“माझ्याकडे बरेच तरुण रुग्ण आढळतात जे ‘फॅटी लिव्हर’ची तक्रार करतात आणि म्हणतात की, ते अजिबात मद्यपान करत नाही. पण, वस्तुस्थिती अशी आहे की NAFLD (‘नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज’) या आजारामध्ये तुम्ही एक थेंबही मद्य प्यायला नसतानाही यकृताच्या पेशींमध्ये खूप फॅट्स साठलेले असतात. ही आरोग्य स्थिती जगभरात वाढत असून आता ती अत्यंत सामान्य गोष्ट होत आहे. बहुतांश भारतीय आनुवंशिकता, इन्सुलिन प्रतिरोध (insulin resistance), कोलेस्ट्रॉल आणि लठ्ठपणा यांसारख्या स्थितीशी लढतो, या सर्वांचा यकृतावर ताण येतो. म्हणूनच ‘नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज’ (NAFLD) याला आता ‘मेटाबॉलिक डिसफंक्शन-संबंधित स्टीटोटिक लिव्हर डीसीज’ (MASLD) म्हटले जाते”, असे डॉ. रोमेल टिकू यांनी द इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना सांगितले. डॉ. रोमेल टिकू हे नवी दिल्लीतील साकेत येथील, मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील इंटरनल मेडिसिन विभागाचे डायरेक्टर आहेत.

“NAFLD ही आरोग्य स्थिती असलेल्या काही व्यक्तींना ‘नॉन-अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटीस’ (NASH) विकसित होऊ शकतो. हा फॅटी लिव्हर या रोगाचा एक आक्रमक प्रकार आहे, जो यकृतामध्ये होणाऱ्या जळजळ या लक्षणांवरून ओळखता येतो आणि आजार आणखी वाढत गेल्यास सिरॉसिस आणि यकृत निकामी होण्याची शक्यता आहे. हे नुकसान जास्त मद्यपानामुळे झालेल्या नुकसानासारखेच आहे. सामान्य लोकसंख्येतील अंदाजे २० ते ३० टक्के प्रौढांना आणि लठ्ठपणा आणि मधुमेह असलेल्या ७० टक्क्यांहून अधिक रुग्णांना NAFLD चा त्रास होतो”, असे डॉ. रोमेल टिकू यांनी स्पष्ट केले.

health special H. pylori acidity stomach infection
Health Special : एच. पायलोरी – का होते हे अ‍ॅसिडिटी व जठरातील इन्फेक्शन ?
Here’s why you should start your day with fenugreek seeds or methi water
सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा मेथीचे पाणी का प्यावे? काय सांगतात आहारतज्ज्ञ, जाणून घ्या…
liver failure sign
लिव्हर खराब झाल्यास पायात दिसतात ‘ही’ ५ लक्षणे; वेळीच धोका ओळखा
Fatty Liver,
फॅटी लिव्हर असेल तर आहार कसा असावा? पहा संपूर्ण यादी

डॉ. रोमेल टिकू यांच्या मते “यकृतातील फॅट्स कमी करण्यासाठी आहार आणि व्यायाम हे अत्यंत महत्त्वाचे आहे. एफएलडीवर उपचार करण्यासाठी कोणतीही औषधे नसली, तरी चांगला आहार आणि नियमित व्यायामामुळे ते बरे करता येऊ शकते. तुमच्या शरीराच्या सध्याच्या वजनाच्या १० टक्के वजन कमी केल्याने यकृतातील फॅट्सचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी होऊ शकते, तसेच जळजळदेखील कमी होऊ शकते; येथेच आजार नियंत्रण करण्यासाठी आहाराची भूमिका महत्त्वाची ठरते.”

‘फॅटी लिव्हर’ हा आजार बरा करण्यासाठी कोणते पदार्थ टाळावेत आणि त्यात काय खावे? याबाबत डॉ. टिकू यांनी सविस्तर माहिती दिली आहे.

हेही वाचा – हिवाळ्यात रोज लिंबू-मध पाणी प्यावे की नाही? त्याचा शरीरावर काय परिणाम होतो? जाणून घ्या तज्ज्ञांकडून….

‘फॅटी लिव्हर’ हा आजार बरा करण्यासाठी काय टाळावे?

१) कृपया साखरयुक्त पदार्थ खाऊ नका : कुकीज, बिस्किटे, कँडी, सोडा, स्पोर्ट्स ड्रिंक्स, पॅकेज केलेले ज्यूस, मिठाई आणि चॉकलेट्स, प्री-मिक्स केलेला चहा आणि कॉफी यांसारख्या झटपट साखरेची पातळी वाढवणारे पदार्थ खाणे टाळा.

