scorecardresearch

धुतल्यानंतरही तुमचे केस तेलकट दिसतात का? जाणून घ्या कारण आणि उपाय

तुमच्या केसांसाठी वापरणाऱ्या उत्पादनांमध्ये काही बदल केल्याने तुम्हाला तेलकट टाळूपासून मुक्ती मिळण्यास मदत होईल.

Reasons your hair gets oily even after washing it
धुतल्यानंतरही तुमचे केस तेलकट दिसतात का? ( Image Credit Freepik)

ज्या दिवशी तुम्ही केस धुता त्याच दिवशी तुमचे केस तेलकट होतात का? तुमचे उत्तर कदाचित हो असेल पण याचा अर्थ असा नाही की ते वांरवार धूत राहावे. त्यापेक्षा त्यावर चांगला पर्याय शोधा आणि तुमच्या तेलकट केसांपासून सुटका मिळवा.

तुमच्या तेलकट केसांच्या समस्यांवरील उपाय सांगण्यासाठी डर्मटॉलॉजिस्ट डॉ जया भाटिया यांनी इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये त्या सांगतात की, तुमच्या केसांसाठी वापरणाऱ्या उत्पादनांमध्ये काही बदल केल्याने तुम्हाला तेलकट टाळूपासून मुक्ती मिळण्यास मदत होईल. तुमचा शॅम्पूमध्ये सेलेनियम सल्फाइड आणि झिंक सारख्या घटक आहेत का हे तपासा. हे तुमच्या टाळूवरील तेलाचे उत्पादन कमी करण्यासाठी उत्तम आहेत. सॅलिसिलिक ऍसिड देखील एकंदर ऑइल बिल्ड अप काढून टाकण्यात आश्चर्यकारक काम करते. स्निग्धता दूर ठेवण्यासाठी या घटकांनी पॅक केलेला शॅम्पू वापरा,” तिने लिहिले.

तुमचा वारंवार टाळू तेलकट का होतो?

तेलकट केस हे मुळात टाळूवर वाढलेल्या तेल उत्पादनाचा परिणाम आहे. इंडियन एक्सप्रेससोबत बोलताना, स्पर्श हॉस्पिटलमधील त्वचाशास्त्रज्ञ आणि त्वचा शल्यचिकित्सक, सल्लागार डॉ. अनघा समर्थ, यांनी सांगितले की, केस तेलकट होण्यामागे अनेक कारणे असू शकतात. त्यापैकी काही खाली समाविष्ट आहेत:

  • वातावरणातील आर्द्रता
  • मोठ्या सेबेशियस ग्रंथी असणाऱ्यांमध्ये एक उपजत क्षमता असते ज्यामुळे त्यांच्या केसांचा तेलकटपणा वाढतो.
  • जास्त व्यायामामुळेही तेलाचे उत्पादन वाढू शकते.
  • काहीवेळा, तणावामुळे तेलाचे उत्पादन वाढू शकते कारण ते कॉर्टिसॉल सारख्या काही संप्रेरकांवर परिणाम करते.

हेही वाचा : उन्हाळ्यात तुम्हीही तांब्याच्या बाटलीमधून पाणी पिताय? तर ‘या’ गोष्टींचा काळजी घ्या, अन्यथा

वारंवार केस का धुवू नये

जर तुमची टाळू तेलकट आणि खवलेयुक्त असेल, तर तुमचे केस जास्त वेळा खाजवू नका आणि सॅलिसिलिक अॅसिड सारखे घटक वापरणे चांगले. “जर तुम्ही तुमचे केस खूप वेळा धुत असाल, विशेषत: महिलांसाठी, तर ते टाळूच्या संरक्षक तेलाच्या थराला काढून टाकू शकतात. म्हणून, आम्ही सहसा आठवड्यातून तीनदा केस धुण्याची शिफारस करतो. टाळूला कंडिशनर लावू नका; ते फक्त केसांचवर लागू करणे आवश्यक आहे”

डॉ अनघा म्हणाल्या, अतिरिक्त तेल उत्पादनावर उपचार करण्यासाठी सॅलिसिलिक ऍसिड आणि टी ट्री ऑईल असलेले शॅम्पू वापरण्याची शिफारस केली जाते.

“शॅम्पूमधील कोरफडचे घटक देखील टाळूच्या तेलकटपणाचे व्यवस्थापन करण्यास मदत करू शकते,” ती पुढे म्हणाली.

“पण, वरील शिफारस केलेले शॅम्पू वापरूनही ते बरे होत नसल्यास, औषधांसाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे उचित आहे,” असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-03-2023 at 12:33 IST

संबंधित बातम्या