ऑफिसमध्ये मधल्या वेळेस आपल्याला काहीतरी चटपटीत खाण्याची नक्की इच्छा होते. कारण- दुपारचे जेवण होऊन बराच वेळ झालेला असतो आणि रात्रीचे जेवण व्हायला बराच वेळ बाकी असतो. मग अशा वेळी कॅन्टीनमध्ये उपलब्ध असणारे काहीतरी चटपटीत पदार्थ आपण खातो. त्यामध्ये वडापाव, कचोरी, मखाना, स्लाइस केक, भेळ, चिप्स, बिस्कीट, समोसा, भजी आदी बऱ्याच खाद्यपदार्थांचा (Snacks) समावेश असतो.

पण, हे भाजलेले किंवा तळलेले खाद्यपदार्थ खाणे तुमच्या रक्तातील साखरेसाठी सुरक्षित आहेत का? तर मधुमेही असलेल्या लोकांना त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी एकसमान ठेवण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. चेन्नईचे डायबिटीज स्पेशॅलिटी सेंटरचे अध्यक्ष डॉक्टर व्ही. मोहन यांनी द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना मधुमेही रुग्णांना खाद्यपदार्थांच्या सुरक्षित पर्यायांबद्दल मार्गदर्शन केले आहे.

Stale vs fresh roti Find out which one might help regulate blood sugar
रात्री फ्रिजमध्ये ठेवलेली पोळी सकाळी खावी का? शिळी पोळी रक्तातील साखरेचे नियमन करू शकते का? तज्ज्ञ काय सांगतात
bottle gourd halwa for diabetics and heart patients
मधुमेही अन् हृदयरोग्यांसाठी ‘दुधी हलवा’ ठरतो फायदेशीर? डॉक्टर्स नेमके काय सांगतात जाणून घ्या…
Before blaming diabetes drugs understand What chemicals are used in medicines
मधुमेहावरल्या औषधांना दोष देण्याआधी समजून तरी घ्या…
Foods For a Diabetic:
तुम्हाला मधुमेह असल्यास ‘या’ पदार्थांचा करा आहारात समावेश; रक्तातील साखरेची पातळी राहील नियंत्रणात

मधुमेही रुग्णांना हा प्रश्न सतत पडतो की, कामावर असताना सतत भूक लागते, चटपटीत खाण्याची इच्छा होते. तेव्हा तळलेले किंवा भाजलेले खाद्यपदार्थ खाणे त्यांच्यासाठी योग्य ठरेल का ? तर या प्रश्नावर डॉक्टर व्ही. मोहन म्हणतात की, मधुमेहींसाठी तळलेले आणि भाजलेले खाद्यपदार्थ खाणे समस्याग्रस्त ठरू शकते. कारण- बहुतेक खाद्यपदार्थ हे व्यवस्थित भाजलेले नसतात. ते मुळात तेलात तळलेले असतात; जे नंतर अधिक प्रमाणात खाल्ले जातात आणि त्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होतो, असे डॉक्टर व्ही. मोहन म्हणतात.

तळलेले आणि भाजलेले खाद्यपदार्थ मधुमेही रुग्णांनी का टाळावे?

(१) कमी फायबर सामग्री : अनेक भाजलेल्या आणि तळलेल्या खाद्यपदार्थांमध्ये फायबरची कमतरता असते. फायबर रक्तप्रवाहातील साखरेचे शोषण कमी करण्यासाठी आणि रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवण्यासाठी महत्त्वाची असते. पुरेशा फायबरशिवाय हे खाद्यपदार्थ खाल्ल्याने रक्तातील साखरेमध्ये वाढ होऊ शकते.

(२) फॅट्स आणि मीठ : काही भाजलेल्या आणि तळलेल्या खाद्यपदार्थांमध्ये साखर आणि फॅट्स (ट्रान्स फॅट्स आणि सॅच्युरेटेड फॅट्स) असतात; जे परिणामी चयापचय क्रिया बिघडवतात आणि मग ती इन्सुलिन रेझिस्टन्ससाठी कारणीभूत ठरते. त्यामुळे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधीच्या समस्या उदभवू शकतात. या दोन्ही गोष्टी मधुमेहींसाठी चिंताजनक आहेत. भाजलेल्या पॅकिंगमधील खाद्यपदार्थांवर विविध प्रक्रिया केली जाते. जास्त मीठ व मसाले घातलेले आणि पॅकिंगचे खाद्यपदार्थ विकत घेण्यापेक्षा घरी शेंगदाणे भाजून घ्या आणि ते एका बरणीत ठेवा आणि त्याचे सेवन करा.