२) तळलेले आणि प्रक्रिया केलेले पदार्थ खाऊ नका : तळलेले मासे वाफवण्याचा किंवा उकळण्याचा प्रयत्न करा. कोणतेही प्रक्रिया केलेले मांस टाळा, कारण त्यात सॅच्युरेडेट फॅट्स असतात. फ्रेंच फ्राईज, तळलेले चिकन, डोनट्स, चिप्स, बर्गर आणि इतर कोणत्याही प्रकारचे फास्ट फूड यांसारखे लोणी आणि ट्रान्स फॅट असलेले पदार्थ खाणे टाळा. प्रक्रिया केलेल्या खाद्यपदार्थांमध्ये बऱ्याचदा फ्रक्टोजची उच्च पातळी असते किंवा उच्च फ्रक्टोज कॉर्न सिरपसारखे पदार्थ असतात, ज्यामुळे यकृतामध्ये फॅट्सचे प्रमाण वाढू शकते आणि यकृतामध्ये जळजळ होऊ शकते.

३) मीठयुक्त पदार्थ खाऊ नका : याचा अर्थ तुम्ही मीठ असलेले कोणत्याही प्रकारचे पॅकेज केलेले अन्न खाणे टाळले पाहिजे. सोडियमचे सेवन मर्यादित करा. दररोज २३०० मिलीग्रामपेक्षा कमी मीठाचे सेवन करा. उच्च रक्तदाब असलेल्यांनी दररोज १५००० मिलीग्रामपेक्षा जास्त मीठ खाऊ नये.

४) पांढरा ब्रेड, भात किंवा पास्ता खाऊ नका : ते शरीरात सहजपणे विघटन होतात, त्यामुळे शरीरातील साखरेच्या पातळीत सहज वाढ होऊ शकते. लक्षात ठेवा संपूर्ण धान्य असलेला आहार ही प्रक्रिया मंद करतात, कारण त्यात फायबरचे प्रमाण जास्त असते.

५) भुकेपेक्षा जास्त आहार घेऊ नका : तुमच्या आहाराच्या प्रमाणाकडे लक्ष ठेवा. कारण जास्त प्रमाणात खाल्ल्याने गरजेपेक्षा जास्त कॅलरीज शरीरात जमा होऊ शकतात, ज्या सहज फॅट्सच्या रूपात जमा होतात आणि ते फॅटी यकृत आजाराचा धोका वाढवतात. जेवताना लहान प्लेट्स वापरा आणि आपले आहाराचे प्रमाण नियंत्रित करण्यासाठी भांड्यांमध्ये जेवण घ्या.

हेही वाचा – १६ तासांच्या इंटरमिटेंट फास्टिंगनंतर सर्वात आधी फायबर का खावे? तज्ज्ञांकडून जाणून घ्या उत्तर…

‘फॅटी लिव्हर’ हा आजार बरा करण्यासाठी काय खावे?

१) पहिली गोष्ट म्हणजे जेवणाच्या वेळा ठरवा आणि त्याप्रमाणे खाण्याचा सराव करा. आठ ते दहा तासांच्या दैनंदिन अंतराने जेवण्याचा प्रयत्न करा. एक चांगला नाश्ता, एक मध्यम स्वरुपात दुपारचे जेवण आणि सूप किंवा सॅलेडचे हलके जेवण, तेही संध्याकाळी ७ वाजेपर्यंत.

२) तुम्ही ब्लॅक कॉफी घेऊ शकता, कारण फॅटी लिव्हर आणि असामान्य यकृत एन्झाइमचा धोका कमी होतो, असे अनेक अभ्यासांमध्ये दिसून आले आहे.

३) भरपूर पालेभाज्या खाव्यात, कारण त्यात नायट्रेट आणि पॉलीफेनॉल असल्यामुळे वनस्पती संयुगे फॅटी लिव्हर आजाराशी लढतात.

४) फायबरयुक्त फळे, भाज्या आणि संपूर्ण धान्य अशा आहाराची जवळपास अर्धी प्लेट इतके सेवन केले पाहिजे.

५) मसूर, चणे, सोयाबीन आणि मटार यांसारख्या शेंगांचा समावेश करा, जे फॅट्स नसलेले आणि पौष्टिक घटकांनी समृद्ध आहे.

६) ओमेगा-३ फॅटी ॲसिड समृद्ध मासे हे ट्रायग्लिसराइड्स (Triglycerides) कमी करतात. ट्रायग्लिसराइड्स हे तुमच्या रक्तात आढळणारे एक प्रकारचे फॅट्स आहेत.

७) तुमच्या आहारात लसणाचा समावेश करा : २०१९ मधील एका अभ्यासात असे आढळून आले आहे की, “लसणाच्या सेवनाने यकृतातील फॅट्स कमी होते आणि एन्झाइमची पातळी सुधारते.”