scorecardresearch

किडनी निकामी होण्याचा धोका वाढवतात ‘या’ डाळी; जाणून घ्या शिजवण्याची योग्य पद्धत

Uric Acid Can Increase Due To These Pulses: आयुर्वेदिक तज्ज्ञांचं माहितीनुसार प्युरीन युक्त पदार्थांचे अधिक सेवन केल्यास युरिक ऍसिडचे प्रमाण वाढू शकते. आपल्या नेहमीचं आहारातील अनेक डाळींमध्ये सुद्धा प्युरीन असते.

किडनी निकामी होण्याचा धोका वाढवतात ‘या’ डाळी; जाणून घ्या शिजवण्याची योग्य पद्धत
किडनी निकामी होण्याचा धोका वाढवतात 'या' डाळी (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Uric Acid Can Increase Due To These Pulses: शरीरात युरिक ऍसिडचे प्रमाण वाढल्यास याचा सर्वात मोठा धोका तुमच्या किडनीला असतो. डॉ. अमरेंद्र कुमार यांच्या माहितीनुसार, शरीरातील युरिक ऍसिड हे मुख्यतः किडनीच्या मार्फत फिल्टर होऊन मलमूत्रातून बाहेर पडते पण जेव्हा किडनीची कार्यक्षमता कमी होते तेव्हा युरिक ऍसिड वाढीस लागते. हेच युरिक ऍसिड छोट्या खड्यांसारखे शरीरात जमा होते. युरिक ऍसिडचा मारा शरीरातील सर्वच अवयवांवर परिणाम करतो. यामुळे अनेक आजारांना आमंत्रण मिळू शकते. युरिक ऍसिडचा धोका वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे आपला आहार.

आयुर्वेदिक तज्ज्ञांचं माहितीनुसार प्युरीन युक्त पदार्थांचे अधिक सेवन केल्यास युरिक ऍसिडचे प्रमाण वाढू शकते. आपल्या नेहमीचं आहारातील अनेक डाळींमध्ये सुद्धा प्युरीन असते. युरिक ऍसिड वाढल्यास पायात गोळे येणे, सांधेदुखी, पोटदुखी, उठताना बसताना या सतत आधार घ्यावा लागणे, बोटांना सूज येणे, गाठ झाल्याचे वाटणे, हातापायाच्या बोटांमध्ये सतत काहीतरी टोचतंय असं वाटणे अशा समस्या उद्भवतात. असे त्रास जाणवत असतील तर आपल्याला काही डाळींचे सेवन टाळायला हवे.

किडनी निकामी होण्याचा धोका वाढवतात ‘या’ डाळी

अनेक डाळींमध्ये प्रथिने मुबलक प्रमाणात असतात. मुख्यतः शाकाहारी मंडळींसाठी डाळ हा प्रोटीनचा मोठा स्रोत आहे. याशिवाय डाळीत फायबर, थायमिन, राइबोफ्लेविन, नियासिन, पँटोथिनिक ऍसिड, फोलेट, पाइरिडोक्सिन, विटामिन बी कॉम्प्लेक्स, कॅल्शियम, फॉस्फरस, झिंक असे अनेक सत्व असतात. मात्र काही डाळी जसे की मसूर, राजमा, चणा, व छोले यामध्ये प्युरीनचे प्रमाण अधिक असते. यामुळे युरिक ऍसिड वाढीस लागते. जर आपण या डाळींचे सेवन करणारच असाल तर निदान त्याचे प्रमाण ४० ते ५० ग्रॅम इतकेच मर्यादित ठेवावे.

हे ही वाचा<< किडनी निकामी होण्याआधी पायात दिसतात ‘ही’ लक्षणे; युरिक ऍसिड वाढल्यास हे ५ उपाय येतील कामी

डाळ कशी शिजवावी?

आहारतज्ञांच्या माहितीनुसार युरिक ऍसिड वाढणे किंवा कमी होणे हे तुम्ही डाळ काशी शिजवता यावर सुद्धा अवलंबून असते. डाळीतील आवश्यक सत्वांचा पूर्ण फायदा घेण्यासाठी आपण डाळ शिजवण्याच्या एक तास आधी डाळ भिजत ठेवायला हवी. शिजवताना शक्यतो कुकरचा वापर टाळावा. पाणी, हळद टाकून एखाद्या भांड्यात डाळ शिजवणे फायद्याचे ठरते.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे, यास वैद्यकिय सल्ला समजू नये)

मराठीतील सर्व हेल्थ ( Health-tips ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 25-12-2022 at 17:54 IST

संबंधित बातम्या