(३) कार्बोहायड्रेट कन्टेन्ट (सामग्री) : अनेक भाजलेले आणि तळलेले खाद्यपदार्थ जसे की, बटाटा चिप्स यामध्ये कर्बोदकांचे प्रमाण जास्त असते. हे प्राथमिक पोषक घटक आहेत; जे रक्तातील साखरेच्या पातळीचे प्रमाण वाढवतात आणि त्याचे जास्त सेवन केल्याने व्यक्तींना त्रास देखील होऊ शकतो.

(४) उच्च ग्लायसेमिक इंडेक्स : मधुमेह असलेल्या रुग्णांनी उच्च ग्लायसेमिक इंडेक्स असलेले पदार्थ खाणे टाळावे. कारण- ते रक्तातील साखरेची पातळी वाढवू शकतात. काही भाजलेले आणि तळलेले खाद्यपदार्थ (स्नॅक्स) दावा करतात की, या पदार्थात फॅट्सचे प्रमाण नियंत्रित आहे. पण, उच्च ग्लायसेमिक इंडेक्स (GI) म्हणजे ते सेवन केल्यानंतर रक्तातील साखरेची पातळी जलद वाढते; जे मधुमेह असलेल्या लोकांसाठी धोकादायक असू शकते.

(५) पोर्शनवर कंट्रोल : पोर्शन कंट्रोल म्हणजेच आहाराच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवणे. भाजलेले आणि तळलेले खाद्यपदार्थ (स्नॅक्स) बहुतेक वेळा अत्यंत रुचकर असतात. त्यामुळे ते प्रमाणाच्या बाहेर खाल्ले जातात; ज्यामुळे हे पदार्थ खाण्याच्या बाबतीत स्वतःला नियंत्रित करणे अनेकदा कठीण जाते. पण, हे पदार्थ तुमच्यासाठी निरोगी आहेत हा गैरसमज आहे. या पदार्थाचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने तुमच्या शरीरातील साखरेचे प्रमाण वाढू शकते. त्यामुळे तुमच्या आहाराच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवा.

हेही वाचा…मॅग्नेशियमयुक्त आहार लोह आणि कॅल्शियमइतकाच महत्त्वाचा का? पाहा तज्ज्ञ काय म्हणतात…

तुमच्या शरीरासाठी उपयुक्त साखर कमी असलेले स्नॅक्स खाताना तुम्ही खालील पर्यायांचा विचार करू शकता.

१) सुक्या भाजलेल्या डाळी जसे की, चणे हे तुमच्या शरीरास प्रथिने आणि फायबर दोन्ही प्रदान करतात. त्यामुळे तुम्ही याचे सेवन करू शकता.

२) ताजी फळे खा. तुम्हाला खूप भूक लागत असेल, तर तुमच्या बॅगेत कायम एक फळ ठेवा. फळांमध्ये फायबर आणि पौष्टिक घटकदेखील असतात. तसेच सुका मेवा हा कुकीजपेक्षा (cookies) चांगला असला तरी तरीही तो तुमच्या रक्तातील साखर वाढवतो ही बाब लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे.

३) कोणतेही अतिरिक्त पदार्थ न टाकता सॅलड खा.

४) काजू, बिया आदींचे मीठ, साखर न घालता सेवन करा. लक्षात ठेवा हे पदार्थ कच्चे किंवा उकडलेले असले पाहिजेत.

५) एखाद्या पदार्थात हायड्रोजनेटेड वनस्पती तेल यासारखे घटक आहेत का हे पाहण्यासाठी लेबल काळजीपूर्वक वाचा.

तुमची खाद्यपदार्थांची निवड काहीही असो; पदार्थांचे सेवन करताना पोर्शन कंट्रोल आणि कॅलरी मोजणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण- थोडीशी निष्काळजी तुमच्या शरीराला हानीकारक ठरू शकते आणि तुमच्या रक्तातील साखरेची पातळी वाढवू शकते, असे डॉक्टर व्ही. मोहन म्हणतात