Ghee Tea Benefits : तुम्ही आजवर तुपापासून बनवलेले अनेक पदार्थ खाल्ले असतील. हल्ली तुपापासून बनवल्या जाणाऱ्या कॉफीचेसुद्धा सर्वांना वेड लागले आहे. कारण वजन कमी करण्यासाठी तुपापासून तयार केलेली कॉफी फायदेशीर ठरू शकते. आता तुपाच्या कॉफीबरोबर तुपाचा चहासुद्धा आरोग्यासाठी फायदेशीर असल्याचे अनेक व्हिडीओंमधून समोर येत आहे. आतड्यांच्या आरोग्यासाठी, मासिक पाळीदरम्यान आराम मिळावा म्हणून आणि बद्धकोष्ठतेचा त्रास दूर करण्यासाठी तुपाचा चहा सुपरफूड म्हणून काम करतो. चहामध्ये एक चमचा तूप घालण्याचा सल्ला अनेक सोशल मीडिया पोस्टमधून करण्यात आला आहे.

View this post on Instagram

A post shared by Shilpa Arora (@dr.shilpaarora)

Anushka Sharma shares how her family adopted an early sleep routine; neurologist explains its importance for couples with kids
अनुष्का-विराट लवकर जेवण करतात अन् लवकर झोपतात; जाणून घ्या त्यांचं स्लीप रुटीन अन् त्याचे फायदे
amazon river drying up
विश्लेषण: जगातील सर्वांत मोठी ॲमेझॉन नदी पडतेय कोरडीठाक……
PresVu Eye Drop Drug regulator suspends licence
PresVu Eye Drop : चष्म्याचा नंबर घालवण्याचा दावा करणाऱ्या आय ड्रॉपच्या विक्रीचा परवाना दोनच दिवसांत निलंबित; कारण काय
Condoms cant protect you from sexually transmitted infections
कंडोमचा वापर करूनही वाढतोय ‘या’ संसर्गाचा धोका; डॉक्टरांनी सांगितलेल्या ‘या’ सहा गोष्टी लक्षात ठेवा अन् काळजी घ्या
Study says sleeping in on weekends can reduce heart disease risk by 20%:
आठवड्याभराची अपुरी झोप वीकेंडला घेतल्याने हृदयविकाराचा धोका कमी होऊ शकतो; संशोधनातून समोर आली माहिती
IPS Shivdeep Lande Resign
IPS Shivdeep Lande Resign : आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे यांचा तडकाफडकी राजीनामा; कारण काय?
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य पुन्हा येईल, अशी स्थिती…”; शरद पवारांचं वक्तव्य चर्चेत
bacteria in sky
हवेतील जंतू पसरवत आहेत का साथीचे रोग?

आहारतज्ज्ञ शिल्पा अरोरा यांनी चहा बनवण्याची एक सोपी रेसिपी शेअर केली आहे. “दूध न टाकलेल्या चहामध्ये तूप घाला. ही एक जुनी आयुर्वेदिक रेसिपी आहे”, असे अरोरा सांगतात. याशिवाय यूट्यूबर सिम्मी गोराया यांनी चहाची रेसिपी शेअर केली आहे. हा चहा मासिक पाळीतील वेदना कमी करण्यास मदत करतो.

रेसिपी :

अर्धा कप पाणी घ्या. त्यात चहापत्ती आणि ओवा टाका.
त्यानंतर त्यात दूध टाका आणि चहा तयार झाल्यानंतर त्यात अर्धा चमचा तूप टाका.

हेही वाचा : आठवड्याभराची अपुरी झोप वीकेंडला घेतल्याने हृदयविकाराचा धोका कमी होऊ शकतो; संशोधनातून समोर आली माहिती

तुपाचा चहा खरंच फायदेशीर आहे का?

तुपापासून बनवला जाणारा चहा हा चहा आणि तुपाचे मिश्रण असते. “चहाच्या कपमध्ये एक चमचा तूप टाकावे. तुपामध्ये चांगले फॅट्स, जीवनसत्त्वे आणि इतर फायदेशीर संयुगे (compounds) असतात, तसेच चहामध्ये अँटिऑक्सिडेंट असतात जे अनेक आरोग्याच्या समस्या दूर करतात. तूप आणि चहाचे एकत्रित मिश्रण हे आरोग्यास फायदेशीर पेय तयार करते, जे पचनाशी संबंधित आरोग्याच्या समस्या आणि संपूर्ण आरोग्य सुदृढ ठेवण्यास मदत करते”, असे न्यूट्रिशनिस्ट डॉ. रोहिणी पाटील सांगतात.

पाटील पुढे सांगतात, “जेव्हा चहामध्ये तूप टाकले जाते तेव्हा त्यातील गुणधर्म बद्धकोष्ठतेचा त्रास दूर करण्यास फायदेशीर ठरू शकतात”
डॉ. पाटील यांच्या मते, तुपामध्ये ब्युटीरेट एक शॉर्ट-चेन फॅटी ॲसिड असते, जे आतड्यांचे आरोग्य सुधारण्यास आणि जळजळ कमी करण्यास मदत करते. तुपामध्ये याशिवाय अँटिऑक्सिडंट्स असतात, जे मासिक पाळीदरम्यानच्या वेदना कमी करतात.

तुपाचे अनेक फायदे आहेत, पण खालील गोष्टींचा विचार करणे तितकेच गरजेचे आहे.

  • तुपामध्ये कॅलरीज आणि फॅट्स भरपूर असतात, त्यामुळे त्याचा आस्वाद घेताना कॅलरीजवर नियंत्रण ठेवा.
  • तुम्हाला दुग्धजन्य पदार्थांची ॲलर्जी आहे का, याची खात्री करा. तुपाचा चहा घेण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांचा सल्ला घ्या.
  • जर तुम्हाला दीर्घकालीन बद्धकोष्ठतेची समस्या जाणवत असेल किंवा मासिक पाळीदरम्यान वेदना जाणवत असतील तर आरोग्यतज्ज्ञांचा सल्ला घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तुपाचा चहा तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो, पण त्याबरोबरच वैद्यकीय उपचार आणि तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या, असे डॉ. पाटील सांगतात.