Onion Juice : लोकप्रिय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि अभिनेत्री कुशा कपिला कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. नुकतेच कुशा कपिलाने आरोग्याविषयी बोलताना पोटदुखीवर त्वरित आराम कसा मिळवायचा, याविषयी घरगुती उपाय सांगितला आहे.

कुशा कपिला ही मीरा कपूर, नीतू कपूर आणि अथिया शेट्टी यांच्याशी संवाद साधताना सांगते, “जेव्हा तुम्हाला पोटदुखीचा त्रास उद्भवतो तेव्हा कांद्याचा रस फायद्याचा ठरतो. लहानपणी आई मला कांद्याचा रस प्यायला द्यायची.”
कपिलाने सांगितल्याप्रमाणे, एक कांदा घ्या आणि त्याचा रस काढा आणि प्या. याविषयी द इंडियन एक्स्प्रेसनी तज्ज्ञांच्या हवाल्याने कांद्याचा रस पिण्याचे फायदे जाणून घेतले.

one litre of water for weight loss
Pratik Gandhi : दिवसातून फक्त एक लिटर पाणी प्यायल्याने वजन कमी होऊ शकते का? ‘स्कॅम १९९२’ फेम प्रतीक गांधींचे रुटीन तुम्ही फॉलो करावे का?
Manoj Jarange, Manoj Jarange movement,
विश्लेषण : मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा प्रभाव ओसरला?…
What happens to the body when you start your day with spinach juice
सकाळी उठताच पालकाचा रस प्यायल्यास काय परिणाम होतो? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत…
Khushi Kapoor : No-Dairy Diet
Khushi Kapoor : खुशी कपूर दुग्धजन्य पदार्थ खात नाही, तिने सांगितले यामागील कारण; वाचा, तज्ज्ञ काय म्हणाले…
Khushi Kapoor
खुशी कपूरने कधी रिक्षाने प्रवास केलाय का? उत्तर देत म्हणाली, “आई-बाबांचा विरोध…”
Following PM Modi’s speech Akshay Kumar shares 4 key tips to help tackle rising obesity in India
“गेल्या अनेक वर्षांपासून मी हेच सांगतोय…”, मोदींनंतर आता खिलाडी अक्षयने सांगितल्या लठ्ठपणा कमी करण्यासाठी खास टिप्स
What happens to your body when you don't poop everyday
पोट रोज नीट साफ होत नसेल, तर त्याचा शरीरावर नेमका काय परिणाम होतो? वाचा, डॉक्टर काय सांगतात
Maharashtra kesari Kaka Pawar on Shivraj Rakshe About Controversy
Maharashtra Kesari: “महाराष्ट्र केसरीच्या पंचांना जन्मठेप देणार का?” शिवराज राक्षेच्या निलंबनानंतर कुस्ती प्रशिक्षकांचा संतप्त सवाल, नेमकं काय म्हणाले?

कांद्याच्या रसाचे फायदे

हैदराबाद येथील ग्लेनेगल्स हॉस्पिटल्सच्या क्रिटिकल केअर विभागाचे प्रमुख आणि सल्लागार डॉ. मनेंद्र सांगतात, “कांद्याचा रस पोटदुखीसह विविध आजारांवर दीर्घ काळापासून घरगुती उपचार म्हणून वापरला जातो.”

मनेंद्र सांगतात, “कांद्याच्या रसामध्ये सल्फर, फ्लेव्होनॉइड्स आणि अँटिऑक्सिडंट्स आहेत, ज्यात आरोग्यासाठी फायदेशीर असे गुणधर्म आहेत. कांद्याचा रस अपचन किंवा सौम्य गॅस्ट्रोइंटेस्टाइनल संसर्गामुळे होणारा पोटाचा त्रास कमी करण्यास मदत करू शकतो.

हेही वाचा : Nutritional Powerhouses For Liver : क्रूसीफेरस भाज्या म्हणजे काय तुम्हाला माहीत आहे का? यकृतासाठी होतो मोठा फायदा; वाचा, तज्ज्ञ काय म्हणतात…

वैद्यकीय सल्ला महत्त्वाचा

त्यांनी निदर्शनास आणले की, पोटदुखीसाठी कांद्याचा रस फायदेशीर असल्याचे वैज्ञानिक पुरावे मर्यादित आहेत. ते पुढे सांगतात, “अति संवेदनशील पोट किंवा ॲसिड रिफ्लक्स (पचनाशी संबंधित आजार) सारख्या परिस्थितीमध्ये कच्च्या कांद्याचा रस खाल्ल्याने लक्षणे वाढू शकतात, ज्यामुळे छातीत जळजळ किंवा चिडचिड होऊ शकते”, असे डॉ. मनेंद्र सांगतात.

असे उपाय करण्यापूर्वी पोटदुखीचे मूळ कारण ओळखणे महत्त्वाचे आहे – मग ते गॅस, पोट फुगणे, संसर्ग किंवा कोणत्याही पोटाशी संबंधित गंभीर समस्यांमुळे पोटदुखी उद्भवू शकते. “पोटदुखीदरम्यान हायड्रेशन, विश्रांती आणि गरज भासल्यास ओव्हर-द-काउंटर औषधे (नॉन-प्रिस्क्रिप्शनशिवाय घेतलेली औषधी) घेऊ शकता”, असे डॉ. मनेंद्र सांगतात.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा : HMPV Virus Causes Treatment : एचएमपीव्ही व्हायरसचा कहर! हा आजार किती घातक, नेमकी लक्षणे काय? संसर्गावर उपाय कोणते? जाणून घ्या सर्व काही….

जर तुम्हाला पोटदुखीसंदर्भात गंभीर लक्षणे दिसून येत असतील तर वैद्यकीय सल्ला घेणे महत्त्वाचे आहे, असे डॉ. मनेंद्र सांगतात. “कांद्याचा रस काही लोकांना थोडा आराम देऊ शकतो, पण पोटाशी संबंधित आजारासाठी वैद्यकीय सल्ला घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे,” असे डॉ. मनेंद्र म्हणाले.

Story img Loader