२०२१ पासून आयुर्वेदिक उपचारांचा लाभ घेणारे अभिनेता रोहित बोस रॉय यांनी नुकतेच केरळमध्येही जाऊन स्वत:वर पंचकर्म केले. पंचकर्म एकूण आरोग्याच्या कल्याणासाठी वापरली जाणारी आयुर्वेदिक उपचारपद्धती आहे. त्याबद्दल अनस्टॉपेबल पॉडकास्टवर बोलताना, त्यांनी स्पष्ट केले, “थेरपीचा एक भाग म्हणून ते प्रथम शरीर स्वच्छ करतात; जेणेकरून शरीर अधिक चांगल्या प्रकारे औषधाचा स्वीकार करू शकेल. पचनाच्या अनेक समस्यांसह मी तिथे गेलो होतो; पण एक वेगळी व्यक्ती म्हणून परत आलो आहे. मी १४ दिवसांत सहा किलो वजन कमी केले. माझ्या शरीरीचे शुद्धीकरण झालेय तिथे मी गजर न लावता, सकाळी ६ वाजता उठत होतो. हे सर्व बदल मी वेलनेस सेंटरला दिलेल्या पहिल्या भेटीनंतर झाले.

तो पुढे म्हणाला, “मी दरवर्षी एकदा ते पंचकर्म करून घेत होतो. आता मी वर्षातून दोनदा पंचकर्म करून घेतो. कधी कधी मी १० दिवसांसाठी जातो. मी तिथे वजन कमी करण्यासाठी जात नाही, तर स्वत:ला डिटॉक्स करण्यासाठी जातो. जेव्हा मी परत येतो, तेव्हा माझे शरीर बरे झालेले असते आणि आणखी गोष्टींचा सामना करण्यास तयार असतो.”

karnataka government on sbi pnb banks
“SBI व PNB मधील सर्व खाती बंद करा, ठेवी काढून घ्या”, कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय, सरकारी विभागांना दिले आदेश!
SYMBIOSEXUAL
तुम्ही सुद्धा ‘Symbiosexual’ आहात का? ही नवीन लैंगिक ओळख नेमकी काय आहे? इंटरनेटवर याची इतकी चर्चा का?
Abhishek Bachchan reacts on divorce rumors with Aishwarya Rai
ऐश्वर्या रायपासून घटस्फोट घेण्याच्या चर्चांवर अखेर अभिषेक बच्चनने सोडलं मौन; म्हणाला…
School Male Cleaner Abuse Girls in Badlapur
Badlapur School Case : “दादाने माझे कपडे काढले”, बदलापूर अत्याचार प्रकरणातील घाबरलेल्या मुलीने पालकांना दिली होती माहिती; FIR मध्येही नोंद!
Vasai, bhayandar railway station suicide, father and son suicide, Jai Mehta, dual marriage, Bhayandar railway station, southern girl
वसई : पिता पुत्राचे रेल्वे रूळावरील आत्महत्येचे गूढ उकलले; मुलाचे प्रेमसंबंध उघड
Nurse Rape and Murder
Rape On Nurse : घरी परतणाऱ्या नर्सवर बलात्कार आणि त्यानंतर केली हत्या, एकाला अटक
Ajit Pawar On Sharad Pawar
Ajit Pawar : “मी आता ठरवलंय, शरद पवारांबाबत…”, अजित पवार नेमकं काय म्हणाले?
Manu Bhaker's Father Statement on His Daughter and Neeraj Chopra Marriage Rumors
Manu Bhaker Neeraj Chopra: मनू भाकेर-नीरज चोप्राची सोयरीक जुळली? मनूच्या वडिलांनी केले मोठे वक्तव्य; म्हणाले, “नीरजला आम्ही…”

पंचकर्माबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, योग संस्थेचे संचालक डॉ. हंसाजी योगेंद्र यांच्याशी संवाद साधला. त्याबाबत दी इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना त्यांनी सांगितले, “पंचकर्म केवळ डिटॉक्सिफिकेशनसाठी फायदेशीर नाही, तर वजन कमी करण्यासदेखील मदत करते.

