Salmon sperm facials treatment tried by Hollywood actress: अलीकडेच एका नवीन आणि वेगळ्या ट्रीटमेंटने सौंदर्यप्रेमी आणि सोशल मीडिया युजर्सचे लक्ष वेधून घेतले आहे आणि ती ट्रीटमेंट म्हणजे- सॅल्मन स्पर्म फेशियल (salmon sperm facial). हॉलीवूड स्टार जेनिफर ॲनिस्टनने (Jennifer Aniston) या ट्रीटमेंटचा वापर केल्याचं कबूल केल्यानंतर हा ब्यूटी ट्रेंड लोकप्रिय झाला.

“सॅल्मन स्पर्म फेशियलमधला प्राथमिक सक्रिय घटक म्हणजे सॅल्मन स्पर्मपासून तयार केलेला डीएनए, ज्याला सोडियम डीएनएदेखील म्हणतात”, असं डॉ. अजय राणा, त्वचाशास्त्रज्ञ, सौंदर्य चिकित्सक आणि ILAMED चे संस्थापक म्हणतात.

हेही वाचा… अनुष्का-विराट लवकर जेवण करतात अन् लवकर झोपतात; जाणून घ्या त्यांचं स्लीप रुटीन अन् त्याचे फायदे

याचा त्वचेला कसा फायदा होतो?

डॉ. राणा यांच्या मते, सॅल्मन स्पर्म फेशियलमधील सोडियम डीएनए त्वचेला अनेक प्रकारे फायदेशीर ठरू शकतो.

हायड्रेशन (Hydration): सोडियम डीएनए त्वचेला ओलावा टिकवून ठेवण्यास मदत करते, एकंदर हायड्रेशन सुधारते आणि यामुळे त्वचा अधिक तरुण दिसते.

पुनरुत्पादन (Regeneration): सोडियम डीएनए पेशींचे पुनरुत्पादन आणि दुरुस्ती, त्वचेचं टेक्चर आणि लवचिकता वाढवण्यास प्रोत्साहन देऊ शकते.

अँटिऑक्सिडंट गुणधर्म (Antioxidant Properties) : काही अभ्यासांमध्ये असे सुचवले गेले आहे की, सॅल्मन स्पर्म डीएनएमध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म आहेत, जे पर्यावरणाच्या नुकसानापासून त्वचेचे संरक्षण करू शकतात. तसेच फाईन लाईन्स आणि सुरकुत्या कमी करू शकतात.

सॅल्मन स्पर्म फेशियलशी संबंधित अ‍ॅंटी एजिंग म्हणजेच वृद्धत्वविरोधी दाव्यांमध्ये काही वैधता आहे का?

काही पुरावे आणि प्राथमिक संशोधन सॅल्मन स्पर्म फेशियलच्या वृद्धत्वविरोधी दाव्यांचे समर्थन करत असताना, डॉ. राणा यांनी या दाव्यांकडे सावधगिरीने पाहणे गरजेचे आहे असं सांगितलं.

हेही वाचा… तुम्ही पेट्रोलियम जेली खाताय? चेहऱ्यालादेखील लावताय? पण यामुळे उद्भवू शकतात आरोग्याचे अनेक धोके; जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात

“ही ट्रीटमेंट अँटी-एजिंगसाठीच आहे असे दावे करणारे वैज्ञानिक पाठबळ अजूनही तितके मजबूत किंवा व्यापक नाही. तथापि, काही युजर्सना त्वचेचं टेक्चर आणि हायड्रेशनमध्ये लक्षणीय सुधारणा दिसली, ज्यामुळे तुम्ही अधिक तरुण दिसू शकता. जोपर्यंत अधिक व्यापक अभ्यास केला जात नाही तोपर्यंत या दाव्यांचे पूर्ण समर्थन करणे आव्हानात्मक आहे,” असे डॉ. राणा यांनी कबूल केले.

सॅल्मन स्पर्म फेशियल विरुद्ध पारंपरिक अँटी-एजिंग ट्रीटमेंट

“रेटिनॉइड्स आणि हायलुरोनिक अ‍ॅसिडसारख्या पारंपरिक अ‍ॅंटी एजिंग ट्रिटमेंट्समुळे होणाऱ्या परिणामांचे समर्थन करणारे वैज्ञानिक संशोधन लक्षणीय प्रमाणात आहे,” असे डॉ. राणा म्हणतात.

रेटिनॉइड्स (Retinoids): सुरकुत्या कमी करण्यासाठी आणि त्वचेचं टेक्चर सुधारण्यासाठी हे चांगले काम करते.

हायलुरोनिक अ‍ॅसिड (Hyaluronic Acid): हायलुरोनिक अ‍ॅसिड हे त्याच्या शक्तिशाली हायड्रेटिंग गुणधर्मांसाठी ओळखले जाते, हायलुरोनिक अ‍ॅसिड त्वचेला प्लंप ठेवण्यासाठी आणि फाईन लाईन्स कमी करण्यास मदत करते.

सॅल्मन स्पर्म फेशियल वापरण्याशी संबंधित संभाव्य जोखीम किंवा दुष्परिणाम

कोणत्याही स्किनकेअर ट्रीटमेंटप्रमाणे, सॅल्मन स्पर्म फेशियलमध्ये काही संभाव्य धोके आणि साइड इफेक्ट्स आहेत:

  • ॲलर्जिक रिअ‍ॅक्शन : काही व्यक्तींना याची अ‍ॅलर्जिक रिअ‍ॅक्शन होऊ शकते, ज्यामुळे चेहऱ्यावर लालसरपणा येऊ शकतो आणि खाज सुटू शकते.
  • नियमनाचा अभाव : स्किनकेअर इंडस्ट्री ही फार्मास्युटिकल्सइतकी काटेकोरपणे नियंत्रित केलेली नाही, त्यामुळे सॅल्मन स्पर्म प्रोडक्ट्सची गुणवत्ता आणि शुद्धता बदलू शकते. यामुळे रिअ‍ॅक्शनचा धोका वाढू शकतो.
  • मर्यादित संशोधन : सॅल्मन स्पर्म फेशियल वापरण्याच्या दीर्घकालीन परिणामांचा अभ्यास अजूनही केला गेला नसल्याने अज्ञात धोके निर्माण होऊ शकतात.

डॉ. राणा शिफारस करतात की, “व्यक्तींनी नवीन प्रोडक्ट वापरण्यापूर्वी त्याची पॅच टेस्ट करणे गरजेचे आहे. विशेषत: जर एखाद्याची त्वचा संवेदनशील असेल किंवा त्या व्यक्तीला त्वचेची समस्या असेल, तर त्वचारोगतज्ज्ञांशी सल्लामसलत करणे नेहमीच उचित आहे.”