scorecardresearch

करोनाच्या नव्या व्हिरियंटपासून स्वतःचे रक्षण करायचे आहे? तर आत्तापासून फॉलो करा ‘या’ सवयी

चीनमध्ये पुन्हा करोनाचे उद्रेक होत आहे. अशा परिस्थित नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेतली नाही तर त्यांना करोनाच्या भयंकर संकटाचा सामना करावा लागेल.

करोनाच्या नव्या व्हिरियंटपासून स्वतःचे रक्षण करायचे आहे? तर आत्तापासून फॉलो करा ‘या’ सवयी
चीनमध्ये दिवसेंदिवस करोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडत असून ही अनेक देशांसाठी धोक्याची बाब असल्याचं बोललं जातं आहे.

जगभरातील नागरिकांनी नववर्षाच्या उत्सवाची तयारी सुरु केली आहे. मात्र, चीन आणि जपानमध्ये करोनाचा उद्रेक झाल्यामुळे नववर्षाच्या उत्सवापुर्वीच नागरिकामध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. चीनमध्ये दिवसेंदिवस करोनाच्या रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडत असून ही सर्वच देशांसाठी धोक्याची बाब असल्याचं बोललं जातं आहे. कारण याआधी करोनाची सुरुवात ही चीनमधूनच झाली होती.

करोनाची चौथी लाट भारतात येण्याच्या चर्चाही सध्या सुरू झाल्या आहेत. त्यामुळे भारत सरकार सावध झालं असून गर्दीच्या ठीकाणी मास्क वापरण्याचं आवाहन सरकारकडून करण्यात आलं आहे. भारतातील लोकांची चिंता वाढली असली तरी इंडियन मेडिकल असोसिएशनचे (IMA) डॉ. अनिल गोयल यांनी ‘भारतातील ९५ टक्के लोकसंख्येमध्ये करोनाविरूद्ध लढणयाची प्रतिकारशक्ती विकसित झाली असल्यामुळे देशात लॉकडाऊन होणार नसल्याचं सांगितलं आहे. शिवाय भारतीय नागरिकांची प्रतिकारशक्ती चिनी लोकांच्या तुलनेत जास्त असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. याबाबतची माहिती आजतक या हिंदी वृत्तवाहिनीने दिली आहे.

हेही वाचा- करोनाचं संकट पुन्हा घोंगावतंय! प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश

दरम्यान, देशात सध्या लॉकडाऊनची गरज भासणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. मात्र, तरीही डॉक्टरांनी लोकांना करोनाच्या बाबतीत सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. करोनाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यासही सांगितले आहे. अमेरिका आणि जपानप्रमाणे चीनमध्येही करोनाची वाढती प्रकरणे पाहता भारत सरकार सावध झाल्याचं पाहायला मिळतं आहे.

भारतात सध्या करोनाचा उद्रेक झाला नसला तरी २०२०-२१ मध्ये करोनाच्या भयंकर लाटेचा अनुभव सर्वांना आला आहे. त्यावेळी देशभरातील लाखो नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले होते. अशातच आता चीनमध्ये पुन्हा करोनाचे उद्रेक होत आहे. अशा परिस्थित आपण योग्य ती खबरदारी घेतली नाही तर आपल्याला करोनाच्या चौथ्या लाटेला सामोर जावं लागू शकतं. त्यामुळे करोनाचा संसर्ग टाळायचा असेल तर काही गोष्टींची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे, त्या गोष्टी कोणत्या ते चला जाणून घेऊया.

हेही वाचा- Coronavirus: देशभरामध्ये परत मास्कसक्ती? केंद्र सरकार म्हणालं, “मास्क बंधनकारक करण्यासंदर्भात सध्या…”

स्वच्छतेची काळजी घ्या –

करोनाचा धोका टाळण्यासाठी स्वच्छतेची विशेष काळजी घेणे आवश्यक असल्याचं आरोग्य तज्ज्ञांचे मत आहे. यासाठी आपले हात पाण्याने आणि साबणाने सतत धुवायला हवेत, तसंच सॅनिटायझरचाही वापर करणं गरजेचं आहे. शिंकताना किंवा खोकताना, तोंड आणि नाक आपल्या कोपराने किंवा रुमालाने झाकने आवश्यत आहे. तसंच दरवाजांचे हँडल, नळ आणि फोन स्क्रीन सतत स्वच्छ करायला हवी, कारण या गोष्टींना आपण सतत स्पर्श करत असतो.

मास्क वापरा –

घराबाहेर पडताना नेहमी मास्क वापरा, तोंड आणि नाक व्यवस्थित झाका. मास्क घालण्यापूर्वी आपले हात स्वच्छ करा. याशिवाय मास्क काढल्यानंतर पुन्हा हात धुवा. तसेच, मास्क दररोज धुवा, जर तुम्ही डिस्पोजेबल मास्क वापरत असाल तर ते एकापेक्षा जास्त वेळ वापरु नका.

परिसराची स्वच्छता ठेवा-

तुमच्या आजूबाजूला कोणाला खोकला, ताप किंवा सर्दीचा त्रास जाणवत असेल तर अशा व्यक्तीजवळ जाणे टाळा. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) 3C (closed, crowded, close contact) टाळण्याचा सल्ला दिला आहे. ज्यामध्ये बंद ठिकाणे, गर्दी आणि कोणाच्याही खूप जवळ न जाण्याचा समावेश आहे. तर दुसरीकडे, जर तुम्ही घरामध्ये असाल तर, खिडक्या आणि दरवाजे उघडे ठेवा. जेणेकरुन घरामध्ये हवा खेळती राहिल. तर आजारी व्यक्तीने स्वतःला आणि इतरांना कोविड -19 पासून सुरक्षित ठेवण्यासाठी योग्य त्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करायला हवे असा सल्लाही WHO ने दिला आहे.

हेही वाचा- विश्लेषण: आजपासून भारतात उपलब्ध होणार iNCOVACC नेजल व्हॅक्सिन; जाणून घ्या कोणाला घेता येणार ही लस, कुठे करावी नोंदणी

आजारी असल्यास डॉक्टरांशी संपर्क साधा.

कोविड लसींचे सर्व डोस घेतल्यानंतरही जर तुम्हाला आजारी असल्याचं जाणवत असेल तर ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा. शिवाय कोविड-19 च्या सामान्य लक्षणांबाबत सतर्क रहा. करोनाच्या लक्षणांमध्ये, ताप, कोरडा खोकला, थकवा, वास कमी होणे, अन्नाची चव कमी होणे यासह डोकेदुखी, घसा खवखवणे, डोळे लाल आणि खाज सुटणे, अतिसार, त्वचेवर पुरळ येणे यांचा समावेश आहे.

मराठीतील सर्व हेल्थ ( Health-tips ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-12-2022 at 11:58 IST

संबंधित बातम्या