांमधील ओलसरपणा, कुबट वास होईल गायब; कपाटात ठेवा ‘ही’ गोळी, जाणून घ्या वापराची योग्य पद्धत
why Sleeping Pills Rising Among Young Adults
झोपेच्या गोळ्या निद्रानाशावरचा अंतिम उपाय आहेत का? झोपेच्या गोळ्या शक्यतो घेऊ नका असं डॉक्टर का सांगतात?
Can adding salt to drinking water help prevent dehydration this summer
उन्हाळ्यात पाण्यात चिमूटभर मीठ टाकून प्यावे का? डॉक्टर काय सांगतात वाचा….

कोणत्या वेळेला खावा आंबा? –

आंबा शक्यतो सकाळी खावा. सकाळी मेटबॉलिक रेट चांगला असतो. सकाळी खाल्लेल्या पदार्थांचं पचन चांगलं होतं. सकाळी शारीरिक हालचालींचं प्रमाण जास्त असतं त्यामुळे पचनसंस्था जास्त कार्यक्षम असते. त्यामुळे आंबा दिवसा खावा, संध्याकाळनंतर कोणतेही फळ प्रामुख्याने आंबा जास्त गोड असल्याने शक्यतो टाळावा.

हेही वाचा – Gudi Padwa 2023 :गुढीपाडव्याचा खास बेत! कटाची आमटी बनवा ‘या’ सोप्या पद्धतीने, पुरणपोळीला येईल अधिक स्वाद

मधुमेहामध्ये आंबा खाताना ही काळजी घ्या –

एकाच वेळी मोठ्या प्रमाणात आंबा खाणे टाळा.
तुम्ही आधी १/२ कप आंबा खाऊन रक्तातील साखर वाढते की नाही ते तपासा.
तुमच्या रक्तातील साखरेनुसार तुम्हाला आंबा खाण्याचे प्रमाण ठरवावे लागेल.
मधुमेहाच्या रुग्णांनी सामान्य प्रथिनेयुक्त आहार घ्यावा. यामुळे आहार संतुलित राहतो.
तुम्ही आंब्यासोबत उकडलेले अंडी, चीज किंवा नट्ससारखे प्रथिनयुक्त पदार्थ खाऊ शकता.