Bananas and Curd : केळी आणि दही हे पौष्टिक पदार्थ आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे, पण खरंच केळी आणि दह्याचे एकत्रित सेवन केल्याने ते आणखी फायदेशीर ठरते का? लैंगिक आरोग्यासाठी दही आणि केळी खाण्याचा सल्ला देणारे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. याविषयी द इंडियन एक्स्प्रेसनी अधिक जाणून घेण्यासाठी मुंबई येथील वोक्हार्ट हॉस्पिटल्सच्या इंटरनल मेडिसीनच्या डॉ. ऋतुजा उगलमुगले यांच्याशी संवाद साधला.

सुरुवातीला आपण केळी आणि दह्याचे फायदे जाणून घेऊ या.

SYMBIOSEXUAL
तुम्ही सुद्धा ‘Symbiosexual’ आहात का? ही नवीन लैंगिक ओळख नेमकी काय आहे? इंटरनेटवर याची इतकी चर्चा का?
4th October Rashi Bhavishya in marathi
४ ऑक्टोबर पंचांग: मेष, वृषभसह ‘या’ राशींवर देवी…
virat kohli Anushka Sharma monotrophic diet benefits in marathi
विराट-अनुष्काचा ‘मोनोट्रॉफिक डाएट प्लॅन’ शरीरास खरंच फायदेशीर असतो का? वाचा तज्ज्ञ काय सांगतात
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य पुन्हा येईल, अशी स्थिती…”; शरद पवारांचं वक्तव्य चर्चेत
Sarvajanik Ganesh Mandal Banner Goes Viral on Mahaprasad Will Be Given Only To Members netizens reacts
सार्वजनिक मंडळाचा ‘तो’ बॅनर पाहून लोक भडकले; PHOTO पाहून सांगा अशा मंडळांचं काय करायचं?
sunil tingre connection with Porsche car accident
कल्याणीनगर अपघात प्रकरणात आमदार टिंगरेंची चौकशी केल्याला पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचा दुजोरा
china biggest dam in the world
चीनमधील ‘या’ अवाढव्य धरणामुळे पृथ्वीचा वेग मंदावला? धरणाचा नेमका परिणाम काय होतोय?
LokPoll Survey Results in Maharashtra
LokPoll Survey: महाराष्ट्रात लोकसभेची पुनरावृत्ती होणार; मविआला १४१ ते १५४ जागा, तर महायुतीला…

केळी

डॉ. उगलमुगले यांच्या मते, केळ्यामध्ये पोटॅशियम भरपूर प्रमाणात असतात, जे रक्तप्रवाह सुधारण्यास मदत करतात. याशिवाय केळी हे लैंगिक आरोग्यासाठी एक महत्त्वाचा घटक आहे. “केळ्यामध्ये जीवनसत्त्वे बीचे प्रमाण जास्त असते, जे ऊर्जेची पातळी वाढवण्यास आणि तणाव कमी करण्यास मदत करतात, यामुळे व्यक्तीची लैंगिक कार्यक्षमता वाढू शकते.
केळ्यामध्ये ब्रोमेलेन नावाचे एन्झाइमदेखील असते, जे लैंगिक इच्छा (libido) वाढवते आणि पुरुषांमधील नपुंसकता कमी करते”, असे डॉ. उगलमुगले पुढे सांगतात.

पचनक्रिया : केळ्यामध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते, जे पचनास मदत करतात आणि आतड्यांचे आरोग्य चांगले ठेवण्यास मदत करतात.

ऊर्जा : केळ्यामध्ये कर्बोदकांचे प्रमाण भरपूर असते, जे ऊर्जा प्रदान करतात.

हृदयाचे आरोग्य : केळ्यातील पोटॅशियम रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास तसेच स्ट्रोकचा धोका कमी करून हृदयाचे आरोग्य सुदृढ ठेवण्यास मदत करतो.

हेही वाचा : Nutritional Deficiencies : तुम्हाला सतत चॉकलेट किंवा चिप्स खाण्याची इच्छा होते? शरीरात ‘या’ पौष्टिक घटकांची असू शकते कमतरता; जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात

दही

दह्यात प्रोबायोटिक्स भरपूर प्रमाणात असतात, जे आतड्यांचे आरोग्य सुधारतात. प्रोबायोटिक्स लैंगिक आरोग्य सुधारण्याससुद्धा मदत करतात, असे डॉ. उगलमुगले सांगतात. त्या पुढे सांगतात, “दही हा प्रोटीनचा एक चांगला स्रोत आहे, जो लैंगिक कार्यक्षमतेसह स्नायूंचे आरोग्यदेखील उत्तम ठेवण्यास मदत करतो.

पचनक्रिया : दह्यामध्ये प्रोबायोटिक्स असतात, जे निरोगी आतड्यांतील मायक्रोबायोमला अन्न पचण्यासाठी व पोषक घटक शोषून घेण्यासाठी मदत करते.

हाडांचे आरोग्य : दह्यामध्ये कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी भरपूर प्रमाणात असतात, जे हाडे मजबूत ठेवण्यास मदत करते.

रोगप्रतिकारकशक्ती : दह्यातील प्रोबायोटिक्स आतड्यांतील चांगले बॅक्टेरिया नियंत्रित ठेवून रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यास मदत करतात.

हेही वाचा : झोपेचं रुटीन बिघडलंय! फक्त एक तासाची कमी झोप तुमच्या आरोग्यासाठी ठरेल धोक्याची घंटा? तज्ज्ञांनी केला खुलासा

केळी आणि दह्याचे एकत्रित फायदे

केळी आणि दही एकत्र सेवन केल्यावर त्याचा एकत्रित प्रभाव दिसू शकतो, असे डॉ. उगलमुगले सांगतात. डॉ. उगलमुगले पुढे सांगतात, “केळी आणि दही एकत्रित सेवन केल्याने कर्बोदके, प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिजे यांचे संतुलित मिश्रण शरीरास मिळते. तसेच केळी आणि दही पचनाशी संबंधित समस्या दूर करतात, ज्यामुळे आपण संपूर्णपणे निरोगी राहतो आणि आपल्याला भरपूर ऊर्जा मिळते.”

डॉ. उगलमुगले यांच्या मते, केळी आणि दही एकत्रित खाल्ल्याने ऊर्जा पातळी आणि शारीरिक क्षमता राखण्यास मदत होते, ज्यामुळे आपले सामान्य आरोग्य आणि लैंगिक आरोग्य निरोगी राहते.

डॉ. उगलमुग्ले यांच्या मते, केळी आणि दही एकत्रित सेवन केल्याने आरोग्यावर विशेषतः लैंगिक आरोग्यावर होणाऱ्या परिणामांवर संशोधन मर्यादित आहे, त्यामुळे अधिक माहितीसाठी आरोग्यतज्ज्ञांचा तसेच आहारतज्ज्ञ व पोषणतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.