आयुर्वेदिक पंचकर्म म्हणजे काय?

आयुर्वेदिक पंचकर्म हे टॉक्सिफिकेशन आणि शरीरशुद्धीसाठी वापरली जाणारी उपचार पद्धती आहे, ज्याची रचना प्रत्येक व्यक्तीच्या विशिष्ट गरजेनुसार आखली जाते. “व्यक्तीच्या प्रकृती आणि शरीरातील कोणत्याही असंतुलनाचे (कफ, पित्त, वात या दोषांचे) मूल्यांकन करण्यासाठी आयुर्वेदिक डॉक्टरांबरोबर सविस्तर चर्चा करून सुरुवात होते. या मूल्यांकनाच्या आधारे, एक व्यक्तीच्या गरजा लक्षात घेऊन पंचकर्मांचे उपचार ठरवले जातात. त्यात पाच उपचारात्मक प्रक्रियांचा समावेश आहे आणि त्याचा उद्देश शरीराचे शुद्धीकरण हा आहे. शरीरातील विषारी घटक काढून टाकणे आणि त्रिदोषांचे (वात, पित्त आणि कफ) संतुलन करणे. ‘पंचकर्म’ या शब्दाचा अर्थ ‘पाच क्रिया’ किंवा पाच उपचार, असा आहे,” असे डॉ. हंसाजी यांनी सांगितले.

ही आहेत पंचकर्मे :

१. वमन

प्रक्रिया : उलटीद्वारे शरीरातील विशेषतः श्वसन आणि आतड्यातून कफ (विषारी घटक) बाहेर काढून टाकला जातो.
फायदा : शरीरातील श्लेष्मा काढून टाकतो, फुप्फुसाचे कार्य सुधारते आणि चयापचय सुधारते.

२. विरेचन (शुद्धीकरण)

कार्यपद्धती : आतडे स्वच्छ करण्यासाठी शुद्धीकरण करणाऱ्या पदार्थांचा वापर करून, यकृत आणि पित्ताशयामध्ये जमा झालेले पित्त (विषारी घटक) काढून टाकणे.
फायदा : यकृत डिटॉक्सिफाय करते, पचन सुधारते व वजन कमी करण्यास प्रोत्साहन देते.

३. बस्ती (एनिमा)

प्रक्रिया : मोठे आतडे साफ करण्यासाठी औषधी (एनिमा) वापरणे. अनुवासन बस्ती (तेल) व निरुहा बस्ती (काढा), असे एनिमा देण्याचे दोन प्रकार आहेत. .
फायदा : कचरा काढून टाकते, शोषण सुधारते व वात संतुलित करते.

४) नस्य

प्रक्रिया : डोके आणि घसा साफ करण्यासाठी औषधी तेल किंवा पावडर नाकपुडीमध्ये सोडणे.
फायदा : सायनसचा त्रास कमी होतो, मानसिक स्पष्टता येते आणि हार्मोन्स संतुलित करते.

५. रक्तमोक्षण (रक्तस्राव)

प्रक्रिया : विषारी पदार्थ काढून टाकण्यासाठी आणि रक्तातील अशुद्धतेशी संबंधित रोगांवर उपचार करण्यासाठी अल्प प्रमाणात रक्त काढून टाकणे.
फायदा : रक्त शुद्ध करते, दाहकता किंवा सूज कमी करते आणि पित्त संतुलित करते.

हेही वाचा – रोज थंड पाण्याने अंघोळ केल्यास खरंच वजन कमी होईल का? सुनील छेत्री यांच्या सल्ल्याबाबत तज्ज्ञ काय सांगतात?

पंचकर्मांमुळे कशी मदत मिळते?

