डॉ. विभावरी निगळे

ट्रिंग ट्रिंग! माझी मैत्रीण डॉ. गीता हिचा फोन होता. “अगं, अनघा आली आहे माझ्याकडे. ताप आलाय म्हणून. तू काय जादू केलीस? तिचा चेहरा ओळखूच येत नाहीये.” अनघा ही तिचीच पेशंट. तिनेच माझ्याकडे पाठवलेली. पिंपल्सनी भरलेला चेहरा अन्‌ जुन्या पिंपल्सचे डाग व खड्डे. औषधांनी मुरुमे तर गेली आणि इतर उपचारांनी खड्डे देखील बऱ्यापैकी कमी झाले.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Sharad Pawar On Devendra Fadnavis CM Oath Ceremony
Sharad Pawar : महायुती सरकारच्या शपथविधीला का नाही…

तर आज आपण ह्या  मुरुमांचे डाग आणि व्रणांकरिता कॉस्मेटॉलॉजीच्या विविध उपचार पद्धतींची माहिती करून घेऊ या.

केमिकल पील
या औषधांच्या वापराने त्वचेचा वरचा थर काढून  टाकला जातो. त्यामुळे त्वचेवरील तैल ग्रंथींची तोंडे उघडून  त्यामध्ये साठलेले  तेल बाहेर पडते आणि त्वचा कोरडी होते. रंगद्रव्य साठून काळ्या झालेल्या पेशी निघून जातात व डाग देखील  फिकट होतात. ही रसायने म्हणजे विविध फळांपासून बनवलेली आम्ले असतात. त्यांच्या निरनिराळ्या तीव्रतेच्या पातळ्यांचा वापर केला जातो. ऊस, दूध, सफरचंद, चेरीज व काही तेल बिया यांच्यापासून ही आम्ले तयार केली जातात.

आणखी वाचा: Health Special: क-कॉस्मेटॉलॉजीचा

मायक्रोडर्म ॲब्रेजन
या उपचार पद्धतीत मशीनच्या सहाय्याने त्वचेचा वरचा थर काढून  टाकला जातो. याकरता  ॲल्युमिनियम  ऑक्साईड  ही खरखरीत पावडर वापरली जाते. परंतु ॲक्टिव्ह  पिंपल्स  असल्यास अथवा नाजूक त्वचा असल्यास ही पद्धत वापरता येत नाही.

ऑक्सि – ॲब्रेजन
 या उपचार पद्धतीत खरखरीत पावडर ऐवजी ऑक्सिजन आणि सलाईन यांना विशिष्ट पेनाने त्वचेमध्ये दाबाने सोडण्यात येते. त्यामुळे नाजूक त्वचेवर देखील ही पद्धत वापरता येते. गरज पडल्यास वरीलपैकी दोन उपचार एकाचवेळी करण्यात येतात. या तीनही उपचारांनी त्वचेचा वरचा थर निघाल्यामुळे त्वचा कोरडी होते, डाग कमी होतात, आणि त्वचा गुळगुळीत व मुलायम दिसू लागते.

कधी कधी जास्त प्रमाणात त्वचेचा थर निघाल्यास त्वचा भाजल्याप्रमाणे काळी पडू शकते आणि त्याचे डागही राहू शकतात. अर्थात काही उपचारांनी हे डाग निघून जातात. त्यामुळे ही उपचार पद्धती तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली केली जाते.

हे उपचार औषधांबरोबरच केले जातात. काही वेळा औषधे घेणे शक्य नसेल तर फक्त केमिकल पील केले जाते. परंतु या उपचारांनी व्रण कमी होत नाहीत. त्याकरता लेझर किंवा MNRF या मशीन्सचा वापर केला जातो.

डर्मारोलर किंवा मायक्रो-निडलींग
या उपचारामध्ये अति बारीक निर्जंतुक सुया असलेले उपकरण व्रण असलेल्या त्वचेवरून फिरवले जाते. त्यामुळे तिथे नवीन कोलॅजीन फायबर्स तयार होऊन खड्डे व व्रण भरून येतात.

लेझर आणि MNRF मशीन्स
या मशीन्सचा वापर व्रणांवर उपचार करण्याकरिता होतो. ही मशीन्स विशिष्ट लहरींचा वापर करून त्वचेच्या खालच्या थरातील खराब कोलॅजन हे प्रथिन नष्ट करून, तेथील पेशींना नवीन कोलॅजन तयार करण्यास उद्युक्त करतात. या नवीन कोलॅजनमुळे खड्डे आणि व्रण भरून येतात.

कार्बन डाय ऑक्साईड (CO2) लेझरमुळे त्वचा लाल होऊन नंतर काळी पडते व हा काळा थर सात दिवसात निघून जातो आणि त्वचा मुलायम बनते. या सात दिवसात सूर्यप्रकाशापासून काळजी घेणे आवश्यक असते. त्यामुळे सनस्क्रीन उन्हात जाताना त्याचबरोबर गॅसपाशी काम करताना वापरले पाहिजे. आपण भारतीयांची त्वचा डार्क या सदरात येत असल्याने हे संरक्षण अत्यावश्यक असते. परंतु MNRF ह्या मशीन करता उन्हापासून संरक्षण अत्यावश्यक नसल्याने आपल्या त्वचेला ही उपचार पद्धती लाभदायक ठरते.

क्रायो थेरपी
या उपचार पद्धतीत ड्राय आईस (घन कार्बन डाय ऑक्साईड वायू)  किंवा द्रवरूप नायट्रोजन वायू  वापरण्यात येतो. या दोन्ही वायूमुळे  त्वचेचे तापमान शून्याच्या खाली जाते. त्यामुळे त्वचेच्या वरच्या थरातील पेशी  मृत होऊन वरचा थर निघून येतो. शिवाय त्वचेवरील  P. acnes हे जंतू देखील या तापमानाला जिवंत राहू शकत नाहीत. 

स्टीरॉईड इंजेक्शन
मोठे फोड किंवा सिस्ट  यामधील पू काढून  त्यात स्टीरॉईडचे इंजेक्शन देण्यात येते. ज्यामुळे तो फोड बसतो आणि पुढे व्रण होण्याचा धोका टळतो. तसेच जिथे मुरूमे बरे झाल्यानंतर घट्ट जाड व्रण ( Hypertrophic scar ) तयार होतात त्या व्रणात देखील स्टीरॉईड इंजेक्शन देऊन ते बरे केले जातात.

या विविध नवीन उपचार पद्धतीमुळे मुरुमांच्या उपचारांमध्ये आमूलाग्र  बदल घडून आला आहे. तरी देखील हे उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून करून घ्यावेत. अशा व्यक्तींनी चेहऱ्याचे सूर्यप्रकाशापासून संरक्षण करणे  आणि उपचार चालू असताना  चेहऱ्यावर कोणतीही  प्रसाधने डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय न वापरणे ही काळजी घ्य़ावी लागते. 

Story img Loader