  • डिटॉक्सिफिकेशन : चयापचयामध्ये अडथळा आणणारे आणि वजन वाढण्यास हातभार लावणारे विषारी घटक (Ama) काढून टाकले जातात.
  • चयापचय : पाचक अग्नी (अग्नी) वाढवते, चयापचय सुधारते आणि चांगले पचन व पोषक तत्त्वांचे शोषण्यास मदत करते.
  • दोषांचे संतुलन : वात, पित्त व कफ या त्रिदोषांचे संतुलन करते. विशेषत: कफ; जे वजन वाढणे, शरीरातील पाणी टिकवून ठेवणे आणि चयापचय प्रक्रिया मंदावणे यांच्याशी संबंधित आहे.
  • सुधारित पचन आणि निर्मूलन (Improved digestion and elimination) : शरीराची अन्न पचवण्याची आणि विषारी घटक कार्यक्षमतेने काढून टाकण्याची क्षमता वाढवते. अतिरिक्त फॅट्स आणि विषारी पदार्थांचे साठवून ठेवणे टाळते.
  • तृष्णा कमी करणे : भूक नियंत्रित करते आणि संतुलित आहार व हर्बल सप्लिमेंट्सद्वारे अस्वास्थ्यकर अन्नाची लालसा (cravings) कमी करते.

हेही वाचा – तुम्ही पावसाळ्यात इअरड्रॉप्स वापरता का? आता सोडा ही सवय, तज्ज्ञांनी सांगितले कारण….

१४ दिवसांच्या पंचकर्मांद्वारे आदर्शपणे किती वजन कमी होऊ शकते?

१४ दिवसांच्या पंचकर्मांद्वारे वजन कमी होऊ शकते हे तुमच्या शरीराचा प्रकार, दोषांचे असंतुलन, चयापचय, जीवनशैली आणि इतर निर्धारित उपचार किंवा आहार मार्गदर्शक तत्त्वांवर आधारित असते किंवा त्यात बदल होऊ शकतो.
“सरासरी १४ दिवसांत तीन ते पाच किलोग्रॅम वजन कमी होण्याची अपेक्षा असते; परंतु हे प्रत्येक व्यक्तीच्या शरीराच्या स्थितीनुसार बदलू शकते,” असे डॉ. हंसाजी म्हणाले.

डॉ. हंसाजी यांच्या मताशी अभिनेता रॉय सहमत होता. त्याने सांगितले, “पंचकर्माचा प्राथमिक उद्देश केवळ वजन कमी करण्याऐवजी डिटॉक्सिफिकेशन आणि सामान्य आरोग्य सुधारणे हा असतो.”

डॉक्टर हंसाजी म्हणाले, “वजन कमी होणे हे शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्याच्या आणि दोष संतुलित करण्याच्या नैसर्गिक प्रक्रियेचा परिणाम आहे; पण जर तुम्हाला पद्धतशीरपणे वजन कमी करायचे असेल, तर शारीरिक व्यायाम, योग्य आहाराच्या सवयी, झोप या गोष्टींवर लक्ष केंद्रित करून योगिक दिनचर्या अंगीकारल्यास तुम्हाला तुमचे आदर्श वजन आरामात साध्य करता येते.”

मर्यादा (Limitations)

पंचकर्म हे सामान्यतः सुरक्षित आणि अनेकांसाठी फायदेशीर असले तरी ते प्रत्येकासाठी योग्य नाही, असे डॉ. हंसाजी म्हणाले.

“गर्भवती स्त्रिया, विशिष्ट गंभीर वैद्यकीय परिस्थिती असलेल्या, केमोथेरपी किंवा रेडिएशन थेरपी घेत असलेले रुग्ण आणि गंभीर अशक्तपणा असलेल्या लोकांनी पंचकर्म टाळावे,” असे डॉ. हंसाजी यांनी स्पष्ट केले.